Skip to main content

मरायचं नाय बे...!!

लेखक आयुर्हित यांनी गुरुवार, 11/12/2014 18:32 या दिवशी प्रकाशित केले.
मरायचं नाय बे...!! कुणब्याचं पोरं सालं भित्रच हाय , फासावर जाय नाहीतर औषध खाय , लय बेनं इपितर बायलच हाय..

हिशोब..

लेखक चुकलामाकला यांनी गुरुवार, 11/12/2014 16:29 या दिवशी प्रकाशित केले.
मी जन्मांचा विचार केला ,तुझी धाव पण वर्षांपुरती कसे निभावू नाते अपुले ,परतुनी आले अर्ध्यावरती … किती विनवण्या, किती अबोले, एका छोट्या पत्रासाठी हट्ट पुरवी तू अखेरीस पण पत्ता दुसरा पत्रावरती… शब्द असे तू उधळीत जाशी, जशी फुले वा माणिक मोती फसवे तरीही वेचीत गेले, माया केली अर्थांवरती … उगाच वेडा जीव लावला ,अशी कशी मी विसरून गेले , कितीही गुणले शून्याला तरी हाती अपुल्या शून्यच उरती...
काव्यरस

गृहकर्जाबद्दल माहिती आणि मदत

लेखक पीनी यांनी गुरुवार, 11/12/2014 15:06 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, मी अडीच वर्षांपूर्वी एल. आय. सी. कडून गृहकर्ज घेतले होते. तेंव्हा इंटरेस्ट रेट साधारण १० च्या आसपास होता. आता तो वाढत वाढत ११.२५ झाला आहे. मला एल. आय. सी. ऑफिसमधून असे कळले की माझे कर्ज ज्या योजनेमध्ये मंजूर झाले त्या योजनेनुसार हे बरोबर आहे आणि बाहेर अथवा एल. आय. सी.मध्येच कितीही कमी इंटरेस्ट रेट असला तरी मला हाच रेट असेल. कर्जाची रक्कम बरीच जास्त असल्याने व इतर काही घरगुती अडचणींमुळे कर्ज डाउन पेमेंट करुन लवकर भरणे ३-४ वर्षात शक्य नाही. आता माझ्यापुढे तीन पर्याय आहेत. १. काही पर्याय न शोधता जास्त रेटने कर्जफेड करत रहावे. २. एल. आय. सी. मधूनच टॉप-अप कर्ज घ्यावे.

शोधा म्हन्जे सापडेल!

लेखक आयुर्हित यांनी गुरुवार, 11/12/2014 13:53 या दिवशी प्रकाशित केले.
मी एका संधीच्या शोधात आहे, जेणेकरून विदर्भातील शेतकऱ्याच्या आत्महत्या बंद होतील. भारतात राहून काही संधी आहे काय आमच्यासाठी/आमच्या विदर्भातील शेतकरी लोकांसाठी? त्यासाठी वाट्टेल ते कष्ट करायची, नवीन गोष्टी शिकायची, वाट्टेल तितका खर्च करायची, वाट्टेल तेथे येवून आपली भेट घेण्याची, ह्या आयुष्यातील लागेल तेव्हढा वेळ देण्याची माझी तयारी आहे. मिपावरच्या "शोधा म्हन्जे सापडेल" या आय डी मुळे मला हे प्रखरतेने जाणवले आहे. आशा आहे की सर्व मिपाकर आपआपल्या कुवतीनुसार मार्गदर्शन व प्रसंगी सर्व मदतही करतील. आणि मिपाचा एक चांगला आदर्श जगापुढे ठेवू या.

अंधार क्षण भाग ४ - तात्याना नानियेव्हा (लेख १८)

लेखक बोका-ए-आझम यांनी गुरुवार, 11/12/2014 00:06 या दिवशी प्रकाशित केले.
अंधार क्षण - तात्याना नानियेव्हा एका क्षणात तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतं, होत्याचं नव्हतं होऊ शकतं. तात्याना नानियेव्हाच्या आयुष्यात तो क्षण २६ आॅक्टोबर १९४२ या दिवशी आला. सोविएत रशिया आणि नाझी जर्मनी यांचं युद्ध सुरू होऊन एव्हाना एक वर्षाहून जास्त काळ होऊन गेला होता. ती युक्रेनमध्ये सोविएत सैन्याच्या इस्पितळात नर्स म्हणून काम करत होती. त्या दिवशीही ती कामात होती. अचानक तिने एक थरकाप उडवणारा खडखडाट ऐकला. हळूहळू तो आवाज वाढत गेला आणि जेव्हा तिने हिंमत करुन खिडकीतून बाहेर पाहिलं तेव्हा समोरचं पूर्ण क्षितिज रणगाड्यांनी व्यापलं आहे हे तिच्या लक्षात आलं.

