Skip to main content

[शतशब्दकथा स्पर्धा] मातृत्व

लेखक सिंधू वडाळकर यांनी शुक्रवार, 14/08/2015 10:26 या दिवशी प्रकाशित केले.
अनाथ आश्रमात लहान मुलांची किलबिल होती. मानसी व मानस दोन्ही मोठ्या अधीरतेने त्या मुलांना पाहत होती... कारण आज खूप प्रतीक्षेनंतर त्यांना एक मुलगी दत्तक मिळणार होती..... तेवढ्यात त्यांना बोलावण्यात आले. त्यांनी मुलीला दत्तक घेण्याची प्रक्रिया पूर्ण केली. तिला घरी आणले. मोठ्या जोरात तिचे बारसे झाले. "मृणाल" नाव ठेवले. मृणालला येऊन तीन महिने झाले. मानसी व मानसला मृणालचा लळा लागला. घर गोकूळ झाले. लग्नाला बारा वर्षे होवूनही घरात पाळणा हालला नव्हता, म्हणून तिचे कोड कौतुक होत होते. तिला हवे ते मिळत होते. अचानक एक दिवस मानसी चक्कर येऊन पडली. तिच्या पोटात दुखू लागले.

14 ऑगस्ट

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी शुक्रवार, 14/08/2015 08:02 या दिवशी प्रकाशित केले.
"वय झाले तरी उत्साह एव्हडा कसा पिकल्या पानाचा देठ हिरवा तसा" आज मी 82 वर्षाचा झालो.शरीर जरी थकत असल्याचं खुणावत असलं तरी मन अजून टवटवीत आहे.लिहिताना हात जरी कापत असले,(just kidding)तरी मन स्वस्थ बसू देत नाही.शरीराच्या आणि मनाच्या विचाराच्या मंथनातून निर्मिती झाली त्या निर्मितीचा परिपाक खाली दिला आहे. कसे उमजले नाही मला आज झालो मी 82 वर्षाचा असेल मन माझे रेंगाळत समजूनी मला 28 वर्षाचा भूक,तहान अन इच्छा आकांक्षा अजूनी आहेत जशाच्या तश्या वय झाले तरी उत्साह एव्हडा कसा पिकल्या पानाचा देठ हिरवा तसा आज जन्म घेतो तो उद्या वृद्ध होतो आज सुपात हसतो तो उद्या जात्यात रडतो कठोर दंडक आहे हा निसर्ग

[शतशब्दकथा स्पर्धा] प्रतारणा

लेखक सौन्दर्य यांनी शुक्रवार, 14/08/2015 00:35 या दिवशी प्रकाशित केले.
गेले कित्येक महिने नीट झोप लागली नव्हती, विचार करून डोकं फुटायची वेळ आली होती. शेवटी आज रात्रीच काम तमाम करण्याचा निश्चय केला तेव्हा जरा बरं वाटलं. हिच्या एकूण वागणुकीवरून तिचे बाहेर काहीतरी लफडं चालू असल्याची दाट शक्यता होती. फोनवर हळू आवाजात बोलणं, मी दिसल्याबरोबर बोलणं थांबवणं, फोन पासवर्ड घालून लॉक ठेवणं. ‘त्याच्याशी’ सतत हसत बोलणं आणि माझ्याशी बोलताना कपाळाला आठ्या……! रात्री ती झोपायला गेली त्यावेळी हॉलमध्ये सर्व तयारीनिशी टीव्ही बघत बसून होतो, लक्ष मात्र बेडरूमकडेच होतं. मध्यरात्री धीर करून बेडरूममध्ये जाऊन काम फत्ते करूनच बाहेर पडलो.

[शतशब्दकथा स्पर्धा] - अंगार !

लेखक तुमचा अभिषेक यांनी गुरुवार, 13/08/2015 23:08 या दिवशी प्रकाशित केले.
"अच्छा हुआ वो पाववालेका दुकान जला दिया. बच्चा देखके बेवकूफ बनाता था वो. ऐसाहीच मांगता था उसको. अब कलसे हम चाचाके दुकानसे पाव लेंगे..." सायंकाळच्या वेळी शहर जाळपोळींनी उजळून निघाले होते. तसाच उजळलेला तो एक निरागस चेहरा. पाववाल्याला धडा मिळाला, आणि उद्या सुद्धा शाळेला सुट्टी असणार, या दुहेरी आनंदात झोपी गेला.. दुसर्‍या दिवशी भल्या पहाटे, शहर पुन्हा उठले. पुन्हा पेटले. उजाडता उजाडता काही दिवे, पुन्हा मालवले.. कायमचेच.. त्याचे मात्र आज काहीतरी बिनसले होते. आवळलेल्या मुठी, अन चिमुकल्या डोळ्यात फुललेला अंगार.

[शतशब्दकथा स्पर्धा] पारितोषिक !

लेखक चाफा यांनी गुरुवार, 13/08/2015 20:25 या दिवशी प्रकाशित केले.
चौदाव्या आंतरराष्ट्रीय विज्ञानपरीषदेच्या शेवटच्या टप्प्यात स्वागत, तीनशेसाठ शोधांपैकी सर्वोत्तम `भूगर्भातून ऊर्जानिर्मितीच्या' प्रोफेसर रूसच्या संशोधनाला सर्वानुमते प्रथम पारितोषिक घोषित करण्यात येत आहे.

[शतशब्दकथा स्पर्धा] कोण...?

