Skip to main content

[शतशब्दकथा स्पर्धा] बळ

लेखक कानडा यांनी सोमवार, 10/08/2015 09:13 या दिवशी प्रकाशित केले.
तो: माझ्या दोघींनी माझी साथ सोडलिये. आता तुलाही मी माझ्या बंधनातून मुक्त करतो. ती: त्यांनी साथ सोडली म्हणुन काय झाले. माझी आहे ना. तो: गुण जुळत नाहीत गं. तु तरी काय पाप केलय की ही शिक्षा भोगावी? आपल्या मागे कुणी नाही. मग सुटल्यावर तु तरी सुखी राहशील ना. ती: अरे सावली कधी साथ सोडत नसते. तो: आता संपुर्ण आयुष्य अंधारातच जाणार आहे. ती: मी अर्धांगिनी आहे तुझी. आणि मी असतांना कसला अंधार? आता असला काही विचार करु नकोस. जोवर आहे तोवर मी तुझ्या सोबतच आहे. तो: कुठुन आणते गं इतके बळ? ती: तुझ्या आशिर्वादातुन- फक्त इतकाच दे - "अखंड सौभाग्यवती भवः!"

दाल पराठा

लेखक दिपक.कुवेत यांनी रविवार, 09/08/2015 15:37 या दिवशी प्रकाशित केले.
उरलेली शिळी आमटि, दाल फ्राय किंवा दाल तडकाचा ब्येस्ट सदुपयोग! paratha 1 साहित्यः १. तुर, मसुर आणि मुग डाळ - प्रत्येकि पाव वाटि छोटि २. तेल - ३ चमचे ३. आलं / लसूण पेस्ट - १ चमचा ४. जीरं, धणे आणि बडिशेप पावडर - १ छोटा चमचा प्रत्येकि ५. हळद / तिखट - पाव चमचा प्रत्येकि ६. बारीक चीरलेली हिरवी मिरची - चवीप्रमाणे ७. बारीक चीरलेला टोमॅटो - १ ८. बारीक चीरलेले कांदे - २ ९. बारीक चीरलेली कांद्याची पात (हिरवा भाग फक्त) १०.

गादी - शेवट

लेखक संजय पाटिल यांनी रविवार, 09/08/2015 12:42 या दिवशी प्रकाशित केले.
गादी - , , , चाचांचे मनोगत मागील भागापासून पुढे सुरू.... वेड्या वाकड्या झालेल्या बांगड्या हातात खेळवत खिडकीतून बाहेर शून्यात नजर लावून विचार करत बसलो होतो. कामगार काम उरकून निघून गेले होते. बेगम खाना बनवण्यात व्यस्त होती. कुणाच्या असतील बरं? कामगारानां खोदून खोदून विचारलं तरी सांगता येईन की नेमका कुठला कापूस किंवा कुठल्या गादीतून ह्या आल्या असतील.

पळसधरी (पुण्यनगरी) कट्टा वृतांत

लेखक माझीही शॅम्पेन यांनी रविवार, 09/08/2015 10:26 या दिवशी प्रकाशित केले.
(काट्याचा वृतांत लिहिणे हा प्रांत नसताना आणि अंगावर जबाबदारी पडून कसातरी लिहिला आहे , डॉक्टर ,मूवी , कंजूस आणि माप ह्यांनी अजून छायाचित्र क्षण चित्रे / किस्से जरूर टाकावेत) रविवारी सकाळी भल्या पाहते मऊ दुलईतून खिडकीबाहेर पाहिले अजूनही अंधारलेल होत पाउस अगदी कोसळत होता समोरचा येउरचा डोंगरही ढगात लोपला होता , परत मस्त ताणून देऊ का ह्या विचारात होतो इतक्यात लक्ष्यात आल अरे आज "पळसदरी कट्टा" , त्या तीन दिवस आधी डॉक्टर खरेंनी "काय आप्पा" कट्ट्यावर आमंत्रण दिल होत आणि त्यांना सांगूनही टाकल होत येतो म्हणून !!

[शतशब्दकथा स्पर्धा] नक्षत्राच देणं

लेखक जेपी यांनी रविवार, 09/08/2015 10:12 या दिवशी प्रकाशित केले.
विठ्या भकास नजरेने आभाळाकड पहात बसला होता. सकाळी आभाळात दिसणारी ढगाची गर्दी, दुपारी जोरदार कुंभारी वार्‍या सोबत गायब व्हायची. शेजारी बसलेल्या तात्याकड पहात बोलला,"तात्या,अंऊदा बी काय खर दिसत नाय.संमदी नक्षत्र लागोपाठ कोरडी जाऊ लागल. जगायच कस माणसान.धुळपेरणी बि वाया गेली.पुना पेरणी करायची वेळ आली बग.काय डोस्क काम करना बग" कोरड्या भुईवर काडीन रेघा मारत बसलेला तात्या थरथरता हात डोळ्यावर धरत आभाळाकड पाहु लागला. अभाळात ढगाची गर्दी जमा होती,दुर कुठतरी विज पडल्याचा कडकडाट झाला. त्याच्या थरथरत्या हातावर आभाळातुन तुटणारी थेंब पडु लागली. तात्या हरकुन म्हणाला,"आरं पोरा,हे नक्षत्राच देणं हाय त्याच्या मर्ज

