Skip to main content

तोच जुना शालू ....(शतशब्दकथा )

लेखक पगला गजोधर यांनी सोमवार, 27/07/2015 10:25 या दिवशी प्रकाशित केले.
आज माझ्या मनाने, मला आग्रह करकरून, तोच मुलायम शालू नेसायला सांगितला होता. मोतीया रंगाचा आणि सुंदर लालचुटूक फाटलेल्या किनारीचा, तोच जुना शालू. तशी मी पहिल्यापासून हौशी, प्रत्येक गोष्ट कशी, सुंदर, नीटनेटकी आणि पद्धतशीर व्हायला पाहिजे, हा माझा कायमचा आग्रह. आजही माझ्या वयाला साजेसाच रंग होता आणि माहेरचा खानदानी बाज होता, काठ स्वतःच्या हाताने फाडला होता त्याचा मी. भावाची जखम बांधायला, मागेपुढे का पाहावे ?? म्हणूनच……फाटका, तरी अत्यंत प्रिय मला आणि माझ्या हृदयाच्या अगदी जवळ असलेला शालू …… ....... ..... ....

पुन्हा आल्प्सच्या वळणांवर - भाग ४ (अंतिम)

लेखक मधुरा देशपांडे यांनी सोमवार, 27/07/2015 03:43 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १, भाग २, भाग ३ शामोनिहून परत निघायचे असल्याने सकाळी लवकरच आवरले आणि गाडी पुन्हा परतीच्या रस्त्याला लागली.

रेस (शतशब्दकथा)

लेखक अरुण मनोहर यांनी सोमवार, 27/07/2015 03:19 या दिवशी प्रकाशित केले.
लॅपटॉपची बॅग बराच वेळापासून खांद्यावर धरली की तिचे वजन वाढू लागते. मनोभौतिकीचा अप्रसिद्ध सिद्धांत! ठासलेली एमआरटी स्टेशनात प्रवेशली. शिरतानाच सिनियर किंवा गरजूंसाठी ठेवलेली राखीव सीट हेरली. रिकाम्या होणाऱ्या जागेकडे एक तरुणी लगबगीने येतांना दिसली. सिनियर वय पाउलांमधे अडकू नये अशा धडपडीने मी राखीव सीटकडे झेपावलो. माझ्याकडे बघत हरीणीच्या चपळाईने तरुणीने सीटचा कबजा केला. कडी पकडून खांद्यावर लॅपटॉप तोलीत उभा राहिलो. एका मध्यवयीन स्त्रीने माझ्याकडे सहानुभूतीचे आणि तरुणीकडे तिरस्काराचे कटाक्ष टाकले. तरुणी स्थितप्रज्ञ! मीच न राहवून मोठ्याने म्हणालो, “Never mind, she was faster than me.

आषाढीच्या निमीत्ताने पुंडलीकाच्या शोधात पुन्हा एकदा ...

लेखक माहितगार यांनी रविवार, 26/07/2015 22:50 या दिवशी प्रकाशित केले.
आषाढीचे निमीत्त साधून एका मराठी विकिपीडिया सदस्याने आज विठ्ठलाच्या बर्‍याच गाण्यांची यादी मराठी विकिपीडियातील लेखात जोडली, हे पाहून मी ही माहितीचा आढावा घेण्यास सुरवात केली. विठ्ठल हे मुख्यत्वे महाराष्ट्रातील दैवत म्हणजे इंग्रजी विकिपीडियावरील लेखासही बहुसंख्य वाचक मराठीच असावेत असे गृहीत धरता येते. काल पर्यंत गेल्या महिन्यातील(३० दिवसांची मिळून) इंगजी विकिपीडियावरील विठोबा लेखास हिट्सची संख्या ५००० होती तर मराठी विकिपीडियावरील लेखास मिळालेल्या हिट्सची संख्या १००० च्या आसपास.

द स्केअरक्रो - भाग ‍१४

लेखक बोका-ए-आझम यांनी रविवार, 26/07/2015 22:13 या दिवशी प्रकाशित केले.
द स्केअरक्रो भाग १३ द स्केअरक्रो भाग १४ (मूळ लेखक मायकेल कॉनेली ) मी गुरुवारी दुपारपर्यंत टाइम्सच्या ऑफिसमध्ये जाऊ शकलो नाही. तिथे पोचल्यावर एक प्रकारची अस्वस्थ ऊर्जा सगळीकडे जाणवली. बरेच रिपोर्टर्स आणि एडिटर्स दिसले. अशी मधमाशांच्या पोळ्यासारखी लगबग गेल्या बऱ्याच दिवसांत दिसली नव्हती. आणि याचं कारण उघड होतं. अँजेला कुकचा खून. प्रत्येक दिवशी थोडंच असं घडतं की तुमच्या एका सहकाऱ्याचा खून झालाय आणि दुसरा सहकारी त्याच्यात कुठल्या ना कुठल्या प्रकारे गुंतलाय! आमची सिटी एडिटर डोरोथी फाऊलर न्यूजरूममध्ये होती.

