Skip to main content

पटेल, न पटेल

लेखक बहुगुणी यांनी शनिवार, 29/08/2015 03:58 या दिवशी प्रकाशित केले.
व्हर्जिनियात राहणारे ग्लॅडिस आणि जिम त्यांच्या टेक्सासला राहणार्‍या मुलीला भेटायला दुपारी गाडीने निघाले होते. संध्याकाळ होता-होता वाटेत टेनेसी राज्यातल्या नॉक्सव्हिलपाशी पोहोचल्यावर त्यांनी रात्रीपुरतं एखाद्या मोटेल मध्ये रहायचं ठरवलं होतं. 40 West Expressway मधून exit घेउन ते बाहेर पडले. मोटेलची शोधाशोध करत असतांना एका रस्त्यावर 'Rama.. Inn' अशी नियॉन साईन दिसली. जवळ पोहोचल्यावर कळलं की पूर्वीच्या 'Ramada Inn' मधली दोन अक्षरं काढून टाकलेली होती, पण एकंदरीत इमारत आणि आसपासचा परिसर नीट-नेटका होता.

द स्केअरक्रो - भाग ‍२१

लेखक बोका-ए-आझम यांनी शनिवार, 29/08/2015 00:14 या दिवशी प्रकाशित केले.
द स्केअरक्रो भाग २० द स्केअरक्रो भाग २१ (मूळ लेखक मायकेल कॉनेली) फिनिक्सच्या स्काय हार्बर एअरपोर्टवर जेव्हा रॅशेल बाहेर आली, तेव्हा तिचं माझ्याकडे अजिबात लक्ष गेलं नाही. मीही तिथे आलेल्या आणि हातांत येणाऱ्या लोकांच्या नावाचे फलक घेऊन वाट बघत असणाऱ्या लिमोझिन ड्रायव्हर्सच्या गर्दीत उभा होतो. तिने मला पाहण्याआधी मी तिला पाहिलं. ती डावीकडे आणि उजवीकडे बघत होती आणि मी तिच्यासमोर उभा होतो. ती रेलिंगच्या दुसऱ्या बाजूला आल्यावर मी सरळ जाऊन तिच्या पुढ्यात उभा राहिलो.

कुछ ना कहो...<3 ;)

लेखक कॅप्टन जॅक स्पॅरो यांनी शुक्रवार, 28/08/2015 22:29 या दिवशी प्रकाशित केले.
बाप्पा जेमतेम पंधरवड्यावर येउन ठेपलेले आहेत. त्यामुळे सद्ध्या साफसफाई, आवराआवरीमधे संध्याकाळ आणि जमेल तेवढा वेळ निघुन जातोय. घर आवरायला एवढा वेळ लागतो का वगैरे छापाचे प्रश्ण विचारु नये. आमच्याकडे घर आवरणे हा कार्यक्रम घर शिफ्ट करणे ह्याच्याएवढाचं किंबहुना त्याहुन मोठा असतो. माळ्यावरच्या फक्त गणपतीमधे/ दिवाळीमधे वगैरे लागणार्‍या वस्तु काढत असताना आमच्या मातोश्रींच्या नजरांना उंची पुरत नसली तरी त्या तिकडच्या मागच्या कोपर्‍यामधल्या पोत्यामधली कढई आणि त्यामधे ठेवलेली पंचामृताची पंचपळी किंवा तांब्याची मोठी ताम्हनं बरोबर दिसलेली असतात.

चारोळी: माणुसकीची भटकंती!

लेखक निमिष सोनार यांनी शुक्रवार, 28/08/2015 15:48 या दिवशी प्रकाशित केले.
आजकाल माणुसकी भटकल्याने दुर्जनांच्या तावडीत सापडली आहे! माणसांनी तिला सोडून दिल्याने ती अनाथ आणि असहाय्य झाली आहे!
काव्यरस

दुष्काळवाडा........

