Skip to main content

अस्वस्थामा...

लेखक दिनेश५७ यांनी शनिवार, 30/07/2016 11:32 या दिवशी प्रकाशित केले.
आभासी सुखाची शंभर शकले डोक्यावर मिरवत फिरत होता एक उन्मत्त अश्वत्थामा... पोतडीतले उद्याच्या चिंतेचे बाटलीबंद भूत पाठीवरल्या गाठोड्यातून शोधत होते सुटकेचा रस्ता ... निराश सुस्काऱ्याचे फवारे शकलांच्या सुकल्या खपल्या भेदून चौफेर उसळत धावत सुटले भळाळत्या चिळकांड्या कारंजी होऊन नाचू लागल्या... बाटलीतलं भूत बाहेर काढून रिती बाटली फिरवत अस्वस्थ अश्वत्थामा फिरतोय दारोदार, तेलाची भीक मागत... बाटलीतलं भूत आता मानगुटीवर बसलंय!!

अंधविश्वास भाग (3) - सकारात्मक लढा

लेखक विवेकपटाईत यांनी शनिवार, 30/07/2016 09:57 या दिवशी प्रकाशित केले.
एक दिवस रस्त्याहुन जाताना कानांत पडले "यह डॉक्टर के बस का नहीं है, नीम वाले बाबाके यहाँ झाडा लगवा लो. बच्चा ठीक हो जायेगा." दिल्ली देशाची राजधानी. बाह्यदिल्ली जिथे दिल्लीतले ७०% टक्क्याहून अधिक रहिवासी राहतात, तिथे लोकांचा विश्वास डॉक्टरपेक्षा नीमवाल्या बाबावर/ बंगाली बाबांवर विश्वास जास्त. काय कारण असावे हा विचार मनात आला. निरोगी व्यक्ती कष्ट करू शकतो, संसाराची गाडी चालवू शकतो. रोगी माणसाला हे शक्य नाही. रोगांपासून मुक्त होण्याचा प्रयत्न प्रत्येक माणूस हा करणारच. आता आपण आपल्या देशातील चिकित्सा सुविधांकडे बघू. दिल्ली देशाची राजधानी.

हमखास हिट - दाल बाटी!

लेखक पिलीयन रायडर यांनी शनिवार, 30/07/2016 07:10 या दिवशी प्रकाशित केले.
कधी कधी माणसाला साधी सोपी पोळी-भाजी सोडून सुखाचा जीव भयानक कटकटीच्या गोष्टीत गुंतवायची हुक्की येते. आज तसाच एक दिवस होता.. दाल बाटीचा! तर त्याचं असं झालंय की माझ्या आईच्या वडीलांकडुन, अण्णांकडुन, माझ्याकडे असंख्य गुण आलेत. त्यातला एक म्हणजे दाल बाटीची आवड! जगात अ‍ॅक्चुअली दालबाटी एका पद्धतीने करतात, माझी आई दुसर्‍या पद्धतीने करते, सासुबाई तिसर्‍या पद्धतीने करतात आणि मी... अंदाजपंचे करते! लोक निखार्‍यात वगैरे भाजुन कसल्या कसल्या जीवघेण्या बाट्या करतात. आपल्याला तसलं काही येत नाही. कारण आपल्याला एका लेकराला सांभाळून स्वयंपाक करायचा असेतो किनई..

असेच काहितरी सुचलेले- फोटो.

लेखक राजू यांनी शुक्रवार, 29/07/2016 18:59 या दिवशी प्रकाशित केले.
"पप्पा,तुम्ही स्कुल मध्ये जायचे तेंव्हा मोबाईल नव्हते पण kodak camera तर असायचा ना मग तुम्ही त्याने स्कुलचे,स्कुल फ्रेंड्सचे फोटो का काढले नाहीत?" माझ्या मुलाने हा प्रश्न केला आणि मन भुर्रकन शाळेच्या दिवसात गेले. दिवाळी,घरातील कोणाचे तरी लग्न,उरूस आणि जून मध्ये सुरु होणारी शाळा अशा मोजक्याच प्रसंगी मिळणारे नविन कपडे त्यात शाळेचा पांढरा शर्ट,खाकी पँट नविन मिळणे हि सुद्धा एकप्रकारे चैनीची गोष्ट होती. तर वर्षातून दोन-तीनदा मिळणारे कपडे जिथे मुश्किलीने मिळायचे तिथे कॅमेरा कोठून येणार आणि फक्त कॅमेराच नाही तर त्याला लागणारा रोल व त्यानंतर निगेटिव्ह डेव्हलप साठीचा खर्च आवाक्याबाहेरचा होता. असो म

आजकाल जुने हिंदी सिनेमे थियेटर मध्ये बघायला मिळतात का ?