"ती - ४"

लेखक खटपट्या यांनी रविवार, 26/07/2015 20:48 या दिवशी प्रकाशित केले.
"ती - १" "ती - २" "ती - ३" मलाही प्रचंड झोप येत होती पण खड्यांमुळे गाडी उडत असल्यामुळे मला झोपता येत नव्हते. जेव्हा जेव्हा मी डुलकीमधून बाहेर येत असे तेव्हा तेव्हा मी नेहाकडे पहात असे. नेहा दिवसभराच्या धावपळीने थकून गाढ झोपली होती. झोपेत सुंदर माणूस अजून सुंदर दिसते. लहान बाळे सुद्धा झोपेत खूप गोड आणि निष्पाप दिसतात. नेहाचा चेहरा अगदी निरागस होता. होतीच ती निरागस. तिला पाहताना मला कोणी पहात नाहीना याची मी काळजी घेत होतो.

शुष्क

लेखक विशाल कुलकर्णी यांनी रविवार, 26/07/2015 20:32 या दिवशी प्रकाशित केले.
आयुष्य ना सुखांचे अंधार दाट होता बुद्धयाच वेदनांशी श्रृंगार थाटलेला झाली उजाड़ स्वप्ने, सत्यास दंभ होता चातुर्य प्राक्तनाचे कळलेच ना कदापी रक्तास चटक ओल्या लागून आज गेली जखमाच त्या, तयांशी, संसार थाटलेला अस्तित्व जाणिवांचे उधळून रात्र गेली त्यां टाळणे मलाही जमलेच ना कदापी होता तसाच आहे ओसाड माळ तिथला पान्हा वसुंधरेचा वक्षात गोठलेला मी रान शुष्क होतो पाऊस स्तब्ध तिथला गोंजारणे फुलांना रुचलेच ना कदापी झाडांस कोरडेपण जेव्हा असह्य झाले तो कोंब पालवीचा बुंध्यात आटलेला तो बहर जून होता फसवेच गंध झाले ते श्वास पाळणेही पटलेच ना कदापी विशाल कुलकर्णी
काव्यरस

मराठी विकिपीडियावरून स्वातंत्र्य दिवसाच्या शुभेच्छा देण्याची संधी

लेखक माहितगार यांनी रविवार, 26/07/2015 19:01 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, ऑगस्ट महिन्यात मराठी विकिपीडियास सर्वाधीक वाचकांच्या भेटी मिळतात. या कालावधीत नवनवीन सदस्यांना मराठी विकिपीडियाशी जोडण्यासाठी आणि लिहिते करण्यासाठी काही वेगळे करून पहाण्याचा मानस होता आणि आहे. या वेळी स्वांतत्र्य दिवसा निमीत्त मराठी विकिपीडियावर आत्तापर्यंत फारसे लेखन न केलेल्या लोकांनी दिलेले - म्हणजे तुमचे स्वतःचे शुभेच्छा संदेश ठळक पणे प्रसिद्ध करण्याचा मानस आहे. उद्देश हाच कि लिहिण्याच्या फारशा अटी ठेवायच्या नाही आणि काय लिहू हा प्रश्नही कमीत कमी ठेवायचा. आजकाल प्रत्येक प्रसंगी प्रत्येकाला हॅप्पी...

मराठी विकिपीडियावरून स्वांतत्र्य दिवसाच्या शुभेच्छा देण्याची संधी

लेखक माहितगार यांनी रविवार, 26/07/2015 16:54 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, ऑगस्ट महिन्यात मराठी विकिपीडियास सर्वाधीक वाचकांच्या भेटी मिळतात. या कालावधीत नवनवीन सदस्यांना मराठी विकिपीडियाशी जोडण्यासाठी आणि लिहिते करण्यासाठी काही वेगळे करून पहाण्याचा मानस होता आणि आहे. या वेळी स्वांतत्र्य दिवसा निमीत्त मराठी विकिपीडियावर आत्तापर्यंत फारसे लेखन न केलेल्या लोकांनी दिलेले - म्हणजे तुमचे स्वतःचे शुभेच्छा संदेश ठळक पणे प्रसिद्ध करण्याचा मानस आहे. उद्देश हाच कि लिहिण्याच्या फारशा अटी ठेवायच्या नाही आणि काय लिहू हा प्रश्नही कमीत कमी ठेवायचा. आजकाल प्रत्येक प्रसंगी प्रत्येकाला हॅप्पी...

त्रैराशिक

लेखक सदस्यनाम यांनी रविवार, 26/07/2015 15:40 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकर. इथल्या शतशतशब्द कथा वाचून मला पण काही लिहावसं वाटलं. त्यात त्रिशतशब्दकथा असा प्रयोग केलाय. व्याकरणाच्या चुकाबद्दल क्षमस्व. पहिल्या लेखनाचे स्वागत कराल अशी अपेक्षा. ________________________________________________________________________ ह्यालो बोल ग हिरॉईन आयक की रव्या. मला कनाय राव्हल्या भेटला होता. तूच बोंबलत गेली आसचील. आता म्या नाहीना गावात. काय भरोसा नाय तुझा. हा. तू लै शिटीत सवळाच राह्यलास जनू. मी हाय म्हनून नायतर छप्पन्न फिरतेत माझ्यमागं. हा म्हैते लै फेरनलवलीची औलाद. ते जौ दे. पह्यले मला सांग किती मरतोस माझ्यावर? म्या व्हय? समज बत्तीस जीबी तर आसंन.