पूर्वेच्या समुद्रात-३

लेखक सुबोध खरे यांनी बुधवार, 10/12/2014 20:53 या दिवशी प्रकाशित केले.
गोवा कारवारच्या आसपास नुसते इकडून तिकडे भटकणे झाल्यावर कोची च्या दिशेने कूच केले. तालसेरी (जुने नाव तेल्लीचेरी) च्या आसपास ( मंगळूरू च्या दक्षिणेस) परत काही रडारवर तपास लागला म्हणून पहाटे आमचा मोर्चा तिकडे वळविला गेला. तेंव्हा तेथे दोन मच्छीमार नौका दिसल्या. हे सर्व वीर श्रीलंकेतून येथे आले होते. तेंव्हा त्यांना ताबडतोब थांबण्याचा इशारा दिला गेला. सवयीप्रमाणे त्यांनी पळायला सुरुवात केली. आमच्या नौकेने त्यांच्यावर मशीनगन ने थोड्या गोळ्या डागल्या तरी ते दाद देईनात.

बस्स इतकेच..

लेखक मिसळलेला काव्यप्रेमी यांनी बुधवार, 10/12/2014 19:59 या दिवशी प्रकाशित केले.
तुझ्यापासून दूर होऊन अमाप काळ लोटला दु:ख हलकं नाही झालयं पण सहन करण्याची ताकद वाढलीये.. बस्स इतकेच.. ---- आता दारावरचा पारीजात ओसंडून बरसला तरी त्याचा हेवा वाटेनासा झालायं फक्त एक हलकिशी कळ आली काल छातीत जेव्हा त्याचे एक फुल पायाखाली आले बस्स इतकेच.. ---- परवा अलमारी उचकतांना तुझे एक पैंजण हाताला लागले छन्न झालं एकदम आपल्या जोडीदाराअभावी एकाकी,केविलवाणे वाटले बस्स इतकेच.. ---- तिथेच बाजूला आपला एक अल्बम सापडला 'त्या' तस्बिरीतले तुझे डोळे आणि त्या डोळ्यातले ते काजळ.. बघता बघता कां कोण जाणे टचकन डोळ्यात पाणिच तरारले एकदम बस्स इतकेच.. ---- तुझी आठवण आजही येते अगदी नित्यनेमाने काही ठोके चुकतात

निमंत्रण- पुण्यातल्या एका पुस्तक प्रकाशनाचे

लेखक खेडूत यांनी बुधवार, 10/12/2014 19:13 या दिवशी प्रकाशित केले.
कुठल्याही शाळेत जावं. पाचवीच्या पुढील हाताला लागेल त्या पोराला विचारावं, ‘'भीती वाटते असा तुझ्या अभ्यासातला विषय कुठला?'' समोरून ‘गणित’ असं उत्तर आलं नाही तर आपल्याला त्या पोराचीच भीती वाटू लागेल ! गणित-भूमिती सारख्या ‘डेंजर’ विषयांनी आपलं कोवळं बालजीवन किती खडतर केलं होतं, हे प्रत्येकाने आठवून पाहावं ! ‘भित्यापाठी ब्रह्मराक्षस’ म्हणतात त्याप्रमाणे आम्ही गणित-भूमिती विषयांना घाबरून त्यापासून दूर पळत राहिलो. गावाकडच्या विद्यार्थ्याना जणू विज्ञान -इंग्रजी व गणित म्हणजे पारंपारिक शत्रूच वाटत.

चारोळ्या

लेखक प्रमोद देर्देकर यांनी बुधवार, 10/12/2014 15:55 या दिवशी प्रकाशित केले.
मला हायकु किंवा चारोळी म्हणा हा प्रकार आवडतो. कमी शब्दात खुप काही व्यक्त करता येतं. यातला तिसरा हायकु हा काही दिवसांपुर्वी मी खफवर लिहला होता. बाटली रिकामी ग्लास घरंगळलेला, टेबलावरचा थेंब केव्हाचाच सुकलेला. ढग विखुरलेले पाऊस थांबलेला, कुंदाळ हवेत मी गारठलेला. काडी काडी करुन तिनं घरटं बांधलं, वाराही वहायचा थांबला त्यानेही ते जाणलं.

ये रे माझ्या मागल्या........

लेखक जे.पी.मॉर्गन यांनी बुधवार, 10/12/2014 15:11 या दिवशी प्रकाशित केले.
"माझं ऐक - बोलिंग घे..... ओव्हरकास्ट आहे". २७५ शनिवार पेठ पुणे ह्या ठिकाणी बिल्डिंगच्या मध्ये असललेल्या साधारण ५० X १५० फुटी फर्शीच्या मैदानवर पिवळ्या स्मायलीच्या बॉलनी खेळताना ते ढोपरायेवढं कार्टं आपल्या गुडघ्यायेवढ्या कॅप्टनला सूचना करत होतं. आता त्या शेंबड्या पोराच्या ह्या आगावपणामध्ये त्याच्या (मुद्दामच उल्लेख केलेल्या) राहत्या ठिकाणाने दिलेल्या जन्मसिद्ध अधिकाराइतकाच वाटा होता आजकाल सगळीकडूनच मिळणार्‍या क्रिकेटच्या ज्ञानाचा! लहान असताना रबरी चेंडू प्यांटवर आम्हीदेखील घासला होताच... पण ह्यांचे म्हणजे नेणत्याचे घासणे | "वन लेग स्टंप" गार्ड काय घेतील.....