Skip to main content

अजुनी बसून आहे

लेखक विदेश यांनी शुक्रवार, 07/11/2014 23:55 या दिवशी प्रकाशित केले.
(चाल- अजुनी रुसून आहे, खुलता कळी खुले ना ) अजुनी बसून आहे गुंता मुळी सुटेना उघडे तसेच फेस्बुक लॉगौट..
काव्यरस

गुरुजिंचे भावं विश्व! भाग- १७ (मंगलाष्टक स्पेशल)

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी शुक्रवार, 07/11/2014 21:23 या दिवशी प्रकाशित केले.
मागिल भाग-१६ आणि वधू एकदा श्टेजवर येऊन वरासमोरच्या पाटावर उभी राहिली,की मग सुरु होतो एक अत्यंत गंभीर (आणि तेव्हढाच इनोदी Biggrin ) असा कार्यक्रम.... तो म्हणजे मंगलाष्टकांचा! पुढे चालू... ================= खरं म्हणजे,विवाहसंस्कारातला मंगलाष्टकांचा कार्यक्रम,हा परंपरेप्रमाणे किंचितसा प्रसन्नतेचा पण त्याहून जास्त गंभीर स्वभावाचा असा आजही गृहीत धरला जातो. म्हणजे या जागी अगदीच विनोद होत नाहीत,असं नाहीये. पण विनोद होत असले/नसले तरी मुद्दाम कोणी मुलि'कडच्यांकडे आज हे रडतायत कि नै?

नवीन laptop घेण्याबद्दल माहिती

लेखक Madhavi_Bhave यांनी शुक्रवार, 07/11/2014 15:52 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मी बर्याच दिवसांपासून एक laptop विकत घेण्याचा प्रयत्न करत आहे. मला mainly office use साठी घ्यायचा आहे पण माझ्या लहान बहिणीला पण उपयोग होईल असा हवा आहे. बहिण Architecture शिकत आहे आणि तिला Autocad किंवा तत्सम softwares वापरावी लागतात. मला ऑफिसमध्ये स्वतःला simulations वगैरे करावी लागत असल्यामुळे processor पण फास्ट असणे जरूर आहे. काहीजण मला अगदी छातीठोक पणे DELL च घे म्हणून सांगत आहेत तर काही जन LENOVA घे म्हणून सांगत आहेत.

अगतिक....

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी शुक्रवार, 07/11/2014 15:30 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या विरोधाची पर्वा न करता त्यांनी बेफाम चालणार्‍या, जाळीच्या ट्रकमधे, आम्हाला कोंबल. सगळ्याजणी भेदरलेल्या होत्या. जीव मुठीत धरुन, आम्ही कशाबशा जाळीला पकडुन बसलो होतो. आमच्यातल्या दोघीजणी ट्रक मधेच मरण पावल्या. ट्रक थांबला. दहाबारा जणींना उतरवले. नराधमांनी अक्षरशः पायाला धरुन फरपटत त्यांना बाहेर ओढले. एकीने निसटायचा प्रयत्न केला. पण चारपाच टग्यांनी तिला घेरलेच. तिचा आकांत निमूटपणे पहाण्याशिवाय आमच्यापुढे पर्याय नव्हता. पुढे मला पण उतरवले गेले. पळण्याची हिम्मतच नव्हती. आम्ही होतो तिकडे येउन लोक एखादीकडे बोट दाखवत. तिला ते लगेच बाहेर काढत. माझ्याकडेही एकाने हात केला, खुप घाबर

क्यालीफोर्नियाचा कोकण....

लेखक विजुभाऊ यांनी शुक्रवार, 07/11/2014 12:07 या दिवशी प्रकाशित केले.
आपले राजकारणी कोकणचे क्यालिफोर्निया करायच्या बर्‍याच बाता करत असतात. कोकण खरेच निसर्गसुंदर आहे. निसर्गाचा इतका वरदहस्त महाराष्ट्रात इतर कोणत्याच भागास मिळालेला नाहिय्ये. लाम्बच लांब समुद्रकिनारा. त्यांची जणु सोबत करत असल्या सारख्या लागुनच असलेल्या डोंगर रांगा. ती तांबडीलाल माती, वार्‍यावर डुलणारी नारळी पोफळीची झाडे. या सार्‍याला दृष्ट लागु नये की काय म्हणून असणारे गरीबीचे देणे, लोकाना असलेले रीकामपण, बेकारी , अशिक्षण , त्यातून निपजलेला तिरकस स्वभाव हे सगळे कोकणातच आढळतात. आपले राजकीय नेते कोकणचा क्यालिफोर्निया करण्याच्या घोषणा करतात.

( ओळखलत का साहेब मला?)

