Skip to main content

जम्मू कश्मीर मदतकार्य अनुभव- ५

लेखक मार्गी यांनी रविवार, 09/11/2014 15:26 या दिवशी प्रकाशित केले.
जम्मू कश्मीर मदतकार्य अनुभव- १ जम्मू कश्मीर मदतकार्य अनुभव- २ जम्मू कश्मीर मदतकार्य अनुभव- ३ जम्मू कश्मीर मदतकार्य अनुभव- ४ सर्व वाचकांना धन्यवाद! जम्मू क्षेत्रातील मदतकार्य . . आज आपत्ती येऊन गेल्यानंतर सुमारे दोन महिन्यांनी हे लिहित असताना कोणाला असा प्रश्न पडेल की, आता हे सर्व लिहिणं खरोखर आवश्यक आहे का? इतकी ह्याची गरज आहे का? ह्याची‌ आवश्यकता आहे.

द्रिश्यम/ दृश्यम

लेखक यश राज यांनी रविवार, 09/11/2014 14:50 या दिवशी प्रकाशित केले.
माझे काही मल्लू सहकारी खुप दिवसांपासुन सांगत होते की द्रिश्यम म्हणुन एक खुप सुंदर मल्याळम सिनेमा आहे, त्याने यंव बिझेनेस केला,त्यंव रेकॉर्ड केले व तु नक्की बघ.मी त्यांचे बोलणे हसण्यावारी नेले.

बर्लिन भिंतीच्या पतनाचा रौप्यमहोत्सव

लेखक बोका-ए-आझम यांनी रविवार, 09/11/2014 09:09 या दिवशी प्रकाशित केले.
बर्लिन भिंतीच्या पतनाचा रौप्यमहोत्सव आजच्याच दिवशी २५ वर्षांपूर्वी , ९ नोव्हेंबर १९८९ या दिवशी पूर्व जर्मन सरकारने बर्लिन भिंतीचे दरवाजे उघडून पूर्व बर्लिनच्या नागरिकांना पश्चिम बर्लिनमध्ये जायची परवानगी दिली. पुढे एक वर्षाच्या आत दोन्हीही जर्मन राष्ट्रे एकत्र आली.

केंद्रात नरेंद्र, राज्यात देवेंद्र !

लेखक ओंकारा यांनी रविवार, 09/11/2014 01:33 या दिवशी प्रकाशित केले.
>>> गांधी हत्येच्या खोट्या आरोपामुळे झालेली पिछेहाट, शहरी आणि भटजी-शेटजींचा पक्ष म्हणून झालेली हेटाळणी, शिवसेनेसोबतच्या 25 हून अधिक वर्षांच्या युतीमुळे निम्याहून जास्त मतदारसंघातली कार्यकर्त्यांची होणारी निराशा, गोपीनाथ मुंडेंचा अकाली मृत्यू, राज्यव्यापी चेह-याचा अभाव, शेवटच्या टप्प्यापर्यंत रंगलेला युतीचा घोळ. त्यामुळे उमेदवार मिळवताना झालेली पळापळ या सर्वांच्या नंतरही भाजपानं 120 चा टप्पा पार केलाय.

जम्मू कश्मीर मदतकार्य अनुभव- ४

लेखक मार्गी यांनी शनिवार, 08/11/2014 21:59 या दिवशी प्रकाशित केले.
जम्मू कश्मीर मदतकार्य अनुभव- १ जम्मू कश्मीर मदतकार्य अनुभव- २ जम्मू कश्मीर मदतकार्य अनुभव- ३ सर्व वाचकांना धन्यवाद! मदतकार्यामध्ये देशभरातील कार्यकर्त्यांचे योगदान ६ ऑक्टोबरच्या रात्री‌ अनेक कार्यकर्ते भेटले. त्यापैकी एक जण कर्नाटकच्या मंड्याचे अर्जुन होते. देशभरातून आलेल्या कार्यकर्त्यांपैकी अनेक जण डॉक्टर होते, तर हे इंजिनिअर होते. सर्व जण त्यांच्या धडाडीने आणि मेहनतीने प्रभावित झाले.

