काळजी
तसं म्हणायला गेलं तर काळजी प्रत्येकच पालकांना असते. परंतू जेव्हा तुमचे मूल स्वमग्न असते तेव्हा ती काळजी फारच आक्राळविक्राळ रूप धारण करते. पूर्ण आयुष्य हे एक मोठी काळजी अथवा चिंता होऊन बसते.
सगळ्यात महत्वाचा फॅक्टर म्हणजे फिअर ऑफ अननोन. न्युरोटीपिकल मुलांच्या आई वडीलांनाही मुलांच्या भविष्याची काळजी असतेच. पण ती फारफार तर आपला मुलगा इंजिनिअर होईल की डॉक्टर. किंवा साईंटीस्टही चालेल. डॉक्टर आईबाप असतील तर आपला मुलगा डॉक्टर झाला तर बरे असे वाटेल. परंतू या सर्वामध्ये एक बेसिक गृहितक असते की तो काहीतरी होणार आहे. इंजिनिअर नाही झाला तर बीसीए, एम्सीए करेल. एम्बीबीएस नाही झाला तर बीएएमएस करेल.
१-२ BHK सदनिका पुणे भागामध्ये... गुंतवणूक रक्कम (४५ लक्ष)
नमस्ते,
मला गुंतवणूक सल्ला हवा आहे. मिपा कार जाणकार असल्याने सल्ला घेणे पसंत करतोय.
१ स्थावर मालमत्ता विकून नवी १-२ BHK सदनिका पुणे भागामध्ये स्वरुपाची गुंतवणूक करणेचे योजतोय. व्यक्तिगत शोध मोहीम सुरु आहेच. एखादा धागा मिळाला तर शोध सोपा होईल.
विशेष माहिती-::
गुंतवणूक रक्कम (४५ लक्ष)
पुणे भाग म्हणजे वाघोली-कात्रज-रावेत-मांजरी हद्द गृहीत धरतोय.
नवीन सदनिकेत राहण्याचा विचार अजिबात नाही.
४-५ वर्षांनी सदनिका विकणे हा विचार पक्का.
बांधकाम सुरु असलेले प्रकल्प चालतील. ताबा मिळण्याची गडबड नाही.
धन्यवाद!
अशांतिचे गाणे... (गीत.)
(चाल- ऐ दिल मुझे बता दे, तू किस पे आ गया है )
होतोच एकटा मी,राहिन एकटा ही
मन हे असेच वेडे,सांगून गूज पाहि॥धृ॥
तेथून गार वारा,शिडकावतो मनाही
निपचीतं शांत निजल्या,बोलावितो तनाही
आता कळून चुकले,काहिच शांत नाही॥१॥
मन हे असेच वेडे,सांगून गूज पाहि............॥धृ॥
शांती कशात आहे?,नक्की कुठे कळे ना!
देवात शोधली ती...सुरंहि तिथे जुळे ना!
वळले मलाहि तेथे,ती शोधण्यात नाही॥२॥
मन हे असेच वेडे,सांगून गूज पाहि............॥धृ॥
गेलो तिच्याही पाठी, नक्की कुठे कशी ती?
सारी मनुष्य जाती, वेडी तिच्याच साठी
कळले ही धावते ती,आमुच्या पुढे..न पाठी॥३॥
मन हे असेच वेडे,सांगेलं गूज गाठी॥धृ॥
सोडून नाद सगळा,ध
काव्यरस
वाहनविश्व: भाग ४ इंटर्नल कंबशन इंजिन्स
आधीचे भाग:
वाहनविश्व : भाग १ प्रस्तावना
वाहनविश्व : भाग २ इतिहास
वाहनविश्व: भाग ३ संरचना आणि विभागणी
इंजिन्स :
इंजिनं हे स्वयंचलित वाहनाचं ह्रुदय असतं. ह्याच्याचं धडधडीचं रुपांतर वेगवेगळ्या यांत्रिकी यंत्रणा वापरुन गतीमधे केलं जातं.निमोना
काल चतुर्थीचा उपास सोडण्यासाठी निमोना, पुर्या आणि सुधारस असा बेत होता. त्यातल्या निमोनाची पाकृ देतेय खाली. ही पाकृ कांदा-लसूण विरहित आहे त्यामुळे उपास सोडायला चालली. Smile
मला ही माझ्या एका उ.प्रदेशीय मैत्रिणीने दिली. अफलातून होते. आणि थंडीच्या दिवसातच ही करतात कारण मटार सुरेख आलेला असतो.ती याला व्रत का खाना म्हणते. Smile
तर चला- करूया निमोना.
