दाभोळ जेटीवर कोकण क्रुज फेस्टीवलचे आयोजन
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील दाभोळ फेरीबोट जेटीवर २५ ते ३१ डिसेंबर या कालावधीत ‘कोकण क्रुज फेस्टीवल’चे आयोजन करण्यात आले आहे. गोव्यातील क्रुज संस्कृती कोकणच्या भूमिवर अनुभवण्याची संधी दाभोळ क्रुजवर मिळणार आहे. या महोत्सवात ५० मिनिटांचा भरगच्च कार्यक्रम सादर केला जाणार असून, यामध्ये गोवन फोक डान्स, पोर्तुगीज डान्स, कोळीडान्स, मराठमोळी लावणी तसेच बच्चे कंपनीकरीता खास डान्सचे आयोजन करण्यात आले आहे.
मिसळपाव