लेखक pradnya deshpande यांनी शुक्रवार, 28/08/2015 15:43 या दिवशी प्रकाशित केले.
जेव्हा जेव्हा निसर्ग चक्र उलटे फिरते तेव्हा तेव्हा मराठवाड्यातील शेतकरी फासाचा दोर जवळ करतात. मागील एक वर्षात मराठवाड्यात सुमारे चारशेच्यावर शेतकNयांनी आत्महत्या केल्या. अजूनही हा सिलसीला थांबलेला नाही. सततच्या दुष्काळाने उद्धस्त झालेली शेती व्यवस्था आणि निष्क्रीय उपाय योजनांमुळे मराठवाड्याची ओळख साNया देशाला आत्महत्या करणाNया शेतकNयांचा दुष्काळवाडा म्हणून होईल की काय याची भीती वाटते.

सांगलीकरांचे काही खास शब्द

लेखक दा विन्ची यांनी शुक्रवार, 28/08/2015 15:21 या दिवशी प्रकाशित केले.
प्रत्येक गावाच्या बोली भाषेचा एक विशिष्ट ढंग /लहेजा असतो. बऱ्याचदा हे काही खास शब्द ऐकल्यावर आपल्याला आपल्या गावाला गेल्याची अनुभूती येते. मिपा वरती तसे पुणेकर , मुंबईकर, कोल्हापूरकर आणि नागपूरकर व त्यांची भाषा आणि खास ढंग यावर बरेच धागे आहेत . खाली काही खास सांगलीचे शब्द आहेत. कोल्हापूर अगदीच शेजारी असल्याने काही शब्द दोन्हीकडेही असणे शक्य आहे .

सदाहरित धागा - मनातले प्रश्न..शंका..जिज्ञासा..सल्ला, माहिती- भाग २

लेखक किणकिनाट यांनी शुक्रवार, 28/08/2015 14:47 या दिवशी प्रकाशित केले.
धाग्याच्या आधीच्या भागात प्रतिसाद शंभरहून जास्त झाल्याने नवीन भाग सुरु करत आहोत - आधीचा भाग वाचनमात्र करतो आहोत. यापुढील चर्चा इथे चालू रहावी. संपादक मंडळ.

शरण तुला भगवंता...

लेखक मांत्रिक यांनी शुक्रवार, 28/08/2015 14:24 या दिवशी प्रकाशित केले.
शहराच्या जरासं बाहेर असलेलं विठ्ठल मंदिर. थोड्याशा उंच टेकाडावर असलेलं. मोजून पंचाहत्तर पाय-या चढून भक्ताचा आत प्रवेश होणार. मंदिर मूळचं दगडी. ब्रिटिश काळात कुणा हौशी भक्तानं बांधलेलं. पण आता त्याला ब-यापैकी रंगरंगोटी, कुंपण, छोटीशी बाग वगैरे करण्यात आली होती. परिसर जरा ब-यापैकी दिसायला लागल्यावर या देवळाकडे संध्याकाळची भक्तगणांची, हौशी कुटुंबांची वर्दळ वाढू लागली. त्याचबरोबर पाय-यांवर भिक्षा मागण्यासाठी काही म्हातारे, अनाथ-अपंग, बेघर लोक हे देखील बसू लागले. यापैकीच एक भागीबाई. भागीबाईचं मूळ नाव भागीरथी. वय असावं ऐंशी. भागी मूळची इथली नव्हे. कधीतरी स्वतःच्या घरात राहणारी विधवा बाई होती ती.

फणसाची गर्‍या गोट्याची भाजी

लेखक यशोधरा यांनी शुक्रवार, 28/08/2015 10:04 या दिवशी प्रकाशित केले.
लागणारे जिन्नसः कच्चा पण थोडासा जून असा कापा फणस, २-३ ओल्या मिरच्या, १ वाटी खोबरे, १ लहान चमचा हळद, ७-८ काळी मिरी, फोडणीसाठी हिंग, मोहरी, चवीला साखर, मीठ कृती: फणस सोलून व आतील गरे साफ करुन घ्यावेत. गर्‍यांमधील बिया (आठळ्या) काढून त्यांची वरची साले काढून त्यांचे लांबट तुकडे करावेत. फणासाच्या बाहेरील सालीचा आतील भाग काढून त्याचेही लांबट तुकडे करावेत. जरासे चेचावे. गरे लांबट चिरावेत. तेलात हिंग मोहरीची फोडणी करुन त्यात आठळ्यांचे तुकडे व सालीच्या आतल्या भागांचे तुकडे शिजायला घालावे.