मुंगी उडाली आकाशी...
गेले आठ दिवस ऑफिसात शीतयुद्ध सुरु आहे. एच्चारने बारीकसारीक खुसपटे काढून फतवे काढून मला पिडायचे आणि मी शक्य तितक्या विणम्रतेने फतव्यांची अंमलबजावणी करायची किंवा ऑफिशियल भाषेत आदबशीर उत्तरे द्यायची. आज तर हायला, कहरच झाला ! उन्हातून धावतपळत बस पकडून खुर्चीवर येऊन बसते न बसते तोवर टेबलावर प्रेमपत्र हजर !
‘गेल्या आठवड्यात सहापैकी तीन दिवस तुम्ही किमान वीस मिनिटे लेट आलात अशा नोंदी थंब मशीनने दर्शित केल्या आहेत. याबाबत आपणास सूचना देणेत येते की इत;पर आपण कार्यालयात निर्धारित वेळेत हजर राहावे अन्यथा....’ इ.इ.
कालच एच्चारवाल्याचे पाचवे लौलेटर वाचून डोके भंजाळलेले तोवर आज आणि हे ?
मिसळपाव