लेखक अमोल केळकर यांनी शुक्रवार, 07/11/2014 10:58 या दिवशी प्रकाशित केले.
ओळखलत का साहेब मला?’ परत आला कोणी, कपडे होते फाटलेले पण, मधाळ त्याची वाणी क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून, ‘पक्षामध्ये फुट पडली, आलो तिकडे राहुन’. कार्यकर्त्यांसह आम्हाला, चार आश्वासने भेटली, स्वबळावर सत्ता येता, आमची वाट लावली . पक्ष सोडला, चूक झाली, होते नव्हते ते गेले, निवडणूक होईपर्यंत त्यांनी, फक्त राबवून घेतले कार्यकर्त्यांना घेउन संगे, साहेब आता लढतो आहे राहिलेली कामे पुर्ण करून, मतदारसंघ घडवत आहे खुर्चीकडे लक्ष जाताच हसत हसत उठला ‘पद नको साहेब ’, जरा एकटेपणा वाटला. आलेल्या लाटेत खुर्ची गेली, तरी मोडला नाही कणा, पक्षात परत घेउन तुम्ही, फक्‍त लढ म्हणा (लढाऊ ) सैनीक ७/१

एक उदास कंटाळवाना चेहरा

लेखक प्रकाश१११ यांनी शुक्रवार, 07/11/2014 10:50 या दिवशी प्रकाशित केले.
पाने गळू लागलीत झाडांची हवा वाहत असते नको तितक्या वेगाने थरथरत राहतात त्याच्या खिडकीवरचे पडदे दरवाजा बंद असला तरी हवा टकटकत बसते दारावर एक उदास वातावरण झपाटून टाकते मनाला बाहेर प्रकाश असून अंधारून गेलेला दिवसा देखील कानांना येत राहतो रातकिड्यांचा आवाज उगाचच एखादं पाखरू वळचणीला एखादं पान गळणा-या फांदीवर घट्ट बसून रुतलेलं काळ्या काळ्या फांदीच्या बोटाना धरून बसलेलं आवळून टाकलाय गळा आपल्या निष्टुर हातानी तरीही तो स्वताला ढकलीत रहातो पर्णहीन झाडाची पायवाट अंगावर शिरशिरी नि नाक झडून गेल्याचा भास तळे शुभ्र एक उदास तवंग त्याच्या अंगावर मृत होताना ताठरून जाते जसे एक

चिनू ची गोष्ट !!

लेखक फिझा यांनी शुक्रवार, 07/11/2014 09:14 या दिवशी प्रकाशित केले.
चिनू ची गोष्ट !! मे महिन्याचे दिवस होते.यंदाची मे ची सुट्टी काकांच्या गावाला साताऱ्याला घालवायची असे समस्त बच्चे कंपनी चे ठरले होते. मला ते साताऱ्याचे घर फार काही आवडायचे नाही. तसा वाडा मोठा होता, पण जुनाट वाटायचा. रात्रीच्या वेळी तर भयंकर शांततेचा आणि भकास वाटायचा. कधी मुक्काम केलाच तर कधी एकदा उजाड़ते आणि सगळे उठतात ....अस होऊन जायचं मला. आईला मी म्हणायचेही नेहमी... की मला नाही आवडत इथे.... पण काय ...आई काहीतरी सांगुन विषय टाळायची.....उगीच काका काकूंना काय वाटेल असे त्यांनी ऐकले तर...... काकांची आर्थिक परिस्थिति तशी बेताचीच.

पांढरा रस्सा

लेखक जागु यांनी गुरुवार, 06/11/2014 15:56 या दिवशी प्रकाशित केले.
खर तर पांढरा रस्सा म्हटल की कोल्हापूर डोळ्यासमोर आल्याशिवाय राहत नाही. कोल्हापूरी स्पेशल मेनू मध्ये गणला जाणारा हा पांढरा रस्सा आणि सोबत असणारा तांबडा रस्साही नाव काढल्याबरोबर अगदी तोपासु होत. कोल्हापूरात ह्यासाठी लागणारे मसाले खास गिरणीत दळून आणतात असे ऐकले आहे. कोल्हापूरकर ह्यावर अजून माहीती देतीलच. माझ्या वाचनात ही रेसिपी आली आणि ती करून मी करून पाहीली. फारच झ्याक (टेस्टी) लागला हो. पारंपारीक पद्धत अजून वेगळी असू शकते ती जाणून घ्यायची इच्छा आहे कोल्हापूरवासियांकडून.

दिवाळी पोस्त.

लेखक हरकाम्या यांनी गुरुवार, 06/11/2014 12:45 या दिवशी प्रकाशित केले.
मिपाकरांना दिवाळी " पोस्त " हा प्रकार माहिती असेल. माझ्या बालपणी मला दिवाळी पोस्त हा प्रकार माहिती होता. त्यावेळी हक्काने पोस्त मागणारी एकच असामी अस्तित्वात होती ती म्हणजे " पोस्टमन " लोक त्याला न मागताही पोस्त देत असत त्याबद्दल काही वावगे वाटात नसे. हा सगळा देणारा आणि घेणारा यांच्या राजीखुशीचा मामला असे. या दिवाळीत मला दोन वेगळे अनुभव आले. सकाळी " Morning Walk " ला गेलो असताना " Gas Cylinder" घरी पोचवणारा माणुस भेटला त्याने मला थांबवुन " काय साहेब दिवाळी पोस्त " विसरलात काय.