कधी तू..... (वाहनवेड्याचं व्हर्जन)
बहुगुणी यांच्या मायामी बीच ऑटो शो या धाग्यातील फोटो बराच काळ डोळ्यासमोर पिंगा घालत राहिले. वाहनवेड्यासाठी वाहन काय असतं हे वेगळं सांगायला नको. तीच दारू असते, तेच प्रेम असतं, तोच जोश असतो, तेच समाधान असतं.
त्याच वरून प्रेरणा घेत सुचलेलं हे विडंबनकाव्य.
मूळ गाणं : कधी तू....
चित्रपट : मुंबई पुणे मुंबई
कधी तू.... स्टियरिंगवर बसण्याच्या क्षणात
कधी तू.... ड्रायव्हिंगच्या वेड्या अनुभवात
कधी तू.... रस्ता एक स्ट्रेट, आपलं जणु जेट
स्पीडोमीटर वर एकशेसाठ
टर्न अप द स्टिरियो, रोल डाउन द विंडो
वेगाची मस्ती चाखण्यात
कधी तू...
काव्यरस
मिसळपाव
