Skip to main content

गोरखगड

लेखक बज्जु यांनी बुधवार, 18/03/2015 11:06 या दिवशी प्रकाशित केले.
जवळ जवळ १६-१७ वर्ष झाली असावीत गोरखगडाला भेट देऊन. या रविवारी काही झाल तरी गोरखगडला जायचच अस ठरवुन सुध्दा दोन रविवार जमल न्हवतच. मात्र येत्या रविवारी सर्व प्रकारचे योग जुळून आले आणि सकाळी सहा वाजता आम्ही निघालो. मी, सुजीत, मंदार आणि मन्यामामा. त्यापैकी मंदार पार्ल्याहुन तर मन्यामामा डोंबिवलीहुन येणार होते. मंदारनी त्याच्या गाडीतून मला आणि सुजीतला नितीन कंपनी फ्लायओव्ह्रर जवळ ऊचलले आणि आम्ही कल्याणच्या दिशेने निघालो. मन्यामामा अर्ध्या तासात कल्याणला पोहोचतो बोलला.

एनआरआयची भारतभेट..

लेखक गवि यांनी बुधवार, 18/03/2015 11:04 या दिवशी प्रकाशित केले.
मिलिंद बोकिलांचं झेन गार्डन बर्‍याच काळाने पुन्हा उघडलं आणि पायर्‍या ही गोष्ट वाचली. सिंगापूरमधे कष्टाने सेटल झालेला बिझनेसमन श्रीपाद बर्‍याच वर्षांनी भारतात आपल्या एका मैत्रिणीला, जयाला आणि तिच्या फॅमिलीला फाईव्ह स्टार हॉटेलात भेटतो. जयाचा नवरा अशोकसुद्धा पूर्वी चळवळीतच असतो. तेव्हाचे त्यांचे संदर्भ, तरुण वयात चळवळीत असणारे हे तिघे आणि त्यांच्या इतर मित्रांचे संदर्भ.. आणि आताची वागणूक.

नक्षीची दुसरी बाजू..

लेखक सूड यांनी बुधवार, 18/03/2015 11:03 या दिवशी प्रकाशित केले.
नक्षीची दुसरी बाजू. महिला दिन विशेषांकातली नक्षी ही सर्वात आवडलेली कथा!! पण कुठेतरी एकांगी वाटली. बाई दिवसभर राबत असते मान्य, पण पुरुषही हातावर हात ठेवून बसलेले नसतात. त्यांनीही स्वत:च्या आवडीनिवडी मागे टाकलेल्या असतात.

गुढीपाडवा आणि तरुणाई...

लेखक bharatm यांनी बुधवार, 18/03/2015 10:25 या दिवशी प्रकाशित केले.
गुढीपाडवा आणि तरुणाई... हवी-हवीशी वाटणारी थंडी मावळत आलेली असते आणि धगधगता उन्हाळा होळीचे रंग उधळून मराठी नववर्षाचे स्वागत करण्यासाठी चक्क निसर्गालाच खुणावत असतो. हिंदू कालगणनेनुसार चैत्र मास आपल्या सोबत नवे वर्ष घेऊन येतो. नवी स्वप्ने, नव्या आशा-आकांक्षा याबरोबरच नवं काहीतरी करण्याचा उत्साह, एखादी मोठी खरेदी किंवा गुंतवणूक करण्याचा हा शुभ दिवस म्हणजेच गुढीपाडवा. अशा या मंगलदिनी आपल्या संकल्पकार्याचा शुभारंभ करायला मिळणे ही प्रत्येकासाठीच आनंदाची आणि समाधानाची बाब असते. चैत्र महिन्यातील शुक्ल प्रतिपदेला साजरा होणारा गुढीपाडवा साडेतीन मुहूर्तापैकी एक मनाला जातो.

पुस्तक परिचय - अमलताश

लेखक पारुबाई यांनी बुधवार, 18/03/2015 10:11 या दिवशी प्रकाशित केले.
वनवास, शारदा संगीत सारखी मराठी साहित्यातील अभिजात कलाकृती लिहिणारे लेखक प्रकाश नारायण संत (भालचंद्र दिक्षित) यांच्या पश्च्यात त्यांच्या पत्नीने, सुप्रिया दीक्षित (पूर्वाश्रमीच्या सुधा नंदगडकर) यांनी लिहिलेले हे आत्मचरित्र. अमलताश हे एका झाडाचे हिंदी नाव आहे. त्याला मराठीमध्ये बहावा असं म्हणतात.लेखिका सुप्रिया आणि त्यांचा नवर्याच्या आवडीचे हे झाड. इंदिरा संत यांची हि थोरली सून. पुस्तकात सुप्रिया यांचे बालपण, तरुणपण, डॉक्टरकीचे शिक्षण, प्रकाश नारायण संत यांच्याबरोबरचे भावविश्व, त्यांचे कौटुंबिक जीवन आणि आयुष्यात आलेले चढउतार या सर्वाचा प्रवास आहे.