साहित्यः- एक किलो मटार चे दाणे धुवून, एक तमाल पत्र,प्रत्येकी फक्त २ लवंगा, वेलदोडे,मिरी दाणे, १ हिरवी मिरची, पाव इंच आल्याचा तुकडा, जिरे, हिंग,धनेजिरे पूड पाव चमचा, साजूक तूप (अति महत्त्वाचे, तेल नको)
क्रुती: अत्यंत सोप्पी.
आपण यांना का खाल्लंत ?
पूर्वी, दूरदर्शनवर संध्याकाळी, 'आपण यांना पाहिलत का ?' या नांवाचा हरवलेल्या व्यक्तींचे फोटो दाखवणारा कार्यक्रम असे. त्यांत काही चेहेरे इतके भेसूर असत की माझ्या एका मित्राने, या कार्यक्रमाचे नांव, 'आपण यांना का पाहिलंत ?' असे ठेवले होते. पुढे अनेकवेळा बेचव वा विचित्र चवीचे अन्न खाल्यावर माझ्या मनांत, आपण यांना का खाल्लं ?' असा प्रश्न उभा रहात असे. तर अशा काही आठवणी सांगायचा बेत आहे. वाचक त्यांत आपापली भर घालतीलच.
लहान असताना, आमच्या शेजारी एक ख्रिश्चन सदगृहस्थ रहात असत. एका ख्रिसमसला त्यांनी आमच्या घरी एक केक आणून दिला.
कार्टून्स आणि कॉमिक्स
… १९९२ साल . बोलता बोलता शेजारचा नित्या मला म्हणाला ," काय येत तुमच्या सुपर कमांडो ध्रुव ला . आमचा नागराज विषारी फुंकर मारून दोन मिनिट मध्ये आडवा करेल त्याला ." मला पण चेव चढला . मी पण नागराज कसा घाणेरडा आहे हे सांगून तिथल्या तिथे परतफेड केली . शब्दाने शब्द वाढत गेला . बोलचाल बंद झाली . राज कॉमिक्स चे नागराज , परमाणु , डोगा हे कॉमिक्स नायक जाम प्रसिद्ध होते . पोरांनी आपले आपले हिरो निवडले होते . कंपू तयार झाले होते . दुसऱ्या नायकाचा चाहता हा शत्रू पक्षातला होता . नंतर मी गावातून बाहेर पडलो . नित्याशि संबंध संपला .
ही वाट भटकंतीची १३ : वेरुळ - अजिंठा (भाग १)
२०१३ च्या हिमाचल सहली नंतर एप्रिल ची कोकण ट्रीप सोडली तर २०१४ नोव्हे संपेपर्यंत फिरण्यासाठी खुप कमी वेळ मिळाला. कारण तसे खास होतेच कन्यारत्नामुळे आम्हाला बाकी संपुर्ण जगाचा विसर पडला होता. या काळात मी मिपा वरती नव्हतो, नेट वरती कुठेच नव्हतो.. नाही म्हणायला कंपणीतील कंपल्सरी ट्रीप मुळे गोव्याची ट्रीप आणि गोवा आवडल्याने नंतर केलेला दुधसागर ट्रेक वगळता कुठलीही भटकंती या काळात झाली नाही. त्याची कसर भरुन काढण्यासाठी यावेळेस राजस्थानच फायनल केले गेले होते. पण बाळ लहान आहे नको असे ग्रुहमंत्र्याकडुन मिळालेले कारण (ग्रुहमंत्र्यांचा स्वता राजस्थान दौरा झाल्याने आम्हाला नेहमी प्लॅन बदलावा लागत आहे..
निसर्ग, शेती आणि शेतकरी
अलिकडेच मिपावर उंटावरचे शहाणे की सरस्वतीची लेकरं हा लेख वाचला. त्यावर भरपूर प्रतिक्रीयाही आल्या. त्यानिमित्ताने मनात आलेले काही विचार...
शेतकरी हा एक अत्यंत अन्यायग्रस्त घटक अाहे अशी हाकाटी नेहमी एेकू येते़़. त्यात बर्याच प्रमाणात तथ्य आहेही. पण शेतकर्यांकडे परिक्षणाच्या दृष्टीने पाहिले तर बर्याच गोष्टी आश्चर्यकारकरित्या आपल्या समोर येतात. शेतकरी हे पूर्वी आपले व आपल्या कुटुंबाचे पोट प्रथम भरून मगच उरलेल्या उत्पन्नाची विक्री करायचे.
मिसळपाव