Skip to main content

'बॅंग बँग' अर्थात् 'संगीत डोक्याला शॉट'

लेखक घाटावरचे भट यांनी रविवार, 12/10/2014 14:18 या दिवशी प्रकाशित केले.
हे प्रकरण परवाच पाहाण्यात आलं. आमचं कुटुंब हृतिक रोशनचं प्रचंड फ्यान असल्यानं जाणं भाग होत. त्यामुळे 'आज आपल्याला हे सहन करावं लागणार आहे' या विचाराने आणि जरा धडधडत्या हृदयानेच थेटरात प्रवेश केला. बाकी ज्यांनी हा सिनेमा पाहिलेला नाहीये पण पाहाणार आहेत, त्यांनी पुढे वाचू नये कारण गोष्ट उघड होते वगैरे.... सिनेमा सुरु होतो लंडनमधे.

आज जाने की ज़िद न करो (एक)

लेखक संजय क्षीरसागर यांनी रविवार, 12/10/2014 11:31 या दिवशी प्रकाशित केले.
ही ग़ज़ल म्हणजे एक दुर्लभ योग आहे. खुद्द शायर एका अर्थानं शायरी लिहीतो, आणि गायिका ती गाते तेव्हा तिचं संपूर्ण परिमाण बदलून जातं! फैयाझ हाशमीनी ग़ज़ल लिहिलीय प्रियकराच्या भूमिकेतून आणि फ़रिदा ख़ानुमनं ती गायलीये प्रेयसीच्या आर्जवातून, त्यामुळे अर्थ तोच राहिला तरी, काव्यविषयच बदलून गेलायं. काव्यविषय इतका जीवघेणा आणि असा काही तरल झालायं की साधेसे शब्द देखिल काव्याला चिरंतन परिमाण देऊन गेलेत. हीच गज़ल आशा भोसलेनी सुद्धा गायलीये, पण तिथे संगीत, आर्जवाला फिकं करतं. आणि एआर रहेमानची ती अत्यंत आवडती ग़ज़ल आहे, पण तो देखिल फ़रिदाचा दिलकष माहौल जमवू शकलेला नाही.

निंदक असती घरा | आत्मविश्वासाचा होई कचरा ||

लेखक निमिष सोनार यांनी रविवार, 12/10/2014 10:56 या दिवशी प्रकाशित केले.
निंदकाचे घर असावे शेजारी असे जरी पूर्वजांनी सांगून ठेवले आहे तरी हे निंदक कधी कधी आपल्या आत्मविश्वासाला मारक ठरतात. त्यातल्या त्यात जर हे निंदक घराशेजारी नसून जर आपल्या घरातच असतील तर मग पाहायलाच नको. निंदक किंवा टीकाकार हे अनेक प्रकारचे असतात. हे बघा निंदकांचे काही "गुण": नेहमी एखाद्याची इतरांशी तुलना करत राहणारे, नेहमी दोन्ही बाजूंनी बोलणारे, लेबल लावणारे किंवा शिक्के मारणारे, एखाद्या व्यक्तीत सतत दोषच काढणारे वगैरे. काही निंदकांमध्ये मात्र वरचे सगळे "गुण" एकत्रितपणे भरलेले असतात. मुळात कुणाची निंदाच करणे चूक आहे.

मराठी बाणा/ मोडेल पण वाकणार नाही ?????

लेखक विवेकपटाईत यांनी रविवार, 12/10/2014 08:22 या दिवशी प्रकाशित केले.
(तीन पूर्वी ब्लॉग वर लिहलेला लेख, त्या वेळच्या संदर्भात,कुणाची ही भावना दुःखविण्याचा हेतु नाही) ते देवतेचे दर्शनास दिल्ली दरबारात आले. सहज विषय निघाला. दरबारात मुजरा करावा लागतो ही रीत. पण मुजरा करण्या साठी पाठीचा कणा मोडावा लागतो व मान ही झुकवावी लागते, हे आलंच. शिवाजी महाराज मुग़ल दरबारात आले होते. त्यानी बादशाहास मुजरा केला नाही. बादशाह समोर ही त्यांची मान ताठ होती व पाठीचा कणा सरळ होता. मान झुकवण्या एवजी त्यानी कारावास पत्करला. ते म्हणाले, आम्ही ही मराठा, एका अर्थी त्यांचेच वंशज! स्वाभिमानी! खरे मराठा! मोडेन पण वाकणार नाही हाच आमचा बाणा??? आम्ही ही मुजरा करत नाही.