गुलाम

लेखक सुर्या गार्डी यांनी शनिवार, 08/11/2014 16:40 या दिवशी प्रकाशित केले.
डोळ्यात आज माझ्या मूर्ती तुझीच आहे ओलावल्या कडांची आरास त्यास आहे ॥ ह्रद्यात ठाव माझ्या तुजविण कोण नाही आसूसल्या मनाला आधार कोण नाही ॥ व्याकूळता उराशी अन् एकटाच आहे या यातना मनीच्या शब्दांत मांडत आहे ॥ तू भेटशील स्वप्नी आशा ऊगाच आहे जागेपणी झोपण्याला राजा गुलाम आहे ॥ सुर्या...

आनंद - कार्लसन, सोची २०१४ - डाव १

लेखक चतुरंग यांनी शनिवार, 08/11/2014 16:27 या दिवशी प्रकाशित केले.
बरोबर वर्ष झालं. ९ नोवेंबर २०१३ रोजी चेन्नैला सामना सुरु झाला त्यावेळी आनंद आणि मॅग्नुस दोघांच्या भूमिका बरोबर विरुद्ध होत्या - मॅग्नुस आव्हानवीर होता आणि आनंद जगज्जेता! तो सामना मॅग्नुसने हातोहात जिंकला. घरच्या मैदानावरती आनंदला अपेक्षांचे ओझे पेलता आले नव्हते. पण त्याची विजिगीषा बघा नोवेम्बरमध्ये सामना हरल्यानंतर आनंद जवळपास संपला अशीच अटकळ होती. कँडिडेट मास्टर्समधून आनंदने अशी काही मुसंडी मारली की सगळे अवाक झाले. आणि आज तो कार्लसनसमोर आव्हान घेऊन बसणार आहे.

वात्रटिका- अभियान स्वच्छता

लेखक विवेकपटाईत यांनी शनिवार, 08/11/2014 10:36 या दिवशी प्रकाशित केले.
आज एक ब्रेकिंग न्यूज पाहिली – दिल्लीत एके ठिकाणी आधी कचरा पसरविला आणि नंतर गाजा-बाज्या सहित तो स्वच्छ केला आधी शुभ्र वस्त्र धारण करावे एक डिझाईनर झाडू आणावे मग मिडीयाला बोलवावे स्मायली फोटो चमकावे. रस्त्यावरी कचरा पसरविला तोची झाडून स्वच्छ केला असा स्वच्छता अभियानाचा नेत्यांनी बोऱ्या वाजविला.

LOTTERY IN बॅबिलॉन

लेखक मारवा यांनी शनिवार, 08/11/2014 08:39 या दिवशी प्रकाशित केले.
सर्वप्रथम एक खुलासा माझे मराठी भाषेचे ज्ञान तोडके , इंग्रजी चे ज्ञान ही मोडके त्यात माझे बारहा ऑफ़लाइन पॅड लंगडे ( रया लिहावे लागते इव्ह च्या पियकराला अडम अ वर टोपी घालता येत नाही आणि अजुन बरेच काही बारहॉ देखे है इसकी रंजीशे,,,.) त्यात मुळ स्पॅनिश वरुन इंग्लिश वरुन माय मराठी इतना लंबा सफ़र. त्यात मी हा असा अजुन ही बरेच काही मात्र सगळे आपणच का उघड करावे ? बाकी या अनुवादाने भाषिक मनोरंजन झाल्यास तो एक बोनस च समजावा व त्याचा हि आनंद लुटावा.

डोब्रा भाग - ३ (अंतिम)

लेखक खटपट्या यांनी शनिवार, 08/11/2014 03:54 या दिवशी प्रकाशित केले.
डोब्रा भाग - १ डोब्रा भाग - २ "नाही असेच. संध्याकाळी कुठेतरी कॉफी प्यायला भेटलो असतो." "अम्म्म, उद्याचा दिवस मी थोडी बीजी आहे. पण रात्री जेवणासाठी आपण भेटू शकू. नाहीतर असं कराना, तुम्ही माझ्या घरी रात्री जेवायला या.