माझा पहिला परदेश प्रवास (लंडन) भाग -१०
भाग दहावा -
आज आम्ही Tower of London आणि Tower Bridge बघायला जाणार होतो. या दोन्ही गोष्टी माझ्या बाहेरून पाहून झाल्या होत्या आता आतून पहायच्या होत्या. दोन्ही गोष्टी पहायला तिकीट आहे. याची सविस्तर माहिती देण्याआधी एक गोष्ट मी सांगू इच्छिते. ही सगळी आकर्षणं बघायला त्यांनी साधारण १० पौंड ते ३५ पौंड पर्यंत तिकीट दर ठेवलेले आहेत. दोघांचे मिळून प्रत्येक वेळी डबल खर्च होत होता. माझ्या नवऱ्याच्या एका मित्राने आम्हाला सांगितलं की लंडन मधील कोणत्याही National रेल चे तिकीट काढ आणि त्या आकर्षणाच्या तिकीट खिडकी वर ते रेल्वे तिकीट दाखव तर तुला एकावर एक तिकीट मोफत मिळेल.
मिसळपाव