Skip to main content

मी उत्सवला जातो (भाग २)

लेखक Anand More यांनी रविवार, 27/12/2015 10:28 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ ____________________________________________________________________________________ मुले बागडत होती. सासू सासरे आणि आई खूष दिसत होते आणि हिच्या चेहऱ्यावरचा आनंद काय वर्णावा. सकाळी रेडिओवर ऐकलेले "आनंद पोटात माझ्या माईना" हे दत्त भक्तीगीत हिला उत्सवच्या गेटसमोर उभे करून तर अनाम कवीने लिहिले नसावे ना? अशी एक पुसटशी शंका माझ्या मनाला चाटून गेली. त्यांच्या आनंदी चेहऱ्याकडे पाहून मला देखील आनंदाचे भरते येत असताना मुलांनी मला गेटकडे खेचले आणि तिथल्या सहाय्यकाने, "तिकडून आत जा, हा बाहेर यायचा रस्ता आहे" असे मला सौजन्य, कंटाळा, तिरस्कार आणि कीव या सर्व भावनांचे मिश्रण असलेल्या आवाजात सांगून दुसऱ्या दिशेने पिटाळले. पोरं लगेच तिकडे पळाली देखील. ही माझ्यावर चिडली, माझी आई माझी बाजू कशी काय घ्यावी या विचारात पडली आणि माझी सासू, भोंडल्यातले "श्रीकांता कमलाकांता" हे गाणे आपल्या मुलीसाठीच लिहिले आहे असा चेहरा करून माझ्याकडे पाहू लागली.

सुरेश प्रभु – संवेदनशील मनाचा माणूस

लेखक विवेकपटाईत यांनी रविवार, 27/12/2015 09:03 या दिवशी प्रकाशित केले.
कालचीच गोष्ट, संध्याकाळी, सीपी वरून उत्तम नगर साठी मेट्रो घेतली. नेहमीप्रमाणे भयंकर भीड होती. बसायला जागा मिळण्याचा प्रश्नच नव्हता. गाडीत आमच्या सारखे पांढरे केसवाल्यांसाठी काही जागा आरक्षित असल्यामुळे, सामान्य जागेवर बसलेला माणूस, सहजासहजी पांढरे केसवाल्याना बसायला जागा देत नाही. काही कारणाने सौ.ने फोन केला. तिच्या सोबत मराठीत बोललो. अचानक समोर बसलेल्या एका तरुणाने अंकलजी, आप बैठिये. म्हणत मला बसण्यासाठी जागा दिली. थोड्यावेळाने तो म्हणाला, आप महाराष्ट्रीयन हो क्या? मी हो म्हणालो. तो पुढे म्हणाला आपके सुरेश प्रभुजी बहुत संवेदनशील और अच्छे इन्सान है.

वाघोबा at ताडोबा भाग - २

लेखक अभिदेश यांनी रविवार, 27/12/2015 06:54 या दिवशी प्रकाशित केले.
भाग -१ सहा महिन्यापूर्वी साधारण मे महिन्यात माझी पुण्याला चक्कर झाली होती तेव्हा मी एक नवीन प्रकार बघितला . माझ्या घराजवळ zoomcar असं लिहिलेल्या काही गाड्या बघितल्या . माझी उत्सुकता चाळवली , थोडा अधिक शोध घेता कळले कि हि एक Car Rental site आहे आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे Self Drive . At Last ... भारतामध्ये Self Drive कार सुरु झाल्या . पण त्यावेळेस मला जास्त वेळ नसल्यामुळे मी फार काही पुढे बघितले नाही . पण आता अचानक माझ्या डोक्यात एक विचार आला Why not drive to Tadoba ? पटकन अंतर चेक केलं . पुणे - ताडोबा साधारण ७५० किमी .

मास्तर

लेखक आनंद कांबीकर यांनी रविवार, 27/12/2015 00:30 या दिवशी प्रकाशित केले.
शाळेतून निघायला त्याला आज उशिरच झालेला. बसच्या गर्दीत स्वतःला घुसवत कसबसा घरी पोहचला. तिन वर्षाचा चिमुकला तापाने फनफनलेला. बायको घाबरुण गेलेली. मिठाच्या पाण्यात पट्टया भिजवुन डोक्यावर ठेवत होती. पण ताप कमी होइणा. तो आल्या आल्याच चिमुकल्याला दुपट्यात गुंडाळून दवाखान्यात घेऊन निघाला. बायकोला रडु अवरेना. डॉक्टरने रक्त तपासायला सांगितले. अर्ध्या तासाने रिपोर्ट आला. पांढऱ्या पेशी कमी झाल्या होत्या. डॉक्टरांनी तिन दिवस एडमिट करायला सांगितले. चिमुकल्या हाताला सलायन लावली. ति ओल्या फडक्याने त्याचं अंग पुसत होती. तो तिथेच डोक्याला हात लावुन बसलेला. तिच्या पोटात सकाळपासुन अन्नाचा कण नव्हता.

अजून काही शब्द......... !!!

