Skip to main content

खाद्यपुराण

लेखक अश्विनी वैद्य यांनी शनिवार, 28/05/2016 03:43 या दिवशी प्रकाशित केले.
स्थळ :- इंग्लंड मधील एक भारतीय रेस्टॉरंट वेळ :- दुपारची पोटात कावळे ओरडायची दिवस :- फेब्रुवारीतल्या थंडीतला एक रविवार (इथे कोणी प्रतिष्ठित व्यक्ती वैगेरे बरोबरच्या जेवणाचा उल्लेख किंवा कोणाच्या अचानक झालेल्या भेटीमुळे किंवा ओढावलेल्या प्रसंगामुळे उडालेली धांदल वैगेरे प्रकार लेखात पुढे येणार नसल्याचे आधीच सांगितलेले बरे, लेखाची सुरवात मारे अशी केल्याने उगाच गैसमज नको. ) तर आज खूप दिवसांनी आम्ही तिघी मैत्रिणी, नवरा आणि मुलं ही मनाला चोवीस तास चिकटलेली कवच कुंडलं घरीच काढून ठेवून आयतं हादडायला (जेवायला) इथे एकत्र जमलो होतो.

माझे सत्तुचे प्रयोग (छायाचित्र दिलेली नाहीत)

लेखक सुंड्या यांनी शुक्रवार, 27/05/2016 23:35 या दिवशी प्रकाशित केले.
तसा सत्तु हा प्रकार महाराष्ट्रीय लोकांसाठी अपरिचित नाही परन्तु सत्तुचा अथवा त्यापासुन बनविलेल्या खाद्य पदार्थांची रेलचेल 'आपल्याकडे' कमीच (असं माझं मत आहे! जाणकारांनी सुधारणा करण्यास मदत करावी हा आग्रह). गेल्या काही वर्षापासून उत्तर-प्रदेश, बिहार मधील मंडळींच्या संपर्कामुळे सत्तुचे काही खाद्यपदार्थ खाण्यात आले व आवडले सुद्धा आणि ते स्वतःच्या स्वयंपाकघरात व्यवस्थितपणे बनवु शकलो, अश्याप्रकारे आमच्या स्वयंपाक-घरात सत्तूची रेलचेल सुरु झाली.

मला अतिशय आवडलेले इंग्रजी सिनेमे भाग १, Wait until Dark....

लेखक मुक्त विहारि यांनी शुक्रवार, 27/05/2016 18:37 या दिवशी प्रकाशित केले.
डिस्क्लेमर : मला ज्या अनेक गोष्टी अजिबात जमत नाहीत, त्यापैकी चित्रपट, कविता, नाटक ह्यांचे परीक्षण लिहिणे.कदाचित माझे हे चित्रपट परीक्षण, तुम्हाला आवडणार नाही आणि ते आवडलेच पाहिजे, हा माझा अट्टाहास पण नाही.माझ्या फालतू चित्रपट-परीक्षणाचा राग तुम्ही ह्या सिनेमांवर काढू नये, ही नम्र विनंती. ============================================= कुठलाही सिनेमा लागला की पहायचाच असतो, हा पौंगडावस्थेतला एक गूण.मग तो इंग्रजी असो किंवा हिंदी. त्या काळात मग हीरा-मोती.

पाचोळा -३ अन्तिम

लेखक स्पा यांनी शुक्रवार, 27/05/2016 17:32 या दिवशी प्रकाशित केले.
पाचोळा -१ पाचोळा -२ आतुन कसली तरी अगम्य गुणगुण ऎकु येत होती.त्या विक्रुत आवाजाने डोके जड व्हायला लागले.कसातरी आधार घेत मी खोलीत डोकावलो, आणि ह्रदय एक क्षणासाठी थांबलेच.खोलीत मिणमिणता प्रकाश पसरलेला होता, अख्खी खोली पानांनी भरलेली होती.त्याच प्रकाशात एक बाई दोन पाळण्यात फावड्याने ती पाने भरत होती.मध्येच ते पाळणे पुढे मागे करत होती ,मेंदू कुरतडुन निघाल्यासारखा वाटला, भयंकर ओरडलो,पण तोंडातून आवाज आलाच नाही,तेवढ्यात त्या आक्रुतीने मागे पाहीले.चेहरा? परमेश्वरा. . . .

