Skip to main content

कोबीची भजी

लेखक अनन्न्या यांनी सोमवार, 04/07/2016 18:14 या दिवशी प्रकाशित केले.
पाऊस जोरदार हजेरी लावतोय त्यामुळे गरमागरम भजी हवीतच! साहित्यः कोबी अर्धा कि., दोन कांदे, अर्धा कि. बेसन, अर्धी वाटी बारीक रवा, एक चमचा लसूण पेस्ट, एक चमचा आलं पेस्ट, लाल तिखट दोन चमचे, ओवा एक चमचा, मीठ चवीनुसार, तेल तळणीसाठी, अगदी थोडी हळद. कृती:खेकडा भजीसाठी कांदा चिरतो तसाच लांब उभा कांदा चिरून घ्या, कोबीही कांद्यासारखाच चिरा. आता कांदा कोबी एकत्र करून त्यात चवीनुसार मीठ, तिखट, आलं लसूण पेस्ट मिसळा, ओवा, हळद मिसळा. दहा पंधरा मिनिटे झाकून ठेवा. कोबीला पाणी सुटले की त्यात रवा मिसळा. आता थोडे थोडे बेसन मिसळा. खेकडा भजीसारखेच भिजवायचे आहे, त्यामुळे बेसन लागेल तेवढेच वापरा. चवीनुसार लागल्यास तिखटमीठ वाढवा. तेल गरम करा. भजी तळून गरमागरम सर्व्ह करा. मी यासोबत दह्यात कांदा लसूण मसाला, मीठ, साखर घालून दिले होते. ओव्याची पानेही बारीक चिरून घातली होती. bhaji

वाचने 15199
प्रतिक्रिया 38

प्रतिक्रिया

आताही मस्त पाऊस पडतोय...त्यात हे असे गरम गरम कुरकुरीत भाजी समोर आले तर काय मज्जा येईल अहाहा....तसे कांदा भजी नेहेमीच खाल्ले जातात..हे व्हेरिएशन पण मस्त लागेल.....मातोश्रीना जाऊन मस्का मारावा लागेल असं दिसतंय :)

व्वाहव्वा! लै झ्याक. बायकू अत्ता कांद्याची असलीच भजी करती हाये! आनी रातच्या ज्येवनाला तोंडिलावन ह्राऊ न ह्राऊ अश्या बेतानं मी ती उडवत हाये!

आता पुढच्या रत्नागिरी कट्ट्याला ही भजी खायला मिळतील अशी आशा.

In reply to by नाखु

संदर्भासहित स्पष्टीकरण टाईप तुमचे प्रतिसाद अतिशय रोचक प्रसंगी खोचक तसेच समयसूचक+हजरजबाब इत्यादी गुणही अंगी बाळगून असतात. यानिमित्ताने तुम्हाला मिपाचा "प्रतिसादकेसरी" हा पुरस्कार माईंच्या हस्ते देण्यात यावा ही मागणी मी मिपा मंडळाकडे करतो. अखिलभार्तीयमिपानाखुनप्रतिसादफ्यानक्लब्मेंब्रातलाचएक Sandy

खमंग वाफाळत्या चहा सोबत आयतीच समोर आली तर कोबी नखाणाराही नाही म्हणायचा नाही.

चायनीज भजीचा चुलतभाऊ

सज्जन गड, हरे कृष्ण वगैरे कांदा लसूण न खाणाऱ्या जागी कोबी भजी, कोबी पोहे खाल्ले आहेत. छान लागतात. कोबी असताना कांदा नसला तरी चालतो. कोबिचं कोरडं पिठलं देखील मस्त लागतं.

वेरीएशन म्हणजे, ह्या खेकडा न बनवता सरळ गोल गोल गोळे बनवुन त्यांना होडन-सावर ;) सुप (नॉर/मॅगीचे) बनवुन त्यात सोडतो मग ते भाताबरोबर खातो.

छान आवडली. -दिलीप बिरुटे

अनन्या ताई ....तुमची रेसिपी छानच.. पण कायप्पा वर तुमच्या नावाशिवाय फिरत आहेत कोबीची भजी... वाईट वाटले!!! :(

In reply to by जिन्गल बेल

एकदा आपण ऑनलाईन पब्लीक साईटवर शेअर केली रेसिपी की आपल्या हातात फारसे काही उरत नाही.तरी वॉटरमार्क टाकलाय.

आवडती झटपट पाकृ. कोबीमुळे फार वेळ कुरकुरीत रहात नाहीत ही भजी.