एक संघ मैदानातला - भाग १६
कोल्हापूरला ८ ने मारून गटातून विजयी म्हणून बाहेर पडलो त्यामुळे जरा मस्त वाटत होत, पण त्याचबरोबर दीप्ती आणि दादा अजूनही येताना दिसत नव्हते म्हणून काळजी वाटत होती. सोलापूरला काढू शकू असा विश्वास असल्यामुळे दिप्तीला आज आराम द्यायचा असं आम्ही ठरवलं आणि चहा घेण्यासाठी म्हणून स्टेडियम मधून बाहेर आलो. काल घरी फोन लागला नव्हता म्हणून चहानंतर घरी फोन करायचा असं ठरवलं. चहा घेतानाच लांबून दादा आणि दीप्ती दिसले. तिच्या हाताला बँडेज वैगरे नव्हतं. अंकूने दोघांना चहासाठी टपरीवर आणलं.
" वाचली रे पोरगी.. "
" म्हणजे ? काय झालं ?"
" अगं.. म्हणजे मोठी इंज्युरी नाहीये... मला वाटलं प्लास्टर वैगरे होतंय की काय...
मिसळपाव