विरुपाक्षी, बंगारू तिरुपती आणि कोटिलिंगेश्वर
विरुपाक्षी हे कोलार जिल्ह्यातील एक छोटेसे गाव आहे. हे मुलबागलपासून ५ किमी अंतरावर असून, इथे तेराव्या शतकातील एक प्रशस्त शिव मंदिर आहे. हे मंदिर कृष्णदेवराय दुसरे ह्यांच्या कारकिर्दीत बांधले गेले. ह्याची रचना हंपीतिल विरुपाक्ष मंदिराप्रमाने असल्याचे सांगण्यात येते. (हम्पी मी अजून पाहिले नाही तेंव्हा जाणकारांनी ह्यावर प्रकाश टाकवा.) ह्या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे, इथे एकाच गर्भगृहात दोन शिवलिंगे आहेत. आणि ह्यातील एका शिवलंगाचा रंग सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत बदलत राहतो. मी तिथे दुपारी तासभर होतो तेंव्हा ह्याची शहानिशा करता आली.
मिसळपाव