गुरुजिंचे भावं विश्व! भाग- ३६ (विवाह विशेष...-३..अंतिम.)

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी बुधवार, 18/03/2015 02:32 या दिवशी प्रकाशित केले.
मागिल भाग.. " बरं बरं...असू दे हो...असू दे. आता उद्या पुतण्याला आशिर्वाद देताना..असच तुझ्यासारखं जागं-कर..,म्हणजे झालं...क्काय????" पुढे चालू... ================================= हा सर्व संवाद माझ्या मनात अमृतासारखा झिरपत होता..आणि मी त्याच चिंतनमय अवस्थेत कधी शांत झोपि गेलो,ते कळलंही नाही. .............................................. कोकणात पहाटे एखादं लग्नघरच काय?..परंतू सर्व गाव, आजंही तसं लवकरच उठत असतं.

दर्शन

लेखक शिव कन्या यांनी बुधवार, 18/03/2015 00:04 या दिवशी प्रकाशित केले.
गवताच्या एका पात्याने पिंपळाच्या प्रचंड सावलीकडे तक्रार केली, 'तू सारखी इकडून तिकडे हलत राहतेस, माझी शांतता भंग पावते!' सावलीने उत्तर दिले, 'मी हलत नाही. जरा वर पहा, तिथे एक झाड आहे आणि ते वाऱ्याने चहूबाजूंनी हलते!' गवताच्या पात्याने आपले इवलेसे डोळे वर करून पहिले........ ........ आणि जीवनात पहिल्यांदाच त्याला आपल्यावरील वृक्षाच्या विराट रूपाचे दर्शन घडले! ते पाते मनातल्या मनात म्हणाले, ' माझ्यापेक्षा हे गवत खूप विशाल आहे!' ..... तेव्हापासून ते पाते शांतचित्त झाले. खलील जिब्रानच्या 'The Shadow'या लघुकथेचा भावानुवाद.

..नका जाऊ देऊ राया दुपार ही वाया..

लेखक कानडाऊ योगेशु यांनी मंगळवार, 17/03/2015 23:01 या दिवशी प्रकाशित केले.
डेरेदार वृक्षांची ह्या पडे गर्द छाया.. नका जाऊ देऊ राया दुपार ही वाया.. बुजगावणेही डोळे मिटुनि निवांत पाखरांच्या संगतीत उभारले शांत दूर पास नाही कोणी दोघांस पहाया.. रोमरोम मोहरते तनु माझी बाई.. मोहरली आहे जशी गर्द आमराई.. कोकिळही गातो आहे मन रिझवाया.. तुमच्या तनुला येता शेताचा सुवास.. मनातले पाखरु अन होते कासावीस.. मन उतावीळ झाले पिंजर्यात जाया... सावलीत सावली ही एकरुप झाली. दुपारीच चांदण्यांची बरसात झाली. शेतसुगंधाने झाली तृप्त माझी काया.. ----- योगेश

बस मी आणि बाळ

लेखक शब्दानुज यांनी मंगळवार, 17/03/2015 22:06 या दिवशी प्रकाशित केले.
बसमध्ये धक्के खात उभा होतो आसनस्थ होण्याचा मार्ग शोधत होतो आसनस्थ झाल्यावर खिडकी शोधु लागलो प्रवासात या अपेक्ष्ांचे सामानही बाळगलो सगळ मिळवुनही धक्के लागतच होते सवयीप्रमाणे डोळे सर्वत्र फिरत होते समोरच्या सिटवर बाळाला हसताना पाहिले पण हसण्याचे कारण नाही गवसले अपेक्ष्ांचे सामान त्याच्यासोबत दिसले नाही म्हणुनच हसण्याला कारणही लागले नाही पुढच्या प्रवासातही धक्के बरेच बसले पण गालावरचे हसु तसेच राहिले.

पुस्तक परिचय - आग्र्याहून सुटका भाग 2

लेखक शशिकांत ओक यांनी मंगळवार, 17/03/2015 20:51 या दिवशी प्रकाशित केले.

पुस्तक परिचय - आग्र्याहून सुटका भाग 2

पुस्तकाच्या मुखपृष्ठाचे चित्र 3

नव्या प्रमेयाप्रमाणे -

1. शिवाजी महाराजांनी आग्र्याची नजरकैद हवेली 22 जुलैलाच सोडली! 2. महाराज नंतर धौलपुर, ग्वालेर, नरवर, सिरोंज, शिवपुरी, कोलारस, बदरवास करून 15 दिवसाच्या प्रवासात 250 मैल अंतरावर शहादरा गावात सुखरूप पोहोचले. त्यानंतर त्यांनी कळवल्यावर संभाजीराजांना हवेली बाहेर सुरक्षित स्थळी म्हणजे मथुरेला पाठवण्याचे संदेश महाराजांनी दिले. हा गुप्त संदेश 15 ऑगस्टला आग्र्यात मिळाला व सर्व लगेच कामाला लागले.