Skip to main content

प्रश्न असा की......

लेखक चुकलामाकला यांनी शनिवार, 17/01/2015 22:34 या दिवशी प्रकाशित केले.
प्रश्न असा की ज्या प्रश्नाचे कधीच नसते सुचले उत्तर प्रश्न असा की ज्या प्रश्नाचे प्रश्नातच दडलेले उत्तर.. प्रश्न असा की मनात येता डोळे अलगद भरून यावे दुखरे आणिक हळवे उत्तर अश्रूंमध्ये वाहून जावे.. प्रश्न असा की सात्विक, दाहक, तेजस्वी कृष्णेसम कणखर प्रभेत त्या प्रश्नाच्या व्हावे द्रोण, भीष्म अन कृपही निरुत्तर.. प्रश्न असा की रुढींचा मृत सागर त्याने ढवळून जावा सत्य शुद्ध अन मांगल्याचा अभंग त्यातून तरून यावा.. प्रश्न असा की विश्वाच्या गर्भाला त्याने स्पर्शून जावे उत्तर त्याचे शोधू जाता सिद्धार्थांचे गौतम व्हावे..

आरती

लेखक सतिश गावडे यांनी शनिवार, 17/01/2015 21:29 या दिवशी प्रकाशित केले.
आज सकाळी कळव्यावरुन फोन आला. "मला गुरुजींसाठी आरती लिहायची आहे." मी म्हटलं चांगलं आहे; लिहा की. फोनवरचा आवाज अडखळला. मी काय झाले असे विचारताच "मी आता तांब्या पंथाची दीक्षा घेतली आहे. मला आरती लिहिणे जमणार नाही. तुम्ही लिहून दया ना." मी प्रयत्न केला. -------–------------------ अत्रुप्त आत्मा माझे आई स्थाण दयावे तुझे पायी तुझा तांब्या मी वाहीन तुझाच दास मी होईन गायछापाचा नैवैद्य तुजला जिलबीचा प्रसाद दे मजला जरी थांबेन मी दाबून नीट आतल्या आत पडेल पीठ येऊ दे माझी तुला करुणा लल्लल्लल्लल्ललू दयाघना अत्रुप्त आत्मा माझे आई स्थाण दयावे तुझे पायी

अभिवाचनयोग्य कथा सुचवा....

लेखक आपला अभिजित यांनी शनिवार, 17/01/2015 18:44 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रहो, जाहीर कार्यक्रमात अभिवाचन करता येतील, अशा मराठीतील काही वेगळ्या, दर्जेदार कथा सुचवता येतील? प्रसिद्ध कथाकारांच्या फारशा परिचित नसलेल्याही चालतील. फक्त त्या अभिवाचनयोग्य हव्यात. (थोडं वर्णन, थोडे संवाद, थोडं रंजन, असा मिलाफ साधणा-या.) आधी वाचलेल्या, कुणी सुचवलेल्या कथाही नमूद केल्या, तरी चालेल. अभिप्रायांच्या प्रतीक्षेत....

निथ साँग - निंदानालस्तीस मुक्त आणि शिवराळ एस्कीमोंची एक जुगलबंदी गायन-न्याय परंपरा

लेखक माहितगार यांनी शनिवार, 17/01/2015 14:52 या दिवशी प्रकाशित केले.
कशावरून कुणाच्या भावना दुखावल्या जातील याचा नेम नसतो म्हणून तर आपण मकर संक्रांतीला तीळगूळ घ्या गोड गोड बोला म्हणतो पण अवघ्या दिड - दोन महिन्यात धूलीवंदन आणि होळी येते आणि मग दिल्या घेतल्या शिव्यांची... मनमोकळी उधळण अधिकृतपणे करता येते. गोडगोड बोला हे कृत्रिम संस्कृतीकरण तर शिव्या देऊन मनमोकळे करणे हे अकृत्रिम आणि नैसर्गीक. हि होळीची शिवराळ परंपरा आपण होळीच्या निमीत्ताने जपतो तशीच एक वेगळी परंपरा एस्कीमो लोक जपतात त्या परंपरेला निथ साँग म्हणतात. एस्कीमोंच्या निथ साँगचे वेगळेपण ?

मॅनेजर आणि लिडर

लेखक जातवेद यांनी शनिवार, 17/01/2015 14:49 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्याला शाळेत असताना प्रश्न विचारायचे, तु मोठेपणी काय होशिल? आपण पण सांगायचो, इंजीनिअर, डॉक्टर. बास एवढच माहिती. माझ्या एका मित्राने साइंटिस्ट असे सांगून देखण्या मॅडमची वाहवा मिळवली होती. आत तो आयटी मधे हमाल आहे. असो. मी नोकरी चालू केल्यापासून मला नेहमी एक प्रश्न पडत आलाय, मी माझ्या क्षेत्रात पुढे काय बनेन, मॅनेजर कि लिडर? कि दोन्ही? म्हणजे मी ऑन रोल मॅनेजर असेन पण माझ्या हाताखाली काम करणारे कर्मचारी मला काय समजतील? आता कितीही प्रयत्न केला तरी कोणी आदर्श (लोकप्रिय नव्हे) मॅनेजर बनू शकत नाही. मान्य.