नथ...............भाग-५

लेखक जयंत कुलकर्णी यांनी रविवार, 12/10/2014 07:19 या दिवशी प्रकाशित केले.
Simple, Free Image and File Hosting at MediaFire नथ.......भाग-१ नथ.......भाग-२ नथ.........भाग-३ नथ........भाग-४ नथ.........भाग-५ आईजान बाम्झाई...........(इस्माईलची आजी) तो सगळा प्रकार बघून माझ्या

कैलाश, मलाला, बाल (कामगार/शिक्षण) , पारितोषिकांचे रंग - १

लेखक माहितगार यांनी रविवार, 12/10/2014 01:22 या दिवशी प्रकाशित केले.
पुण्यातील छावणी(कँप) भागात महाराष्ट्र राज्य सरकारची उपायूक्त आणि संचालक स्तरीय बरीच शासकीय कार्यालय असलेली सेंट्रल बिल्डींग इ.स. १९९३-९४ असेल मी एक नियमीत व्हिजीटर होतो. तिथे मला वाटते दोन कँटीन होती. या कँटीनला सकाळी भेट द्या अथवा दुपारी बाल कामगार दिवसभर काम करत, सांगण्याचा उद्देश हा कि शाळा उरकली आणि मग कामाला लागले असेही नसावे. जाणवलं तरी इतरांवर टिका करण्याचा मला अधिकार आहे का ? समस्या जाणवली आणि त्याच्या सोडवणूकीसाठी मी काही केले नसेल तर माझा इतरांवर टिका करण्याचा हक्क बनतो का कदाचीत नाही. एनीवे या सेंट्रल बिल्डींग कँटीन्स मधील मुल केवळ कँटीन मध्ये काम करत होती का ?

गुरुजिंचे भावं विश्व! भाग-१५

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी शनिवार, 11/10/2014 17:05 या दिवशी प्रकाशित केले.
भाग-१४ हे वरती सर्व आलं. ते माझ्या भावविश्वातला गुरुजी आज बाहेर-आला म्हणून! पण एरवी आमची ही सप्तपदी म्हणजे ..विचारू नका...!!! ... पुढे चालू... =============== अगदी एक,दोन,तीन असे सावकाश गतीनी आकडे उच्चारले तरी सगळे मिळून एका मिनिटात पूर्ण होतात. तशी वधुला वराकडून झरं..झरं..झरं..झरं..चालवून एका मिनिटात शेवटच्या पावलाला आणावी लागते.

कैलाश सत्यार्थी आणि मलाला युसुफझाई.

लेखक बाबा पाटील यांनी शनिवार, 11/10/2014 12:30 या दिवशी प्रकाशित केले.
कैलाश आणी मलाला,तुमचा अभिमान आहे, नव्हे त्यापेक्षाही वेगळ काही वाटत तुमच्याविषयी, कुठे तरी आशेचा किरण जाणवतोय्,की जगात सगळेच प्रश्न काही तलवारीच्या धारेवर आणी बंदुकीच्या गोळीने सुटत नाहीत्,तुमच्याकडे पाहुन पटतय मला की प्रेमानेही आणी अहिंसेने बरच काही शक्य होते,ज्या सिद्धार्थ गौतमाचे,महात्म्याचे,आणी दिनदुबळ्यांची आई मदर तेरेसाच्या तुम्ही प्रतिनिधित्व करताय त्या माझ्या भारतभुमीचा उर आज आनंदाने भरुन आला असेल.

गंडलेल्या वाघाची कहाणी

लेखक पगला गजोधर यांनी शनिवार, 11/10/2014 10:28 या दिवशी प्रकाशित केले.
कोमेजून थकलेल्या वाघा येते ग्लानी, मरमर मरे रोज, कोण विचारींना पाणी, रोजचेच आहे सारे काही आज नवे नाही, अफझलखानात रमले सम्राट, वाघा स्कोपच नाही सांगायाचे आहे, या कवितेतून मला, गंडलेल्या वाघाची कहाणी तुला, आटपाट बम्बैजंगली गर्दी झाली भारी, बाहेरच्या जनावरांनी केली घुसखोरी, रोजरोज सम्राट तेंव्हा त्वेषानिया बोले, पण कृतीतून दाखवायचे राहूनीया गेले, जमलेचं नाही त्यावेळी त्यांना जरी, म्हणे यावेळी न्याय ते देणारच खरी, ओरबाडलेल्या रस्त्यांवरून मारू मग फेरी, डेंगूवाल्या मच्छरांच्या त्यात सरीवर सरी विकेन तो सारे जंगल, लाडक्या कॉनट्राक्टरला गंडलेल्या वाघाची कहाणी तुला, असा कसा कागदी सेनाप

नथ..................भाग-४

लेखक जयंत कुलकर्णी यांनी शनिवार, 11/10/2014 08:55 या दिवशी प्रकाशित केले.
Simple, Free Image and File Hosting at MediaFire नथ.......भाग-१ नथ.......भाग-२ नथ.........भा-३ नथ............भाग-४ वलिखान बाम्झाई....... ‘आमच्या धमन्यातून या स्त्रीचे रक्त वाहतेय’ हे वाक्य इस्माईलने म्हटले मात्र तेथे एकच गडबड माजली.