व्हर्जिनिया वुल्फचे ‘अ रूम ऑफ वन्स ओन’
व्हर्जिनिया वुल्फची ओळख विसाव्या शतकातली प्रसिद्ध कादंबरीलेखक आणि समीक्षक म्हणून आहे.
स्त्रीवादी समीक्षेचा पाया रचणार्यांमधलं हे एक महत्त्वपूर्ण नाव. सर्वसाधारणतः समीक्षा म्हटलं की, किचकट विषय, बोजड भाषा असा समज असतो आणि त्यामुळे त्या वाटेला जाणं टाळलं जातं. वुल्फचं ‘अ रूम ऑफ वन्स ओन’ हे समीक्षेच्या प्रांतातलं गाजलेलं पुस्तक. साध्या परंतु उपहासात्मक शैलीत लिहिलेलं. वुल्फने याद्वारे स्त्रियांना लेखन करण्यासाठी लागणारा वेळ, जागा आणि पैसा या तीन आवश्यक घटकांकडे लक्ष वेधलं आहे.
त्याशिवाय स्त्रियांच्या लेखनाबद्दल मूलभूत असे विचार मांडले आहेत. हे विचार 1929 मधले.
विशेष
मिसळपाव
पुस्तकं वाचायला सर्वांनाच आवडतात पण आपल्याला ही पुस्तके कोणामुळे वाचता येणे शक्य झाले आहे हे मात्र बर्याच जणांना माहित नसते. त्याच कलंदर अवलियाची ही ओळख!
१५व्या शतकाचा सुरुवातीचा काळ! र्हाइन आणि माइन नद्यांच्या संगमावर वसलेलं छोटंसं टुमदार गाव, 'माइन्झ'! फ्रिडरिश ( फ्रिलं) ग्लेन्सफ्लाइश आणि एल्स वायरीश हे सोनारकाम करणारे दांपत्य तिथं सुखानं नांदत होते. त्यांना तीन मुले फ्रिलं (ज्यु), एल्स (ज्यु) आणि सगळ्यात धाकटा योहानेस (योहान)!
कुठूनी उतार नाही
कुठूनी चढाव नाही
रूसली ही पोर तिच्या
भावनांना वाव नाही
तोच तोच दिवस रोज
विसाव्याची बात नाही
गंधाळिल्या मोग-याची
पुन्हा तशी रात नाही
साचलेल्या पाण्याला या
कुठूनी प्रवाह नाही
रूसली ही पोर तिच्या
भावनांना वाव नाही
उन्हाने जो गेला पारा
आरशाला भाव नाही
आठवांची सांज होई
आसवांचा ठाव नाही
खुलले ना शेर अता
गझलेला दाद नाही
हरविले शब्द तिचे
तिची तिला याद नाही
याद नाही दाद नाही
कवितेला नांव नाही
रूसली ही पोर तिच्या
भावनांना