पॉझिटीव्ह दृष्टीकोन ठेवण्यासाठी मदत

लेखक स्वमग्नता एकलकोंडेकर यांनी शनिवार, 17/01/2015 00:23 या दिवशी प्रकाशित केले.
** हा लेख म्हणा, किंवा मदतीचा हात मी मागितला नोव्हेंबरमध्ये. प्रथम मायबोलीवर लिहीला होता, तिथे भरपूर चांगले सल्ले मिळाले.इच्छुकांनी जरूर वाचावेत. मला खूपच आधार व उभारी मिळाली. नोव्हेंबरमध्ये हा लेख लिहीण्याअगोदर ३-४ महिने अजिबातच पॉझिटीव्ह राहायला जमत नव्हते. खूप काळजी, स्ट्रेस सतत. कोणाशी हसून खेळून बोलणं अगदीच बंद झाले होते. मात्र ही मदत मागितली, खुलेपणाने जवळच्या मैत्रिणी व नातेवाईक यांच्याशी चर्चा करून त्यासर्वांवर विचार करून, मी गेले दोन-तीन महिने सातत्याने पॉझिटीव्हच विचार करण्याचा प्रयत्न करत आहे.

बहिष्कार

लेखक बोका-ए-आझम यांनी शुक्रवार, 16/01/2015 22:02 या दिवशी प्रकाशित केले.
http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/thane-kokan/news/art… आजच्या महाराष्ट्र टाईम्स आणि टाईम्स आॅफ इंडिया मध्ये आलेली ही बातमी आहे. राहुल येलांगे आणि त्यांची पत्नी पूर्णिमा यांना त्यांच्या गावाने बहिष्कृत केलेलं आहे. रायगड जिल्ह्याच्या पोलादपूर तालुक्यात हे गाव आहे. राहुल येलांगे गिर्यारोहक असून पूर्णिमा येलांगे सायबर लाॅ या विषयातल्या तज्ञ आहेत. गावक-यांचा आक्षेप त्यांनी नोंदणी पद्धतीने विवाह केला तेव्हापासून सुरू झाला. हा विवाह आंतरजातीय आहे असं गावक-यांना वाटलं म्हणे!

कथा-कॉलेज कट्टा भाग ३

लेखक चेतन677 यांनी शुक्रवार, 16/01/2015 20:00 या दिवशी प्रकाशित केले.
मागील भाग कथा-कॉलेज कट्टा भाग १ कथा-कॉलेज कट्टा भाग 2 या कथेतील घटनाक्रम हा पुर्णतः काल्पनिक आहे. दुसरा दिवस उजाडला.पहिले लेक्चर होते ते मॅन्युफॅक्चरींग प्रोसेसचं म्हणजेच म्हात्रे सरांचं.त्या दिवशी ज्ञानेश्वर आणि अभिला यायला जरा उशीर झाला.त्यांची आवडती जागा म्हणजेच मधल्या रांगेतला तो तीन नंबरचा बाकावर आधीच अखिल बसला होता.पण आज त्याच्याशेजारी प्राची नव्हती कदाचित ती अजुन आली नव्हती.ज्ञानेश्वर पटकन अखिलच्या शेजारी बसला.मग त्य

'आपलेपणाला' / आपला माणूस

लेखक पगला गजोधर यांनी शुक्रवार, 16/01/2015 17:18 या दिवशी प्रकाशित केले.
ऐका वृत्तपत्रातील बातमीनुसार खालील बातमी प्रसिद्ध झाली आहे "एखाद्या भारतीयवंशाच्या व्यक्तीने यश प्राप्त केल्यानंतर त्या व्यक्तीचं भारतीयांकडून प्रचंड कौतुक केलं जातं आणि त्याचं हे भारताचंच यश असं चित्र आपण रंगवतो. मात्र भारतीयांच्या या 'आपलेपणाला' लुइसियानाचे गर्व्हनर बॉबी जिंदल यांनी चांगलीच चपराक देत, भारतीयांच्या खोट्या अभिमानाला जमिनीवर आणले आहे. दुहेरी ओळख ठेवण्यात माझा बिलकूल विश्वास नाही, मी पूर्ण अमेरिकी आहे, अशा कडक शब्दात आपण भारतीय वंशाचे आहोत ही ओळख बॉबी जिंदल यांनी खोडून काढली आहे.

मिपा हे नविन सदस्याकरीता अडचणीचे तर ठरत नाहीये ना??

लेखक Sanjay Kokare यांनी शुक्रवार, 16/01/2015 15:33 या दिवशी प्रकाशित केले.
कालच मी मिपा चा सदस्य झालो. सदस्य झाल्या नंतर मी माझे लेख, कविता वैगेरे मिपा फळावर टाकल्या. मला वाटल येथील सर्वच जण अभ्यासु असतील व त्यांच्या कडुन मला चांगले मार्गदशन लाभेल. व मला माझ्या द्न्यानात अजुन भर टाकता येईल . म्हणुन मला माहीती नसलेल्या विषयावर माहीती मिळवण्यासाठी मी एक चर्चेसाठी एक विषय ही टाकला. मला त्या विषयाबद्दल मला जास्त माहीती नसल्यामुळे ती पोस्ट मी अत्यंत लहान टाकली होती.