Skip to main content

गाढव ऐकेना, गाढव समजेना

लेखक संजय क्षीरसागर यांनी गुरुवार, 18/09/2014 22:58 या दिवशी प्रकाशित केले.
गाढव ऐकेना, गाढव समजेना गाढवा उसंत नाही, खिंकाळण्याचे थांबेना. गाढव ऐकेना ऽऽ । _______________________ डकवी अल्बमचे फोटो, शोभा साइटची होई फुकटचा घेतला कुणी गावात रे? काय गाढवाला नै ऐडिया? आयडी जाईल नको गमजा. होईल गोची, ढिंगटांग-ढिंगटांग, ढिंगटांग-ढिंगटांग ढींग । गाढव ऐकेना ऽऽ । ________________________ हे फुकटचे आंगण, आम्हा लाभे जैसे आंदण रे नको पडू उताणा इथे-तिथे रे हसती सूज्ञ तुला सारे, आप्त टाळ्या पिटता रे नको झाडू दुगाण्या नित्य-नेमे रे. आले मालक वाट पाहून, बघते गाढव मागे वळून, कोण तू कुठला? पळाले आप्तजन रे. आऽ आऽ आऽ आऽ आऽ आऽ आऽ आऽ आ ।
काव्यरस

इरेला पेटला आहे पिसारा (गझल)

लेखक अजय जोशी यांनी गुरुवार, 18/09/2014 20:10 या दिवशी प्रकाशित केले.
सुखाचा केवढा झाला पसारा बिलगला वेदनेचाही पहारा तुझ्या लाटेत सामावून घे ना कधीचा थांबला आहे किनारा तुझ्या वाणीत सारे भाव होते नको सांगूस की केला पुकारा तुझा रस्ता कधी चुकलो नसे मी नसे ही बातमी आहे इशारा किती चेकाळली स्वप्ने उराशी पहा मिळताच थोडासा उबारा अजुन तुडवीत आहे पाय काटे अजुन नक्की नसे माझा निवारा शरीराची उडाली फार थरथर मनामध्ये कुठे होता शहारा? मला सांगून गेला आपलेपण तुझा तो एक ओळीचा उतारा दुरुन नुसतेच तू नाचू नको ना इरेला पेटला आहे पिसारा जगाला पाहिजे ते ते म्हणू दे 'अजय' बिनधास्त वाजव तू नगारा
काव्यरस

चोरी करावी, आत्महत्या करावी कि निर्लज्ज व्हावे?

लेखक संदीप डांगे यांनी गुरुवार, 18/09/2014 17:57 या दिवशी प्रकाशित केले.
मागच्या एक वर्षापासून आर्थिक परिस्थिती फारच खालावली आहे. धंदा पण साफ बुडाला, डोक्यावर सुमारे ७-८ लाखाचे कर्ज आहे. देणेकरी नुसते उच्छाद मांडून आहेत. ज्यांचे कडून पैसे येणे आहेत ते ढिम्म आहेत. तोंड मिळवणी करता करता नाकीनऊ आले आहेत. ज्यांचे कडून पैसे घेतले त्यात मित्र आणि नातेवाईक सुद्धा आहेत. नवीन व्यवसाय पुरेसा येत नाही . जो येतो तो फारच तुटपुंजा आहे. अश्या परिस्थितीत कुठलीही फिलोसोफी डोक्यावरून जाते. जसे हे पण दिवस जातील, प्रयत्न करा यश मिळेल, संकटात खंबीर उभे रहा. आणि असेच बरेच. आजची परिस्थिती बघू जात सर्व कर्जे मिटायला २-३ वर्षे लागतील, पण कुणीच २-३ दिवस सुद्धा थांबायला तयार नाही.

तंत्रदर्शन-३

लेखक शरद यांनी गुरुवार, 18/09/2014 17:29 या दिवशी प्रकाशित केले.
तंत्र आणि लोकायत तंत्र आणि लोकायत ही दोन दर्शने व भारतातील त्यांचे संबंध एवढ्यापुरताच आजचा लेख मर्यादित आहे. खरे म्हणजे लोकायत या आपल्या ग्रंथांत श्री देविप्रसाद यांनी या दोघांमधील जो संबंध दाखवला आहे त्यावरचे माझे मत येथे मांडले आहे. प्रथम श्री. देविप्रसाद काय म्हणतात ते बघू; तंत्राचे साध्य बघू व नंतर मला श्री. देविप्रसाद यांचे मत का पटत नाही ते बघू. श्री. देविप्रसाद हे कम्युनिस्ट विचारसरणीचे विचारवंत. त्यामुळे त्यांचा वर्गविद्रोह हा आवडीचा विषय. त्यांना लोकायत दर्शन हे भारतातील आदी जमातीचे व तंत्रही त्यांचेच अशी मांडणी करावयाची आहे.

