काल चतुर्थीचा उपास सोडण्यासाठी निमोना, पुर्या आणि सुधारस असा बेत होता. त्यातल्या निमोनाची पाकृ देतेय खाली. ही पाकृ कांदा-लसूण विरहित आहे त्यामुळे उपास सोडायला चालली. Smile
मला ही माझ्या एका उ.प्रदेशीय मैत्रिणीने दिली. अफलातून होते. आणि थंडीच्या दिवसातच ही करतात कारण मटार सुरेख आलेला असतो.ती याला व्रत का खाना म्हणते. Smile
तर चला- करूया निमोना.
साहित्यः- एक किलो मटार चे दाणे धुवून, एक तमाल पत्र,प्रत्येकी फक्त २ लवंगा, वेलदोडे,मिरी दाणे, १ हिरवी मिरची, पाव इंच आल्याचा तुकडा, जिरे, हिंग,धनेजिरे पूड पाव चमचा, साजूक तूप (अति महत्त्वाचे, तेल नको)
क्रुती: अत्यंत सोप्पी. मटार दाणे, आलं, मिरची मिक्सर मधून पेस्ट करून घ्या.
जरा जास्त तूप गरम करून त्यात जिरे, हिंग घाला. यात हळद नसते. मग सगळे खडे मसाले घाला. मटार पेस्ट त्यात परतून घ्या.धनेजिरे पूड, पाणी घाला आणि चवीपुरतं मीठ. ही भाजी पळीवाढी असते. खूप घट्ट किंवा पातळ नाही. आणि ही भाजी अगदी आयत्यावेळी करायची. थंड झाली की मजा नाही.
पुर्या आणि गरमागरम निमोना वाढा.आणि घरातल्यांचे तृप्त चेहरे पाहून खुश व्हा.
वि.सू: यात फार मसाले, तिखट काहीच नाहीये. तर्री वगैरे काहीच नाही. मटार आणि मसाले यांची अगदी मंद सुवासिक चव हीच या भाजीची खासियत आहे. उगीच खूप साहित्य घातलं तर ती चांगली न होता उग्र होते.
काही लोक यात कांदा, लसूण, बटाटा, टोमॅटो सगळं टाकतात, गरम मसाले वगैरे पण.आणि तेलात करतात. मग त्या भाजीला मटार पेस्ट घातलेला आलू-मटर म्हणतात. ;)अशी खरच करून पहा. आणि गरमच खा. साजूक तुपाची चव केवळ स्वर्गीय असते.
आता माझ्या मैत्रिणीने सांगितलेलं वर्णन सांगते ज्यामुळे ही भाजी करण्याच्या प्रेमात पडले मी...
अतिथंडीची पहाट बनारस मधली, चक्क ब्राम्हमुहूर्त. पहाटेचे ३.३०-४ ची वेळ. सगळीकडे प्रचंड धुकं. बोलायला तोंड उघडलं की वाफच दिसणार. सगळे लोक भल्या पहाटे सुस्नात होऊन काशी विश्वेश्वराचं दर्शन घेउन, पूजा करून बाहेर आलेत ती ही वेळ. मंदिराच्या रस्त्यावर दुतर्फा पूजासाहित्य, पुजारी, भक्तगण यांची लगबग आणि थंडीचा एक पहाटेचा मस्त वास. त्यातच फुलं, पूजासाहित्य यांचा एक दरवळ आणि ज्यांच दर्शन झालंय, त्या लोकांसाठी प्रसादासाठी उघडलेली दुकाने. यात काय असतं हो? तर मोट्ठ्या कढयांमधून रटरटणारा साजूक तुपातला निमोना आणि पुर्या. द्रोण भरून वाफाळणारा निमोना आणि पुर्या असं या वातावरणात जसं लागतं ते केवळ अवर्णनीय.
म्हणूनच शंभू महादेवांनी काशी ही माझी नगरी हे जाहीर केलं बहुतेक Wink
डिसक्लेमर- मी अजून काशीला गेलेली नाही.ज गेले असतील ते अजून काही सांगू शकतील.
वाचने
10996
प्रतिक्रिया
27
मिसळपाव
प्रतिक्रिया
भारी ! चविष्ट प्रकार !
भारीच वाटतेय आणि खूपच सोप्पी
मस्तच वाटतोय
अगदीच निराळी पाकृ आहे. फोटू
हल्ली फोटोशिवाय पाककृत्या
अरे असं काही नाहीये
In reply to हल्ली फोटोशिवाय पाककृत्या by सूड
मस्त! भन्नाट लिहितेस अगदी
निमोना!!
पाकृ नाव / सांगण्याची स्टाईल
अरे काय तू...
In reply to पाकृ नाव / सांगण्याची स्टाईल by दिपक.कुवेत
वाह वाह ! काय मस्त वर्णन !
धन्यवाद....
करुन पाहिला. फार आवडला हा
धन्स गं मधुरा
In reply to करुन पाहिला. फार आवडला हा by मधुरा देशपांडे
मस्त वाटतोय हा प्रकार
In reply to करुन पाहिला. फार आवडला हा by मधुरा देशपांडे
मस्त मस्त मस्त !
मी केला.. मी केला..
सुरेख वाटतोय ! करायला हवा.
मस्तच
मधुरा, फोटू छान आलाय.
मस्त पाकृ!
ओय्ये पैताई......
In reply to मस्त पाकृ! by पैसा
झक्कास !!!
तुम्ही
In reply to झक्कास !!! by चिपळूणकर
नको
In reply to तुम्ही by सविता००१
छान
मस्त!