आंब्याचा सिझन संपत आला, तेव्हा लक्षात आलं, इतके दिवस आंब्याचे पदार्थ झालेच नाहीत फारसे! आंब्याचा शिरा सोपा आहे, ही फक्त आठवण! राहिला असेल अजून करायचा तर करा लगेच!
साहित्यः
एक वाटी रवा, एक वाटी आमरस, एक वाटी दुथ, पाऊण वाटी तूप, पाऊण वाटी साखर, एक वाटी पाणी. बदामाचे काप, बेदाणे मीठ.
कृती:
आंब्याचा रस काढून मिक्सरला फिरवून घ्या. एक वाटी रवा मंद गॅसवर भाजून घ्या. थोडा भाजला गेला तूप घालून भाजा. दूध, पाणी, साखर एकत्र करून उकळायला ठेवा. सगळे एकत्र करून घातले की शिरा छान मौ होतो...इति रेवती!
रव्यात चवीपुरते मीठ घाला. उकळलेले मिश्रण रव्यात मिसळा. आमरस मिसळा.