पर्वतावरील पुनर्जन्म- “बॉर्न अगेन ऑन द माऊंटन” ह्या पुस्तकाचा अल्पपरिचय

लेखक नरेंद्र गोळे यांनी रविवार, 09/08/2015 07:15 या दिवशी प्रकाशित केले.
“बॉर्न अगेन ऑन द माऊंटन” ह्या पुस्तकाचा हा अल्पपरिचय: पर्वतावरील पुनर्जन्म पुस्तक परिचयः पर्वतावरील पुनर्जन्म “बॉर्न अगेन ऑन द माऊंटन” ह्या मनीषचंद्र पांडे लिखित आणि पेंग्विन बुक्सतर्फे प्रकाशित मूळ इंग्रजी पुस्तकाचा प्रभाकर करंदीकर ह्यांनी केलेला मराठी अनुवाद “फिरुनी नवी जन्मले मी”, नुकताच प्रफुल्लता प्रकाशन ह्यांनी प्रकाशित केलेला आहे.

द स्केअरक्रो भाग १६

लेखक बोका-ए-आझम यांनी रविवार, 09/08/2015 00:25 या दिवशी प्रकाशित केले.
द स्केअरक्रो भाग १५ द स्केअरक्रो भाग १६ (मूळ लेखक मायकेल काॅनेली) शनिवारी सकाळी मी क्योटो ग्रँडमधल्या माझ्या खोलीत बसून लॅरी बर्नार्डने लिहिलेली पहिल्या पानावरची स्टोरी वाचत होतो. अलोन्झो विन्स्लोची अखेरीस अल्पवयीन गुन्हेगारांच्या तुरुंगातून सुटका झाली होती आणि तीही सरकारने सगळे आरोप मागे घेतल्यामुळे. त्या वेळी मला हॉलीवूड डिव्हिजनमधल्या एका माझ्या ओळखीच्या डिटेक्टिव्हचा फोन आला. तिने मला सांगितलं की मी आता परत माझ्या घरी जाऊ शकतो कारण फोरेन्सिक डिपार्टमेंटमधल्या लोकांनी आपला तपास संपवलेला आहे.

[शतशब्दकथा स्पर्धा] शिरा

लेखक तीरूपुत्र यांनी रविवार, 09/08/2015 00:07 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार,हे माझे मिपा वरील पहिले लेखन आहे म्हणून काही चूक झाल्यास क्षमा असावी. -----------------------------------------दुपार झाली आणि गणोबा ला खूप भूक लागली.सकाळी फक्त त्याने रात्रीची उरलेली अर्धी भाकर आणि वरण ऐवढच खालेलं होतं. "ओ बाबा मले लय भूक लागली हाय पोटामंदे मंगाणपासुन कावळे बोंबलत हाय." सखाराम ला पण खूप भूक लागली होती.म्हणून जेवण करण्यासाठी दोघे शेताच्या बांधावर बसले.आज चिंगीचा(मुलीचा) वाढदिवस आहे म्हणून त्याच्या अर्धांगिणीने शिरा बनविला होता.

सत्य कथा - रुपयाचे कांदे वीस पैश्यात

लेखक विवेकपटाईत यांनी शनिवार, 08/08/2015 20:02 या दिवशी प्रकाशित केले.
सीपी ते उत्तम नगर, ३५ मिनिटांचा मेट्रो प्रवास. माझ्या जवळ बसलेला एक मेट्रो प्रवासी सहज म्हणाला 'प्याज फिर महंगा हो गया है, सरकार को नतीजा भुगतना पड़ेगा.' 'कोण म्हणतो कांदा महाग झाला' एक पांढरे केस वाला वयस्कर ग्रामीण (चौधरी) उतरला. त्यावर तो प्रवासी म्हणाला, चौधरीजी मालूम है, आज प्याज का भाव ५० रुपया किलो है. कांद्यामुळे सरकार पडते, १९९८ मध्ये दिल्लीत काय घडले होते माहित आहे का? चौधरी उतरला, चांगले माहित आहे, त्या वेळी हि कांद्याचा भाव ५० रुपये किलो झाला होता. पण त्याला १७ वर्षे झाली. त्या वेळी बसचे भाडे ३ रुपये होते, आज १५ रुपये आहे. मेट्रोत तर आणखीन जास्त लागतात.

विद्ध

लेखक चलत मुसाफिर यांनी शनिवार, 08/08/2015 17:13 या दिवशी प्रकाशित केले.
(वि. सू. - ही कविता आणि कुणाल यांचा "घालमेल: हे प्रेम होतं की आकर्षण?" हा लेख यांचा काही संबंध दिसून आल्यास तो योगायोग समजावा. कारण तो फक्त योगायोगच आहे.
काव्यरस