लेखक संदीप डांगे यांनी गुरुवार, 13/08/2015 19:49 या दिवशी प्रकाशित केले.
ती आत शेवटच्या घटका मोजत होती. मृत्यू कणाकणाने जवळ येत होता. हा बाहेर दोन गोजिर्‍या पोरांना कसलीशी गोष्ट सांगत होता. '...ह्यांना आपल्याला एकट्याने सांभाळायचंय, आपण कुठेच कमी पडू नये...' याच विचारात असतांना नर्सने आत बोलावले. आत डॉक्टर बोलले, "त्यांना त्रास नको व्हायला..." तो शेजारी बसला, हात हातात घेतला. तिने उठण्याचा प्रयत्न करताच त्याने बजावले, हालचाल नको. तेवढेही श्रम झेपले नाहीत. रया अजून बिघडली. क्षणाक्षणाला चेहरा फिकटतोय. प्राण एकवटून बोलली, '' मला.... तुला.. सांगायचंय... " “शांत राहा, बोलू नकोस”. शब्द बुडबुड्यासारखे फुटलेच, "... आपल्या दोन मुलांपैकी.... एक....

दमलेल्या बापाची एक कहाणी...भाग-१

लेखक चेतन677 यांनी गुरुवार, 13/08/2015 19:39 या दिवशी प्रकाशित केले.
दमलेल्या बापाची एक कहाणी...भाग-१ रात्रीचे दहा वाजत आले होते.अनघा अरविंद्च्या खांद्यावर डोके ठेऊन रडत होती.अरविंद तिला समजावुन सांगत होता "रडु नकोस पोरी.तुझ्या सासरी तु सुखी राहा.सासरच्या लोकांचं मन सांभाळ."आज अरविंद्च्या लाडक्या छ्कुलीचं लग्न होतं.ती सासरी जात होती आणि अरविंद तिला सगळं समजावुन सांगत होता.पण अनघाच्या डोळ्यांतलं पाणी काही थांबत नव्हतं.अखेर ती अलिशान ऑडी कार मध्ये ब

होती एक नजर.......

लेखक एक एकटा एकटाच यांनी गुरुवार, 13/08/2015 18:01 या दिवशी प्रकाशित केले.
होती एक नजर....... मला पाहणारी लाख झिडकारले तरी अंगचटीस येणारी..... होती एक नजर....... मला शोधणारी कधी कॉलेज, कधी बस्-स्टॉप तर कधी खिडकीवर रेंगाळणारी होती एक नजर....... मला आसुसलेली प्रत्येक नकाराने माझ्या सुडाने ठसठसलेली........... होती एक नजर....... मला दाहणारी पेटवून देहास माझ्या खुनशी खदखदणारी.......... होती हर एक नजर.... माझ्यावरच खिळलेली जेव्हा फोडला मी टाहो तेव्हा हलकेच चुकचुकलेली..... होती एक नजर....... धुराने धुसरलेली दिसत होते त्यात बाबा अन आई लाघवी हसणारी..... उरली एक नजर......... जगण्यास धडपडणारी प्रत्येक विझत्या निखर्‍यासवे एक बाहुली कायमची.......निजलेली

[शतशब्दकथास्पर्धा] दैव

लेखक बाप्पू यांनी गुरुवार, 13/08/2015 17:45 या दिवशी प्रकाशित केले.
ओ सायेब... !!! आज तरी माह्या बापाचा चेक आला का हो ? डागतराने आयचं आप्रेशन कराया सांगितलंय. पंधरा हजार रुपडे मागतोय..!!!! .. .. .. .. .. मागल्या वर्षी अंजीच्या बापानं आत्महत्या केली... वीस हजाराच्या पिक कर्जापायी. . आपल्या पतीला झाडाला लटकलेल पाहून तिच्या आईला तिथेच लकवा मारला... आता ती घरी झोपूनच असते. पिंट्याची शाळा पण आता फीचे पैसे न दिल्यामुळे बंद झाली होती. शासनाकडून मिळालेल्या नुकसान भरपाईचा चेक मिळवण्यासाठी अंजी गेले चार पाच महिने तलाठी ऑफिसचे उंबरठे झिझवत होती. .. .. .. .. .. आज त्याचा मूड चांगला होता. त्याने चेक देण्यासाठी हाथ पुढे केला.

[शतशब्दकथास्पर्धा] दान

लेखक पामर यांनी गुरुवार, 13/08/2015 16:50 या दिवशी प्रकाशित केले.
"अरे,त्याला सांगु तरी काय? आणि कसं?...काय म्हणेल तो मला?..कशी जाऊ मी त्याला सामोरी?,नको रे अश्या संकटात लोटुस..माझ्यामधे आता धैर्य उरलं नाही...." "तुला जे हवे ते मी त्याच्याकडुन मिळविनही,तो देईलही..पण पुढे मी त्याला काय तोंड दा़खवु,सांग ना.." "जी गोष्ट आयुष्यभर नव-यापासुन,मुलांपासुन लपवत आले..आता त्यांच्याच भल्यासाठी ह्याच भांडवल करु बघतोस...अरे माझी थोडी लाज ठेव..." "ह्यात कोणाचा फायदा आणि तोटा कोणाचा,तुच जाणे,...आमच्या दोघांसाठी मात्र हे जगच पार बद्लुन जाणार आहे...होऊ दे तुझ्या मनासारख...तो बघ,तो आला..." गंगेचा घाट चढत येणा-या कर्णाकडे बघत कृष्ण आणि कुंती स्वस्थ उभे रहिले.........