इंग्लिश विन्ग्लीश !

लेखक चिनार यांनी शुक्रवार, 27/05/2016 12:53 या दिवशी प्रकाशित केले.
मी इंग्रजी सिनेमे पाहण्याचे जवळजवळ थांबवल्यापासून माझ्याकडे तुच्छतेने पाहणाऱ्या नजरा वाढल्या आहेत. खरं म्हणजे माझ्या पाहण्या न पाहण्यामुळे या सिनेमांच्या लोकप्रियतेत किंवा अर्थकारणात काहीही फरक पडत नाही. फरक केंव्हा पडतो तर जेंव्हा चार लोकांत मी अमुक अमुक सिनेमा पहिला नाही असे कबूल करतो तेंव्हा. "नाही...मी नाही पहिला अवतार" "काय? तू अवतार नाही पाहिलास?", खुर्चीवरून उसळत माझा कलीग मला विचारतो. "नाही" "मूर्ख आहेस का तू ? तुला कळत नाहीये तू काय गमावलं आहेस!!!" हे प्रातिनिधिक संभाषण नेहमी,"तुझे पता हैं तुने किसका कॅच छोडा हैं?" या आवेशात सुरु होतं. आणि शेवटी "गाढवाला गुळाची चव काय" यावर संपतं.

ध्वनी अनुदिनी (Audio Blog) चौथे पुष्प - तक्रार मार्गदर्शन - भाग 2 - श्री. विवेक पत्की

लेखक पुणे मुंग्रापं यांनी शुक्रवार, 27/05/2016 11:51 या दिवशी प्रकाशित केले.
ध्वनी अनुदिनी पुष्प - 1 - मुंबई ग्राहक पंचायत - ओळख - श्री अशोक रावत ध्वनी अनुदिनी - पुष्प - २ मुंबई ग्राहक पंचायत - अभिनव वितरण व्यवस्था - श्री. कमलाकर पेंडसे ध्वनी अनुदिनी - पुष्प 3 - तक्रार मार्गदर्शन - श्री. विवेक पत्की सर्व श्रोत्यांना सस्नेह नमस्कार, आज आपल्या समोर सादर आहे या ध्वनी अनुदिनीचे (Audio Blog) चौथे पुष्प. या भागात आपण तक्रार मार्गदर्शनाची मागील भागात घेतलेल्या माहितीचा पुढचा भाग ऐकणार आहोत.

(या क्वार्टरवेळी)

लेखक चतुरंग यांनी शुक्रवार, 27/05/2016 11:27 या दिवशी प्रकाशित केले.
मिपावरती कातरवेळा अवतरल्या, प्रतिसादातून कोणीकोणी क्वाटरवेळाचाही उल्लेख केला, मग काय ईर्शाद... साक्षात गदिमांच्या कातरवेळी ला आम्हाला असं 'कातरावं' लागलं!
काव्यरस

एक्सेल एक्सेल - भाग ३ - उपयुक्त शॉर्टकट कीज

लेखक वेल्लाभट यांनी शुक्रवार, 27/05/2016 10:56 या दिवशी प्रकाशित केले.
एक्सेल एक्सेल: भाग १ - भाग २ - भाग ३ तिसरा भाग - होम मेनू ची ओळख, आणि नेहमी लागणा-या शॉर्टकट कीज 3

पेटती चूल

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी शुक्रवार, 27/05/2016 10:22 या दिवशी प्रकाशित केले.
ए.आय डी सी ला असताना अनेक युनिट्स इलेक्ट्रिसिटी चा "स्यान्क्शन लोड" आहे त्या पेक्षा जास्त मशीन कारखान्यात लावत असत.

आंब्याची भजी"

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी शुक्रवार, 27/05/2016 10:12 या दिवशी प्रकाशित केले.
कालच्या "नांदा सौख्य भरे" च्या एपिसोड मधे..नील व स्वानंदी घरी जेवायला येणार म्हणुन " आमरस व आंब्याची भजी" असा बे त आहे असे काकु सांगते... पुढे "आंब्याची भजी " हा ईंदुरी प्रकार आहे असे सांगते... "आंब्याची भजी " हा प्रकार मी व आप्ल्या पैकी ब-याच लोकानी प्रथमच ऐकला असेल... शेवटी रेसिपी मिळाली...बनवा व चापा ....