मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कधीही वाजणारे डी.जे. एक डोकेदुखी.......

चेतन677 · · काथ्याकूट
आज रविवार असल्याने सहज बाहेर फेरफटका मारायला चाललो होतो.तर अचानक डी.जे. चा कर्णकर्कश आवाज ऐकु आला.विचार केला की आज काही दसरा दिवाळी नाही,ना कुणाची जयंती वा पुण्यतीथी...मग कळाले की कुणाचा तरी मुलाचा पहिला वाढदिवस होता. खरंच आज काहीही झाले तरी डी.जे. लागतोच का??? ज्या उद्देशाने लोकमान्य टिळकांनी गणपती बसवुन गणपती जन्मोत्सव साजरा करायला सांगितला तो उद्देश खरंच सफल झालाय क?? अशा सणांच्या वेळी गणपतीचे गाणे लावण्याऐवजी चिपकादे फेविकॉलसे" यासारखे गीत वाजवले जाते.डॉ.बाबासहेब आंबेडकर हे एक थोर पुरुष होते.परंतु त्यांच्या जयंतीच्या वेळी असाच डी.जे. वाजवुन त्या तालावार दारु पिऊन नाचतात.या थोर पुरुषांनी नेमकं काय काम केल? याच्याशी या लोकांना काहीही देणं घेणं नसतं.त्यांना फक्त डी.जे.लावायला आणि त्यावर ठेका घ्यायला केवळ एक मुहुर्त पाहिजे असतो.यावर नक्कीच सर्वांनी विचार करणे गरजेचे आहे.आणि आपल्या संस्कृतीचे सर्वांनी जतन करावे.

वाचन 10665 प्रतिक्रिया 0