पोकळी

लेखक बेसनलाडू यांनी गुरुवार, 18/09/2014 13:30 या दिवशी प्रकाशित केले.
वेगळी नाहीस तू, का कोण जाणे, वाटले सावली माझीच तू, का कोण जाणे, वाटले व्हायचो कित्येकदा भवती तुझ्या मी कवडसे एकदा बघशील तू का कोण जाणे वाटले जाग आली चांदण्यांच्या मल्मली दुलईमधे पांघरुन गेलीस तू का कोण जाणे वाटले कोरडाच्या कोरडा पाऊस आला एकटा वाटले येशील तू..का कोण जाणे..वाटले पोकळी माझ्यातली का दरवळाया लागली? (श्वासभर फुललीस तू का कोण जाणे वाटले) शेवटी आलाच ऐकू हुंदका अस्पष्टसा शेवटी चुकलीस तू! का कोण जाणे, वाटले

पोळी पापडी चाट

लेखक दिपक.कुवेत यांनी गुरुवार, 18/09/2014 12:50 या दिवशी प्रकाशित केले.
नेहमीच होणारा पोळीचा लाडू आणि फोडणीच्या पोळीला चटपटित पर्याय. तरी ह्या पापडी मी साध्या पोळ्यांच्या केल्या पण ह्यांना अधीक पौष्टिक / रंगीत बनवण्यासाठि पालक, गाजर किंवा बिटाचा पल्प घालून केलेल्या पोळ्या पण घेउ शकतो. chat 1 साहित्यः अ. पापडी साठि: १. शीळ्या पोळ्या - ४ ते ५ २. तळण्यासाठि तेल ब. चटण्या: १.

ह्ये वागनं बरं नव्हं

लेखक निराकार गाढव यांनी गुरुवार, 18/09/2014 01:33 या दिवशी प्रकाशित केले.
रतीबावर रतीब जिलुबिचा रतीब, कश्श्ये टंकती लई चरबरीत | आवं गुर्र्जेन्ला, किती वो तरास द्येता, ह्ये वागनं बरं नव्हं ||   गुर्र्जींनि मैफल गाजिवलि, किती ह्यी ब्येनं लोळिवली पिळ घालूनी दावतो मिश्श्या, घडीघडी त्या मूष्षकलीला आरं साळसूद्दा, कुठून उपाटतो अस्सा, ह्ये वागनं बरं नव्हं ||   गावच्या धणा लय शानाच हाय, याड्यांचा जनू की डाकतर हाय, गोंयची इणि नाय आणुभवी, बणून रायली मोटी कवि आरं लांबटांग्या, हाबंग लिवतोस डोंगा, ह्ये वागनं बरं नव्हं ||   समाधीयोग शिक्कीविला, डोस्क्यात तुमच्या नाय रावला अर्धाच इच्चार करतुया, नावाला प्यार दावतुया आरं वटवाघळा, पकडून ठिवतोस गळा, ह्ये वाग

सायकलींग करताना..

लेखक मोदक यांनी बुधवार, 17/09/2014 21:04 या दिवशी प्रकाशित केले.
सायकलींगच्या धाग्यावर मिळालेला प्रतिसाद आणि मिपाकरांचा उत्साह बघुन ट्रेक करताना.. सारखीच हा धागा काढायची कल्पना सुचली. "काहीतरी वेगळे" या कल्पनेवरून माझी सायकलींगची सुरूवात झाली. सायकलची निवड आणि पुढची प्रगती त्या धाग्यात आली आहेच. या धाग्यात आपण सायकलींग करताना घ्यावयाची काळजी आणि इतर माहितीची देवाणघेवाण करू. महत्वाचे - पुढील सर्व माहिती भारतात वापरल्या जाणार्‍या हौशी सायकलींगच्या अनुषंगाने दिली आहे. रेसींग सायकल किंवा अतीप्रगत सायकलसाठीची माहिती वेगळी असू शकते. मी निष्णात सायकलपटू नाही.

वेदना

लेखक निरन्जन वहालेकर यांनी बुधवार, 17/09/2014 21:04 या दिवशी प्रकाशित केले.
वेदना आठवणी चालून येतात अचानक......... एखाद्या बन्दुकीच्या गोळी सारख्या, आरपार भेदून जातात पुन्हा जखमी करून. तरीहि आठवतेच........ एखादी प्रसन्न सन्ध्याकाळ गन्धित क्षण, जगावेसे वाटणारे. हातात हात गुम्फलेले आपले आणि......................... तू म्हणालीस "नको रे सैल सोडुस" नाहीतर................... "निसटून जातील तुझ्या हातातून." ............................ अशाच कीतितरी जीर्ण जखमा अजुनहि काहीश्या ओल्या, काही बरया होत आलेल्या, वेदनावतात, पुन्हापुन्हा, आठवणीन्चा धक्का लागून. मी मात्र प्रयत्नात, सार काही विसरण्याचा. निश्फळ ! ! निरर्थक ! ! ! निरन्जन वहाळेकर
काव्यरस