Skip to main content

आज मै ऊपर आसमा नीचे -२

लेखक विजुभाऊ यांनी मंगळवार, 14/04/2026 10:52 या दिवशी प्रकाशित केले.

डॉक्टर झाले असते तर निदान नवीन काही शिकले असते. तेवढाच फरक पडतो. आर्थीक आणि मानसीक स्थितीत. आपल्याला कितीही सिनीयर व्हा. तीच आणि तीच कामे करायची. बदल तो कसला म्हणूण नाहीच. हे हल्ली असं खूप व्हायला लागलंय ना? पण कशामुळे? हा प्रश्न आला. इतका वेळ मनात स्वतःशीच संवाद करत असलेली नर्स करुणा स्वतःशीच चमकते. का बरे असे वाटावे?जाऊ दे. नकोच हा विचार करायला. एखादी माशी हाताने हाकलून लावावी तसा तो प्रश्न करुणा उडवून लावते. पण तो प्रश्न तीचा पिच्छा सोडत नाही. (क्रमशः)
मागील दुवा:
https://www.misalpav.com/story/53579

नापिकीची सुगी न सरते

लेखक अनन्त्_यात्री यांनी सोमवार, 13/04/2026 18:58 या दिवशी प्रकाशित केले.
मृगजळाचा पूर , माझे भग्न तारू नापिकीची सुगी न सरते, काय पेरू ? उत्सवांचे ढोल ताशे गगनभेदी कर्णबधिरांचीच आता रोज सद्दी ? व्यापुनी अवघ्यास कृ बु अतृप्त उरली मानवी सृजनास आता कोण वाली? अजूनही क्षितिजावरी अस्पष्ट तारे अंधकाराची फिकीर मी का करू रे ?

अवकाळी

लेखक अनन्त्_यात्री यांनी सोमवार, 13/04/2026 11:03 या दिवशी प्रकाशित केले.
कंच हिरव्या, ओलेत्या ओळी तुझ्या पावसाळी गारपीट उंबऱ्याशी शिवारात अवकाळी सांग कशी पावसाची मला पडावी रे भूल? चंद्रमौळी घरातली कशी पेटणार चूल? तुझ्यासाठी आभाळीचा थेंब शिंपलीत मोती माझ्या पापणीत पूर उभ्या पिकाची रे माती लेखणीला फुटो तुझ्या इंद्रधनूचा धुमारा झुंजण्यास अस्मानीशी तेवढाच मला थारा

दक्षिण भारतातील सायकल प्रवासाचे अनुभव ४: पोंगल आणि गुडलूर- उटी- वेलिंग्टन ६७ किमी

लेखक मार्गी यांनी सोमवार, 13/04/2026 09:23 या दिवशी प्रकाशित केले.

✪ उदकमंडलम् अर्थात् उटी!! ✪ हिमालय आणि सह्याद्रीचा संगम ✪ पोंगलचा उत्साह आणि सजावट ✪ २० किलोमीटरमध्ये १२०० मीटर चढ असलेला उटीचा घाट ✪ वन्य परिसरातून वर चढत जाणारा रस्ता! ✪ वेलिंग्टन कँटमध्ये राहण्याचा अनुभव नमस्कार. जानेवारीमधल्या सायकल प्रवासाचे अनुभव शेअर करत आहे. १५ जानेवारीची‌ सकाळ. सायकल प्रवासाचा चौथा दिवस. काल गुडलूरमध्ये थांबलो होतो. गुडलूर! उटीच्या पायथ्याचं आगळं- वेगळं ठिकाण. अगदी डोंगराळ प्रदेशात आल्यासारखं वाटावं असं. आज उटीला जायचं आहे. उटीचा घाट! लहानपणी आजोबांसोबत व्यापार खेळताना उटी, कोचीन, दार्जीलिंग, मद्रास अशी‌ गावं ओळखीची झाली! ते उटी!

दक्षिण भारतातील सायकल प्रवासाचे अनुभव ३: मलावली ते गुंडलुपेट ९८ किमी

लेखक मार्गी यांनी सोमवार, 13/04/2026 09:21 या दिवशी प्रकाशित केले.
✪ कर्नाटकातील रम्य सरोवरे आणि कावेरी नदी ✪ छोटी गावं आणि शांत रस्ते ✪ बेगूरच्या ऐवजी गुंडलुपेटमध्ये मुक्काम ✪ बांदीपूर राष्ट्रीय उद्यान आणि मधुमलाई व्याघ्र राखीव क्षेत्रातून प्रवास ✪ दक्षिण भारतातील शिस्त आणि सहकार्याचा अनुभव ✪ गुडलूरमधील मराठी बोलणार्‍याची‌ भेट! ✪ दक्षिण भारतीय कुटुंबीयांची आपुलकी ✪ पोंगलची पूर्वसंध्या आणि उटीच्या उंबरठ्यावर नमस्कार. जानेवारीमधल्या सायकल प्रवासाचे अनुभव शेअर करत आहे. १३ जानेवारीची‌ सकाळ. सायकल प्रवासाचा दुसरा दिवस. काल मलावलीमध्ये चांगला आराम झाला. आजचा टप्पा आधी बेगूरपर्यंत होता. पण ते छोटं गाव असल्यामुळे तिथे थांबण्याची सोय लगेच मिळत नव्हती.

