Skip to main content

ग्लोबल हॅपीनेस इंडेक्स

लेखक पुष्कर विजयकुमार जोशी यांनी सोमवार, 16/03/2015 15:12 या दिवशी प्रकाशित केले.
"ए बारक्या, ते तेल बाटलीत काढून ठेव, उद्या लागेल", दिवसभर जीलेब्यांचे घन काढून थकलेला राक्या बोलला. रात्रीचा थंड वाऱ्यात त्याला आत्ताच पेंगायला होत होतं. दिवसभराच्या वाहतुकीनंतर शांत झालेला रस्ता. राक्याच्या गाडीच्या बाजूलाच पान टपरी, तिथे २-३ लोक सिगारेटी ओढत बसलेले. पान टपरीवाला थोडा रसिक पट्टीतला असावा, त्याच्या टपरीवर नुस्रत चे गाणे चालूए… वोह हटा रहे है पर्दाह, सर-ए-बाम चुपके चुपके… एका उंची दुचाकीवरून एक मुलगा उतरतो, "एक माईल्ड भाऊ" त्याचा फोन वाजतो. "हं बोला सर" इकडे राक्याची आवरा-आवर चालू आहे.

भजन - भक्तीचा डिज्जे (विडंबन - फेविकॉल से)

लेखक वेल्लाभट यांनी सोमवार, 16/03/2015 15:00 या दिवशी प्रकाशित केले.
काव्याची मूळ प्रेरणा ही डीज्जे बिज्जे विषय चालू केले, तर त्यावर एक भजन कम गाणं सुचलंय. बघा कसं वाटतं. चाल तीच; चिपकाले फेविकॉलसे वाली. हसत घ्या. संदर्भ लागण्यासाठी मूळ ओळी कंसात दिल्या आहेत. रस्त्यावर ज्या त्या बघा मंडप उभारले (अंगडाईया...) रुपात देणगीच्या किती पैसे काढले (उह आह...) आता आला तो दिवस (मै तो चलू...) फेडू सारे हो नवस (की मच जाए...) भक्तांच्या भेटीला बाप्पा बघा आले (होश वाले भी...) आले आले रे.....
काव्यरस

भ्रष्ट झाला कोळसा

लेखक चुकलामाकला यांनी सोमवार, 16/03/2015 14:34 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा सद्य परिस्थिती आणि अर्थातच श्रीगुरुजी यांचा लेख स्पर्श 'हाता'चा विखारी भ्रष्ट झाला कोळसा फ़ेकता तो कृष्ण पैसा शुभ्र झाला कोळसा भूक अन आक्रोश सारा मूक गर्भी दडपला वंचितांच्या वेदनेने अश्म झाला कोळसा संपली ती युगप्रतीक्षा खोदुनी वर काढला पाहुनी प्रेते सभोती भस्म झाला कोळसा क्रांतीच्या का वल्गना करिती फुकाचे धनिक हे पोचता त्यांच्या खिशातच थंड झाला कोळसा आजवरी मनमोहनाला आदराने वंदिले काजळी त्याच्याही हाता, खिन्न झाला कोळसा जाळण्या होळी खलांची फिरुनी जमवा लाकडे पेटण्याच्या सोहळ्याला सज्ज झाला को

काठी

लेखक शिवोऽहम् यांनी सोमवार, 16/03/2015 14:11 या दिवशी प्रकाशित केले.
त्या दिवशी दिवेलागणीच्या वेळी शीळ घालत अंगणात रिंगणं घालत बसलो होतो. आधी काठीनं टायर पळवत नेत होतो तेव्हा कान धरून अनीलदादानी घरी आणलं. पण एका जागी किती वेळ बसणार? म्हणुन ही रिंगणं. पण त्यातही खुस्पटं काढेलच कोणीतरी! काय तर म्हणे संध्याकाळी शिट्ट्या मारू नका. का? तर ती राक्षसांची वेळ! जणु काही माझी शिट्टी ऐकली की येतात ते लगोलग. काहीही करा, आहेच काहीतरी उपदेश. कडी वाजवु नको-भांडणं होतात, पायावर पाय टाकुन झोपु नको-आईबापाला त्रास होईल, पालथी मांडी घालु नको-काय माहित काय होईल. हे सगळं कसं लक्षात ठेवायचं कुणास ठाउक. वर आजी म्हणते की भांडणं व्हायला कारण स्वभाव आहेत, दुसरं काही नाही.

गर्भपातल्या रानी .....!

लेखक गंगाधर मुटे यांनी सोमवार, 16/03/2015 09:24 या दिवशी प्रकाशित केले.
गर्भपातल्या रानी .....!