लेखक ढंप्या यांनी शनिवार, 26/12/2015 21:23 या दिवशी प्रकाशित केले.
शब्द............ रंगतात, इंद्रधनुष्याच्या सप्तरंगातून फुलतात, वीणेच्या सप्तस्वरातून शब्द, उत्तुंग होतात आकाशाएवढे आकाशाच्या रंगात मिसळून निळे होतात शब्द, प्रेमाच्या भाषेत गुलाबीही होतात शब्द, पुस्तकातल्या मोरपिसासारखे जपलेले असे शब्द कधीकधी रडतातही कारण, माणसांनीच तयार केलेल्या शब्दांनी एकमेकांना टोचून मारतात माणसे तेव्हा, शब्दही हमसून हमसून रडतात.....

'उनाड'

लेखक अज्ञात यांनी शनिवार, 26/12/2015 18:06 या दिवशी प्रकाशित केले.
एका मित्राशी व्हाट्सएप्प वर चॅट करत होतो, सांगत होता गेले काही महिने जाम बिझी आहे, पण आज मात्र अक्खा दिवस 'उनाड' पणा केलाय, तेवढा मी लकी आहे! त्यानी 'उनाड' पणा केलाय, आता माझी जळजळ! क्षणात आयुष्यभरातले काही 'उनाड'क्षण वहीची पानं अंगठ्यानी सोडल्या सारखे सपासप सुटले, अश्या ह्या उनाड पानांच्या वह्या... काहींच्या बोटांनी मोजता येतील इतक्याच तर काहींच्या शंभर पानी काहींच्या दोनशे! काहींच्या तीनशे पानी!!
काव्यरस

मी उत्सवला जातो (भाग १)

लेखक Anand More यांनी शनिवार, 26/12/2015 14:07 या दिवशी प्रकाशित केले.
गुलाबी थंडीच्या दिवसात सकाळी सकाळी वॉचमन केबिन मधल्या रेडीओमधून आर एन पराडकरांच्या आवाजातील दत्त भक्ती गीते एकामागून एक ऐकू येऊ लागली की दत्त जयंती आल्याचे मला कळते. मी मुलांना, दत्त दत्त दत्ताची गाय गायीचं दूध वगैरे सांगू लागलो तर मोठा म्हणाला, "आपण म्हशीचं दूध घेतो बाबा, गायीचं इतकं काही खास नसतं असं अम्मा म्हणते." एकंदरीत आपल्या आणि आपल्या मुलांच्या अम्मापुढे कुणाचं काही चालत नाही त्या अत्रीनंदनाला कळले असावे म्हणून त्याने देखील अम्मापेक्षा हम्माच जवळ केली असावी अशी शंका मनाला चाटून गेली. मी मनोमन अवधूताला नमस्कार केला आणि इतर कामांच्या मागे लागलो.

वाघोबा at ताडोबा भाग - १

लेखक अभिदेश यांनी शनिवार, 26/12/2015 08:12 या दिवशी प्रकाशित केले.
"Hey Rodney , Good Morning." "Very Good Morning .. Tell me." "Rodney , I am planning to take vacation in November for 2- 2 1/2 weeks." "OK , dates?" "From 10th till 30th . Can you Pl. let me know if it's OK at the earliest as I need to book my flight ." "OK.. will let you know by end of day." "Thank You Rodney." Manager बरोबर वरील संभाषण ऑगस्ट महिन्यातलं . गेले वर्ष दीड वर्ष आस्मादिक मधु इथे (USA ) आणि चंद्र दोन उपग्रहांसह तिथे (पुणे ) परिस्थितीत . हम्म … बरोबर आहे ना ?…. म्हणजे मी मधू आणि बायको चंद्र ?? जाऊ दे ... मला हे न सुटलेलं कोडं आहे .. कोण मधु आणि कोण चंद्र . असो .

हे असं का ? concept of monality vs duality

लेखक Jack_Bauer यांनी शनिवार, 26/12/2015 07:12 या दिवशी प्रकाशित केले.
आज जागतिकीकरणाच्या युगात अनेक जण आज पूर्वेकडील देशातून पश्चिमेकडील देशात आणि पश्चिमेकडील लोक पूर्वेकडच्या देशात विविध कारणामुळे येतात. अश्या वेगळ्या देशात आल्यावर आपल्याला अनेक फरक जाणवू लागतात. भौगोलिक, हवामान , भाषा इ. तर आहेच पण सर्वात महत्वाचा म्हणजे सांस्कृतिक फरक. ह्यात देखील पेहराव किंवा फ़क़्त दिखावू गोष्टींपलीकडे जाऊन विचार केला तर असं प्रश्न पडतो की हे असे का ? उदाहरणार्थ : पश्चिमेकडील अमेरिका आणि पूर्वेकडील भारत घेऊ. त्यातही मुख्यत्वे ख्रिस्चन आणि हिंदू विचारसरणी ह्या संबंधी विचार करू. अमेरिकेत जेवणाची पद्धत म्हणजे प्रथम starters मग maincourse मग dessert .