Skip to main content

आंब्याची भजी"

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी शुक्रवार, 27/05/2016 या दिवशी प्रकाशित केले.
कालच्या "नांदा सौख्य भरे" च्या एपिसोड मधे..नील व स्वानंदी घरी जेवायला येणार म्हणुन " आमरस व आंब्याची भजी" असा बे त आहे असे काकु सांगते... पुढे "आंब्याची भजी " हा ईंदुरी प्रकार आहे असे सांगते... "आंब्याची भजी " हा प्रकार मी व आप्ल्या पैकी ब-याच लोकानी प्रथमच ऐकला असेल... शेवटी रेसिपी मिळाली...बनवा व चापा ....

वाचने 20986
प्रतिक्रिया 44

प्रतिक्रिया

In reply to by मुक्त विहारि

मी तुमच्या लेखनाचं जरी कौतुक करत असलो तरी मी आंब्याची भजी खाणार नै. -दिलीप बिरुटे (स्पष्ट)

आपण तिखटमीठ न टाकता गुलगुल्यांसारखी गोड भजी बनवु मग तर झालं. साउथ मधे नाही का पिकलेल्या केळ्याचे काप मैद्यात बुडवुन भजी करत्तात.

In reply to by इरसाल

पिकलेल्या केळ्यांची भजी करा, हाप्पूस आंब्याची भजी करा,,,मग उद्या कांद्याची आणि बटाट्याची शिकरण करा. असो, भजी म्हणजे कशी हवीत, ती पाहताच कलीजा खलास व्हायला हवा,मग तिचा असा मस्त खमंग सुवास यायला हवा, जोडीला लसणाची चटणी हवी आणि ती अशी गरम-गरम खातांना जिभेळा चटका आणि आत्म्याला तृप्त करत जायला हवी,त्यातून जर गप्पा मारायला एखादा मिपा कट्टा आणि संध्याकाळची वेळ अधिक सोनेरी फेसाळते पेय असेल तर भजी जास्त रंगत आणतात. आजकाल जनता, सामोसे, वडे आणि भजी, चिंचेच्या चटणीसोबत खाते, आम्ही मात्र ह्या अशा बाबतीत फारच वेगळे आहोत.जिभेला मुरड नाही घालू शकत.

In reply to by मुक्त विहारि

सोनेरी फेसाळते पेय असेल तर भजी जास्त रंगत आणतात. आपण जर बियर ह्या दैवी पेयाकडे शब्दनिर्देश करीत असाल तर कृपया ह्या चुकार् कोकरास (पक्षी अस्मादिकंस) आपले शिष्यत्व द्यावे अन गंडा बांधावात (घालू नये) ही विनंती चरणी रुजू करतो आहोत मुवि सर ______/\______ (बियर बफ) बहिर्जी!

In reply to by नाईकांचा बहिर्जी

हे आमच्यासाठी बरोबर पण तुम्ही बियर घेत नसाल तर, सौदी शँपेन किंवा अ‍ॅपल ज्यूस बरोबर किंवा नॉन अल्कोहोलिक बियर बरोबर पण भजी एंजॉय करू शकता. आखाती देशांत असतांना मी सौदी शँपेनच्या साथीने किंवा नॉन अल्कोहोलिक बियरच्या बरोबर भजी खात होतो.

ह्या भज्यांसोबत "श्रीखंड पाव" किंवा "बासुंदी ब्रेड" चा पण बेत करा अविनाशजी तुम्ही! होऊन जाऊ दे च्यामारी!

In reply to by नाईकांचा बहिर्जी

एकदा एका नातेवाईकाकडे, ऐन जेवणाच्या वेळी बघीतला होता. मी भूक नाही, असे सांगीतले आणि बाहेर जावून खिमा-पाव खाऊन आलो. जनता उद्या, पपईची, पेरूची,सफरचंदाची आणि बरक्या फणसाची पण भजी करतील.

In reply to by मुक्त विहारि

मला वाटते आपण आपल्या नातलगाकड़े हैदराबादी शाही तुकडा नामक मिठाई पाहिली असावी सर! तुपात तळलेल्या ब्रेड वर मलाई रबड़ी टाइप मिठाई चोपडुन बनवतात ही मिठाई ! प्रस्तुत मिठाई एकदा समोर आल्यानेच पोटात ढवळुन आल्याची आठवण ताजी झाली आमची डोक्याला शॉट प्रकार होता

In reply to by नाईकांचा बहिर्जी

हे इतकं वाईट नाही लागत ओ. फक्त ब्रेड तुपात तळल्यानंतर तूप खूप प्यायलेला ब्रेड जास्त त्रास देतो त्यामुळे नुसता भाजायचा तुपावर आणि त्यावर रबडी सोडून मुरू द्यायचा. खाके देखो मियाँ. हैद्राबादी शाही तुकडा होना जी!