लालपरी

लेखक कर्नलतपस्वी यांनी सोमवार, 13/04/2026 06:43 या दिवशी प्रकाशित केले.

नवटाक टाकून रावल्याचा रडंवा बाप मुडद्यागत पडायचा. कधीमधी मोकाट सुटलेल्या सांडागत माळरानी तोंड मारायचा पण तरणाबांड रावल्या मात्र तापल्या तव्यावर उताणा पाताणा..

चुलीवर आगीची आन बाजेवर शेजेची वाण होती.

तालुक्याला एष्टी सुरू झाली अन  बैलांच नशीब फळफळलं, बाजारी हेलपाटे बंद झाले.

रावल्याच घोडं कुठ पेंड खात होतं कुणास ठाऊक?

तांत्रिक अडचणी आणि सोयी.

लेखक कंजूस यांनी सोमवार, 13/04/2026 03:21 या दिवशी प्रकाशित केले.
तांत्रिक अडचणी मिसळपाव संस्थळ मिसळपाव साईट एका तयार प्रोग्रामवर चालते त्या Drupal CMS (Content Management System) code चे पाच सहा जाणकार सभासद हवेत. म्हणजे साईट सातत्याने सुरू ठेवण्यास गती मिळेल आणि ते काम फक्त एक दोघांवर पडणार नाही. आपापली इतर मुख्य कामं संभाळून हे काम करावे लागते. बरेच दिवसांच्या खटपटीनंतर मिपा अद्ययावत होत आहे. ( Drupal 7>>Drupal 11) गुढी पाडव्याला नूतनीकरण झाले पण नंतर संस्थळ बंद पडले. आपल्याला जुन्या मिपाची सवय आहे. पण नवीन CMS code अद्यतन झाल्यावर 'खरडफळा' आणि 'व्यक्तिगत संदेश' बाद झाले. यांची उणीव प्रकर्षाने जाणवणारी आहे.

खरडफळा (क्रमांक २) वेलकम बॅक..

लेखक गवि यांनी सोमवार, 13/04/2026 01:45 या दिवशी प्रकाशित केले.

मिसळपाव बराच मोठा काळ विश्रांती अवस्थेत राहून पुन्हा एकदा नव्या रूपात उभं आहे. 

 

सर्वांना पुन्हा एकदा एकत्र येऊन आता लेखन वाचन आणि मुख्य म्हणजे गप्पा टप्पा करता येतील. 

 

आशाताई आपल्याला सोडून गेल्या. त्यांची गाणी आपल्याला कधीच सोडणार नाहीत. आणि त्यांचा सदैव हसरा चेहरा हीच त्यांची आठवण म्हणून नेहमीच लक्षात राहील. 

 

युद्धात देखील दर दिवसागणिक खूप घडामोडी घडत होत्या. 

 

त्या काळात सर्वांनीच मिपाला मिस केलं असेल. 

 

तर या गप्पांच्या खरडफळा क्रमांक २ वर सर्वांचं स्वागत आहे.

युद्ध बखर

लेखक बाजीगर यांनी बुधवार, 18/03/2026 21:42 या दिवशी प्रकाशित केले.

युद्ध बखर |  

ताजी खबर | 

 इराण 'खार्ग' |  

समृद्धी मार्ग || 

तेलसाठा बेट | 

हमला हा थेट | 

स्ट्रेट हॉर्मुझ | 

माझं ना तुझं || 

रथी लारीजानी | 

आणि सुलेमानी | 

ठोकले दोघांना | 

या एकाच दिनी ||

 

 तो ट्रम्प अहंकारी | 

कंटाळले सहकारी | 

फेकले राजीनामे | 

नको तुझी कामे || 

 

इकडे मोदी, जयशंकर गद्दी | 

3 तेल जहाजे, आणली मुसद्दी || 

हा युद्ध ज्वरा | 

उडणारी पाणबुडी आणि हातभट्टीतील प्लुटोनियम म

लेखक ताजे प्रेत यांनी बुधवार, 18/03/2026 12:54 या दिवशी प्रकाशित केले.
उडणारी पाणबुडी आणि हातभट्टीतील प्लुटोनियम पुण्यातील एका वस्तीत 'रखमा' नावाच्या एका स्त्रीचा हातभट्टीचा (गावठी दारूचा) अड्डा होता. अंगावर जुनी साडी, दारूच्या वासाने भरलेले हात आणि चेहऱ्यावर कायम एक निर्विकार भाव... हीच रखमाची ओळख होती. पण यामागे एक मोठे रहस्य होते. रखमाने 'न्यूक्लिअर इंजिनिअरिंग'मध्ये डिप्लोमा केलेला होता. पण वशिलेबाजीमुळे आणि नशिबामुळे तिला कुठेच जॉब मिळाला नाही. शेवटी पोटापाण्यासाठी तिने पुण्यात हातभट्टी लावली होती. तिची मुलगी, 'णूड्रॅली', मात्र प्रचंड महत्त्वाकांक्षी आणि गर्विष्ठ होती. णूड्रॅलीला आपल्या आईची आणि तिच्या हातभट्टीच्या व्यवसायाची भयंकर चीड होती.