Skip to main content

जम्मू कश्मीर मदतकार्य अनुभव- ३

लेखक मार्गी यांनी बुधवार, 05/11/2014 00:48 या दिवशी प्रकाशित केले.
जम्मू कश्मीर मदतकार्य अनुभव- १ जम्मू कश्मीर मदतकार्य अनुभव- २ सर्व वाचकांना धन्यवाद! मदतकार्याचे आकलन ६ ऑक्टोबरची पहाट! श्रीनगरमध्ये सुखद थंडी आहे. आज श्रीनगरमध्ये ईद साजरी होणार आणि इथले सेवा भारतीचे सर्व कार्यकर्ते आपल्या घरी ईद साजरी करतील. एका अर्थाने हा त्यांच्यासाठी सुट्टीचा दिवस आहे. अर्थात् ते दुपारी सेवा भारतीच्या कार्यालयात येऊन परत कामाला लागतील. पण दुपारपर्यंत ते तिकडेच असल्याने आज गावांमध्ये आरोग्य शिबिर होणार नाहीत.

चांदणी

लेखक सुर्या गार्डी यांनी मंगळवार, 04/11/2014 21:07 या दिवशी प्रकाशित केले.
चांदणीला चंद्राची ओढ लागायचीच.. चंद्रकोरीच्या मिठीत मिलनाची आस असायचीच... बघेल सारं जग आपल्याकडे याची तमा कशाला बाळगायची... चांदणीला चंद्राची ओढ लागायचीच... रोज रात्री चांदणी चोरुन चांदोबाला पहायची... चंदाराजाचं लक्ष्य नाही म्हणून सारखीच रुसायची... तरीही चांदणीला चंद्राची ओढ लागायचीच... रुसता रुसता एखादी मधूनच चमकायची अन् चांदोबाचं लक्ष्य स्वतःकडे वेधायची... कारण चांदणीला चंद्राची ओढ लागायचीच...
काव्यरस

छगनलालांचे सापळे (भाग ८)

लेखक मुक्त विहारि यांनी मंगळवार, 04/11/2014 19:40 या दिवशी प्रकाशित केले.
आधीचा भाग : http://misalpav.com/node/29328 ========================================================================== किरण हा साहेबांचा तिसरा मुलगा.आला तोच मुळी तोंडात पानाचा तोबरा भरून.त्याने स्वतःहून काहीच न विचारल्याने, मी पण जास्त लक्ष न देता, स्वतःला कामात जुंपून घेतले.तो त्याच्या मनाचा राजा तर मी माझ्या मनाचा बादशा.गेला उडत. साधारण पणे १च्या सुमारास साहेबांचा फोन आला.त्यांना रिपोर्ट केला आणि जेवायला बसलो.सुदैवाने माझ्या जेवणाच्या डब्याची जबाबदारी आमच्या एका शेजार्‍याने घेतल्याने, ती चिंता न्हवती.पहिल्या दिवसापासूनच मी एक धोरण ठेवले होते, की

छगनलालांचे सापळे (भाग ६)

लेखक मुक्त विहारि यांनी मंगळवार, 04/11/2014 16:20 या दिवशी प्रकाशित केले.
आधीचा भाग : http://misalpav.com/node/25470 हा भाग डोक्यात फार आधीच तयार होता...पण काही कारणांमुळे लिहायला उशीर झाला...दिरंगाई बद्दल क्षमस्व....

(दोन दिवस मुंबईत गेले,दोन दिल्लीत गेले)

लेखक अमोल केळकर यांनी मंगळवार, 04/11/2014 16:20 या दिवशी प्रकाशित केले.
कवी नारायण सुर्वे यांची क्षमा मागून..... (मुळ काव्य : दोन दिवस वाट पाहण्यात गेले, दोन दुःखात गेले हिशोब करतो आहे आता किती राहिलेत डोईवर उन्हाळे) ------------------------------------------------------ दोन दिवस मुंबईत गेले, दोन दिल्लीत गेले हिशोब करतो आहे आता, किती पैसे भुरर्कन उडाले शेकडो वेळा फोन आला, इमेल आले, बोलणी सुरु झाली मंत्रीपदाच्या भरोशावर जिंदगी बर्बाद झाली जे होते माझे चिन्ह , जनतेकडेच गहाण राहिले कधी झेंडा उंचावलेले हात, कलम झालेले पाहिले दरवेळी बंडखोर वळविले असे नाही,पण असेही क्षण आले तेव्हा शत्रूच मित्र होऊन साहाय्यास धावून आले. भोळ्या जनतेचा विचार हरघडी केला अन नेता झाल

तेलणीशी रुसला वेडा - मानवी स्वभावाची सामुहीक असहकार चळवळ

लेखक माहितगार यांनी मंगळवार, 04/11/2014 15:59 या दिवशी प्रकाशित केले.
'अहं' बद्दल पुढेचर्चा करण्यापुर्वी या विषयावर बरच मंथन चिंतन करूनही मला स्वतःला याबाबत खुपसे सुधारता आलेले नाही ही माझी स्वतःची मर्यादा सुरवातीसच स्विकारून, समुहाचा घटक म्हणून मानवी समुह ते समुह सहसंबंधातील रुसवा फुगवा अभ्यासण्याच्या दृष्टीने काही लिहावे हा मनात विचार असतानाच संत तुकाराम महाराजांची खालील गाथा वाचनात आली.
तेलणीशी रुसला वेडा | रागेँ कोरडें खातो भिडा || 1 || आपुले चित्त आपण पाही | संकोच तो न धरी कांही || 2 || -संत तुकाराम (गाथा क्र.

फुटपाथवर कुडकुडणाऱ्या......

लेखक psajid यांनी मंगळवार, 04/11/2014 14:34 या दिवशी प्रकाशित केले.
दीपावली संपली कि आपल्याला थंडीची चाहूल लागते आणि मन म्हणते 'हो आता हिवाळा येतोय, थंडी सुरु झाली'. मग आपण मागील वर्षीचे स्वेटर मुलांना लहान होतायत म्हणून किंवा त्यांचा नवीन खरेदीचा हट्ट म्हणून मग मुलांसह सर्व परिवारासाठी उबदार कपडे, स्वेटर, शाल, रजई यांच्या खरेदीमध्ये व्यस्त होऊन जातो !

एक लक्ष वाचक - एक प्रवास

लेखक विवेकपटाईत यांनी सोमवार, 03/11/2014 22:02 या दिवशी प्रकाशित केले.
आज ३ नोव्हेंबर, सायंकाळी ८ वाजता कॉम्पुटर चालू केला, सहज लक्ष गेल ब्लॉगला वाचक संख्या एक लक्षाच्या वर गेलेली होती. जेंव्हा ब्लॉग लिहायला सुरुवात केली होती, आपला ब्लॉग कुणी वाचेल याची कल्पना ही केली नव्हती. चिरंजीवाना शिक्षणात मदत होईल या हेतूने कॉम्पुटर (लेपटाॅप) घरात आला. अर्थातच मला ही तो वापरायला मिळालाच. उत्सुकता म्हणून कुठे मराठी वाचायला मिळेल या उद्देश्याने अंतर्जालावर शोध घेऊ लागलो. सर्व प्रथम मराठी सृष्टी ही वेबसाईट दिसली. वेबसाईट वर मराठीत लिहा, आपल्यातील लेखकाला जागवा. असे आव्हान होते.