In reply to by मुक्त विहारि

चिल्ल मुवि इतके का पेटलात उद्या नांदी प्यालेस ने दाम दुपटीने नाव बदलून हेच पदार्थ दिले, तर मिटक्या मारत खाल

In reply to by स्पा

तिथे मस्त तंगडी कबाब, प्रॉन्स कोलीवाडा, चिकन टि़क्का असले पदार्थ मिळतात. प्रश्न पेटण्याचाच आहे.... अरे, "हापूस आंब्याचा असा उपयोग करतात का?" किंवा "जनता हाप्पूस आंब्याचा असा उपयोग का करते?" किंवा "हाप्पूस आंब्याचा असा पण उपयोग करावा का?" जावूदे, कुणी काहीही आणि कशाही खाव्यात, हे अजून तरी मनाला पटत नाही. आता पुढचा कट्टा जून मध्ये आणि नंदी पॅलेसलाच आहे. तेंव्हा नक्की ये आणि बघ.

In reply to by मुक्त विहारि

काका ते नंदी पॅलेस बोर झाल आहे आनी चव उतरली आहे. काहीच नविन नाही. त्यापेक्षा नंदीच्याच पुढे ईंडिगो फेज१ आहे ते ट्राय करुन बघा. तिथे ती बिरा मावाची बिअर वगैरे मिळते. चव अगदी थेट पन्ह्यासारखी. मला बोअर वाटली. पण मुद्दा हा की ते जरा वेगळ आहे.

In reply to by अप्पा जोगळेकर

१. निवांत पणे बसता येते. २. वेटर लोक आता हे कधी उठणार? असे त्रासिक भाव चेहर्‍यावर आणत त्रास देत नाहीत. ३. ऐसपैस बसता येते.मी तर कधी-कधी मांडी घालून पण बसतो.(शिवाय सिगरेट ओढायला पण नंदी पॅलेसमध्ये बंदी नाही.) ४. कट्ट्याच्या वेळी, तंगडी कबाब, व्हेज प्लॅटर, प्रॉन्स कोलीवाडा, नॉन-व्हेज प्लॅटर, व्हेज सिझलर आणि नॉनव्हेज सिझलर हे आयटम बहूतांश वेळा मागवले गेले. पहिल्या ३ अटीत बसणारे कुठलेही हॉटेल कट्ट्याला योग्य. जाताजाता, नुकताच पुण्याला एके ठिकाणी कट्टा केला, त्यात तर अजून एक मस्त , बाहेरून पेय आणायला परवानगी असल्याने, खर्च अजूनच कमी झाला. "ईंडिगो फेज१" मध्ये ह्या (वरील ३)ही गोष्ती मिळतील का?

In reply to by मुक्त विहारि

मूवी,बरक्या फणसाची पिठात तिखट थोडे जास्त घालून भाजी करूनच पहा.अप्रतिम लागतात,सोबत लसणाची ओली किंवा सुकी चटणी.अहाहा!

भारीच पाककृती ! नक्की करुन बघेन ! माझा आवडीच्या अजुन काही पाककृती सांगतो हापुस आंब्याच्या . आंब्याचे भरीत आंब्याचा म्हाद्या भरला आंबा आंब्याचं गरगटं आंबा मालवणी आंबा कोल्हापुरी फ्राय मसाला आंबा रेशमी कबाब आंबा बिर्याणी आंब्याचा ठेचा आणि सगळ्यात बेस्ट म्हणजे आंब्याचे पिठले !! कोणाला हौस असल्यास डिट्टेल मध्ये पाककृती देण्यात येतील !!

In reply to by प्रसाद गोडबोले

द्या की ओ डिट्टेल पाकृ ! हून जौ दे आंबा महोत्सव !

In reply to by सस्नेह

हून जौ दे आंबा महोत्सव !
अजून जखमा ओल्या आहेत. फार फार तर आंबा स्प्ताह घाला सांगतेला नक्की येऊ. धन्य्वाद आश्वस्त नाखु

In reply to by प्रसाद गोडबोले

वाह!नेक्स्ट मास्टर शेफ आपणच........बल्लवाचार्य!!!! (उपवास करण्याच्या विचारात असलेला) अनिरुद्ध

इतका छान चवीचा असताना त्याचं असलं काही भजं करावं हा नतद्रष्टपणा कुणाला का आठवावा म्हणते मी.... काहीही

शिळी भजी पण निराळीच kick देतात वय वाढत जाते तसे भजी खाण्यापूर्वी भज्याबद्दल चौकशी वाढू लागते

आंब्याची असली पापकृती देणारा? याचं मला तरी एकच कारण दिसतंय की सगळी जनता आमरस हाणत असताना अतितीव्र मधुमेहामुळे ज्याला आंब्याकडे बघायला देखील परवानगी नसणार असल्या माणसाने त्याचं फ्रस्ट्रेशन ही पापकृती निर्माण करुन काढलेलं आहे! ;) (पापक्षालनार्थ आमरसाची वाट बघणारा)आमरंग

अंड (मिपावर 'ड' वर अनुस्वार द्यायचा नसतो. ते अंडंच आहे हे वाचणार्‍याने समजून घ्यायचं आपल्या आपण. असो.) घातले नाही ते यात?

जून मध्ये कट्टा? कधी ? कुठे? दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात असेल तर अस्मादिकांना यायला आवडेल.