गारपीटीच्या अंगसंगाने
गर्भपातल्या रानी
अश्रू होऊन हवेत विरले
पाटामधले पाणी

एका एका झाडावरती
पक्षी हजारो होते
क्षणात पडले सड्याप्रमाणे
सरली सारी कहाणी

हातामधला हात सुटूनी
घरटे विच्छिन्न झाले
बुंध्याभवती जमीन नहाली
रक्ताळल्या पिलांनी

ऊस झोपला, कापूस निजला
खुरटून गेल्या बागा
जगण्या-मरण्यामधले अंतर
उरले नसल्यावाणी

शाबूत उरल्या धान्यवखारी
बंगले, महालमाडया

लयास गेले कधीच ते -

लेखक विदेश यांनी सोमवार, 16/03/2015 09:00 या दिवशी प्रकाशित केले.
लयास गेले कधीच ते रामराज्य ह्या भूमीवरचे आता इथल्या रामातही काही उरला नाही राम .. रावण पैदा झाले इथे सीताही जिकडे तिकडे वानरसेना बहुत जाहली म्हणती न कुणि राम राम .. संकटात जरि असते सीता मदतीला कुणि धावत नाही आता इथल्या सीतेलाही शोधत नाही कुठला राम .. महिमा कलीयुगाचा ऐसा मिळून राहती रावण राम सीता रडते धाय मोकलुन झाले सगळे नमक हराम .. .

'च', 'ज' चा उच्चार

लेखक लई भारी यांनी सोमवार, 16/03/2015 08:18 या दिवशी प्रकाशित केले.
'च' या वर्णाचा उच्चार दोन प्रकारे केला जातो. जसे 'चव', 'चौकशी' इ. मध्ये किंवा 'वाचन', 'चहा' यामध्ये 'च्य' सारखा. चमचा चा उचार दोन्ही साधे 'च' प्रमाणे करत आलोय, पण काही ठिकाणी विशेषतः बोलीभाषेत 'चमच्या' किंवा प्रमाण भाषेत सुद्धा 'चमच्याने' असे ऐकले आहे. तसेच 'ज' चे देखील दिसते. उदा. जवस/जनता, यासाठी काही नियम आहे का? शालेय जीवनात असे काही शिकवले असल्यास निश्चित दुर्लक्ष झाले आहे :) जाणकारांनी प्रकाश टाकावा.

सोनुलं

लेखक ऊध्दव गावंडे यांनी रविवार, 15/03/2015 22:53 या दिवशी प्रकाशित केले.
कायं झालं कसं झालं नाई काईचं कयलं, उभ्या पिकाचं वावरं यकायकी उलंगलं १ आता लोकं डोयापुळे होतं चांदनं खेयतं, यकायकी कुठूनं हा आला अंधार पयतं २ रेती थापटूनं खोपे किती पायावरं केले, पायं काळतां भाईरं सारे खचूनचं गेले ३ मनातले मांडे सारे मनातचं रायले , पोटरकी धांडे नाई ते नाईचं निसयले ४ झाळं पळलं वार्यातं आता कुठची सावली, गेला उळूनं सोनुला रडं रडली माऊली ५

कधीही वाजणारे डी.जे. एक डोकेदुखी.......

लेखक चेतन677 यांनी रविवार, 15/03/2015 21:09 या दिवशी प्रकाशित केले.
आज रविवार असल्याने सहज बाहेर फेरफटका मारायला चाललो होतो.तर अचानक डी.जे. चा कर्णकर्कश आवाज ऐकु आला.विचार केला की आज काही दसरा दिवाळी नाही,ना कुणाची जयंती वा पुण्यतीथी...मग कळाले की कुणाचा तरी मुलाचा पहिला वाढदिवस होता. खरंच आज काहीही झाले तरी डी.जे. लागतोच का??? ज्या उद्देशाने लोकमान्य टिळकांनी गणपती बसवुन गणपती जन्मोत्सव साजरा करायला सांगितला तो उद्देश खरंच सफल झालाय क?? अशा सणांच्या वेळी गणपतीचे गाणे लावण्याऐवजी चिपकादे फेविकॉलसे" यासारखे गीत वाजवले जाते.डॉ.बाबासहेब आंबेडकर हे एक थोर पुरुष होते.परंतु त्यांच्या जयंतीच्या वेळी असाच डी.जे.

दोन वात्रटिका (मार्च १५)

लेखक विवेकपटाईत यांनी रविवार, 15/03/2015 18:33 या दिवशी प्रकाशित केले.
झाडूने स्वच्छ केला कचरा कमळ फुलांचा स्वच्छता अभियानाचा राजा तोच ठरला. फ्रीची वीज फ्रीचे पाणी. रात्र अंधारी घाघर रिकामी. (मी जिथे राहतो त्या गल्लीत पाणी येत नाही, पुढील ५ वर्षे पाणी येण्याची संभावना ही नाही- कारण पाणी देण्याचा वादा केलेला नाही -२.५० कोटीच्या दिल्लीत १ कोटी लोकांच्या घरी पाणी येत नाही, अर्थातच पाणी मिळाले तरी लोकांच्या घरी पोहचवता येणार नाही या साठी जवळपास पूर्ण यंत्रणा दुरुस्त करावी लागेल किंवा नवीन यंत्रणा उभारावी लागेल अंदाचे दहा बारा हजार कोटी खर्च येईल.