Skip to main content

अंधार क्षण भाग ५ - जॅक्स लेराॅय (लेख २७)

लेखक बोका-ए-आझम यांनी बुधवार, 27/05/2015 19:29 या दिवशी प्रकाशित केले.
अंधार क्षण - जॅक्स लेराॅय (लेख २७) आज जेव्हा नाझींचं चित्रण केलं जातं - टेलिव्हिजनवर किंवा चित्रपटांमध्ये - तेव्हा नाझीवादाचा संबंध फक्त जर्मनीशी जोडला जातो. नाझीवादाने जर्मनीबाहेरच्या अनेक लोकांवर भुरळ टाकली होती हे सोयिस्करपणे विसरलं जातं. अगदी ब्रिटन आणि अमेरिकेतही नाझीवादाचे आणि फॅसिझमचे चाहते होते. ब्रिटनमध्ये सर ओस्वाल्ड मोस्ले आणि स्वीडनमध्ये पेअर एन्गडाल यांनी फॅसिस्ट संघटना स्थापन केल्या होत्या आणि या संघटनांना चांगला लोकाश्रय लाभला होता. नाझींमध्येही सर्वचजण कट्टर होते असं म्हणता येणार नाही. हिटलरलाही याची कल्पना होती.

जकार्ताच्या आठवणी : ७ : तमन सफारी

लेखक आकाश खोत यांनी बुधवार, 27/05/2015 19:14 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ भाग २ भाग ३ भाग ४ भाग ५ भाग ६ आतापर्यंत माझे इंडोनेशियामध्ये २ आठवडे चांगले गेले होते. माझी ट्रिप अर्धी संपली होती. तसेच कामाचा महत्वाचा भागसुद्धा संपला होता. आता ऑफिसमध्ये जरा निवांत वेळ चालला होता.

मॅगो कस्टर्ड पुडींग

लेखक निवेदिता-ताई यांनी बुधवार, 27/05/2015 18:31 या दिवशी प्रकाशित केले.
या मोठ्या सुट्ट्या म्हणजे रोज आईने काहीतरी नविन बनवावे असे मुलांना वाटते. आंब्याचा सिझन सुरुच आहे तर विचार केला आज पुडींगच बनवावे. साहित्य- 6 स्लाईस ब्रेड, एक पारले जी छोटा पुडा, क्रीम बिस्कीट 10 वाला एक पॅक, मोसंबी एक, हापूस आंबे दोन, कस्टर्ड पावडर दोन चमचे, दूध अर्धा लिटर, काजू-बेदाणे आवडीनुसार, - -कॄती -- प्रथम थोड्या दुधामध्ये कस्टर्ड पावडर घालून गुठळी न होता शिजवुन घ्या ( मी व्हॅनीला फ्लेवर घेतलाय)..त्यामध्ये राहिलेले दुधही घालून गार होण्यासाठी बाजूला ठेवुन द्या. ज्या भांड्यात पुडींग सेट करायचे आहे ते घ्या..मी कुकरमधील डबा घेतलाय.

मॉडर्न अभंगवाणी

लेखक विनीत संखे यांनी बुधवार, 27/05/2015 17:50 या दिवशी प्रकाशित केले.
असावा शेजा-याचा आंग्ल पेपर । वाचावा तोचि न खर्चिता स्वधन ॥ पेपरसंगे ग्राह्य दूध वाटि एक । साखरेजोडि तेहि मागावे ॥ संगणक अभियंता होशिल तू । विठुमाझा करिल चमत्कार ॥ फक्त परीक्षेअंती निकाल । केटि न लागु द्यावी ॥ महाविद्यालये टि-शर्ट आणि जीन्स । जेतुके फाटके तेतुके स्टायलिश ॥ ओळखावे कन्यकांचे जमाव । पाहावे प्रत्येकीस सांगोपांग ॥ किकेटी असावी भल्यांची भरती । करावे कसे बुकी-फिक्सिंगचे उच्चाटन?
काव्यरस

गांधी भेटला होता कविता आवडली का ?

लेखक खटासि खट यांनी बुधवार, 27/05/2015 10:45 या दिवशी प्रकाशित केले.
मला गांधी भेटला होता ही कविता फेसबुकवर वाचायला मिळाली. कवितेतला आशय कसा असावा याबद्दल कुठलंही मत न नोंदवता पण असं म्हणावंसं वाटतं की साहीत्य अकादमी वगैरे वगैरे वाचून अपेक्षा बनल्या त्या मानाने कविता तितकीशी ग्रेट वाटली नाही. पण या अपेक्षा बाजूला ठेवल्या तर नामदेव ढसाळांच्या प्रभावात कविता लिहीली गेली का अशी शंका येते. कवीविषयी माहीती असल्याशिवाय मत बनवू नये असा नियम आहे हे नव्याने कळालं. आजही श्रावणात घननिळा, क्षणोक्षणी पडे, मधु मागसि माझ्या इ. इ. इ. कविता आवडणे ही जशी आवड आहे, तशी त्याला पाऊस आवडत नाही ही अकविता सुद्धा आवडते, भटांच्या, जमादारांच्या गझला आवडतातच की.

छावा

लेखक ganeshpavale यांनी बुधवार, 27/05/2015 10:21 या दिवशी प्रकाशित केले.

छावा

छावा
काव्यरस