एक चक्कर सिक्किमची
भारताचा नकाशा पाहिल्यावर एक गोष्ट लक्षात येईल. सिक्किम असं एकमेव राज्य आहे ज्याची सरहद्द भारताच्या दुसर्या एकाच राज्याशी आहे. ओके, ओके! ही क्विझ प्रोग्रॅमसाठी तयारी नव्हे. वीस बावीस वर्षांपूर्वी सिक्किममध्ये पेलिंग आणि वर्सेला गेलो होतो. म्हटलं अनुभव शेअर करावेत.
इथून ट्रेननी कलकत्ता, मग रात्रभरच्या ट्रेन प्रवासानंतर सिलिगुडी. तिथून आठ तास बस प्रवास – पेलिंग. वाचूनच दमल्यासारखं होतं खरं पण प्रत्यक्षात तसं नाही. ग्रुपबरोबर गेलं की आपल्यासारखेच बोलघेवडे आणि बोलघेवड्या बरोबर असतात. प्रवास मजेत होतो. नवीन ओळखी. नवीन गप्पा. नवीन अनुभव.
सिक्किम अगदी हिरवं कंच्चं! लोक समाधानी. आयुष्याचा वेग धीमा.
मिसळपाव