मेथी उडीद वड्यांची भाजी
मेथी उडीद वड्यांची भाजी हे नाव ऐकून काही विचित्र वाटेल, पण आज सकाळी हीच सौच्या कृपेने खायला मिळाली. अत्यंत स्वादिष्ट लागल्यामुळे ही कृती इथे देत आहे. कालपासून दिल्लीत थांबून थांबून पाऊस पडत आहे. १५ मार्च झाला तरी रात्री रजई अंगावर घ्यावी लागते आहे. सकाळी ढगाळ वातावरण होते. सौ. मेथी निवडत होती. मी म्हणालो, चार पाच दिवसांपासून, रोज रोज तेच तेच गाजर-मटार, फुलगोबी, वांगे (घ्या मौसमात या भाज्या स्वस्त मिळतात) खाऊन कंटाळळो आहे. सुक्या बनविता येत असल्यामुळे, ऑफिसच्या डब्यात ह्याच भाज्या खायला मिळतात.
मिसळपाव