लेखक IT hamal यांनी शुक्रवार, 29/07/2016 16:30 या दिवशी प्रकाशित केले.
२००० सालानंतर मी थियेटर ला जाऊन जुना हिंदी वा मराठी सिनेमा बघितला नाहीये... आजकाल पिक्चरचं आयुष्य थिएटरमध्ये फक्त १ वा २ वीकएंड एवढेच असते . हायस्कुल व कॉलेजला असतांना बच्चन , धर्मेंद्र , सनी देवल,मिथुन, नाना , अनिल कपूर ई . हिरोंचे कित्येक पिक्चर मित्रांबरोबर टॉकीजमध्ये बघायला जी मजा यायची ती मजा घरी कॉम्पुटर वर CDya बघण्यात नाहीच...

मोहमद्द अली रोड वरची खादाडी

लेखक वेदांत यांनी शुक्रवार, 29/07/2016 15:19 या दिवशी प्रकाशित केले.
मोहमद्द अली रोड वरची खादाडी दरवर्षी प्रमाणे या वर्षी ही रमजान दरम्यान मोहमद्द अली रोड येथे गेलो होतो. मांसाहारी लोकांसाठी मोहमद्द अली रोड म्हणजे 'जन्नत' आहे. येथील अनेक दुकाने जगप्रसिद्ध आहेत. उदाहरण द्यायच तर सुलेमान-उसमान मिठाईवाला , तव्क्क्ल स्वीट्स, जेजे जिलेबीवाला , हॉटेल नूर मोहमदी ई. नेहमीप्रमाणे संध्याकाळी मस्जीद बंदर स्टेशनला उतरून मित्रांची वाट पाहत बसलो,येणारे सगळे या खाद्यजत्रेतले नवखे होते. ७.३०वाजता सर्वजण जमले आणि मग आम्ही निघालो 'जन्नत' कडे.. मस्जीद बंदर रेल्वे स्टेशन वरुन कल्याण दिशेने बाहेर पडलो.

पाककृती सुचवा वात प्रकृती साठी

लेखक सतिश रानडे यांनी शुक्रवार, 29/07/2016 14:31 या दिवशी प्रकाशित केले.
माझी पत्नी आमवाताने त्रस्त आहे. खाण्यावर बरीच बंधने आहेत नेहमीच तेच तेच पदार्थ साळीच्या लाह्या वगैरे खाऊन कंटाळली आहे सबब समस्त बल्लवाचार्याना / बंधुभगिनींना विनंती आहे कि काही तरी नवीन पदार्थ सुचवावे . माझे हे पहिलेच लेखन आहे काही चुकल्यास क्षमा असावी

निर्गुणी भजने‬ (भाग २.७) सुनता है गुरु ग्यानी - समाप्त

लेखक Anand More यांनी शुक्रवार, 29/07/2016 12:59 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्ण भजनाचा अर्थ एकत्र लावायचा प्रयत्न केला तर मला हे भजन जीवाची आणि शिवाची भेट कशी घडवावी त्याचे वर्णन वाटते. म्हणून मग जीवाचा सोहं, शिवाचा ओहं आणि या दोघांचा कायम झीनी झीनी वाजत राहणारा बाजा म्हणजे "ओहं सोहं". धृवपदाबद्दल लिहिताना मी याचेच वर्णन, "कायम होत रहाणारा शांत आवाज" असे केले होते. हा जरी कायम चालू असला तरी त्याचे ऐक्य फक्त ज्ञानी साधकाला कळते. आणि मग त्या साधकाचे वर्णन करताना कबीर म्हणतात, सुनता है गुरु ग्यानी ग्यानी ग्यानी | गगन में आवाज हो रही झीनी-झीनी झीनी-झीनी || असा अर्थ मला जास्त सुसंगत वाटतो.

दडपण

लेखक प्रमोद देर्देकर यांनी शुक्रवार, 29/07/2016 12:01 या दिवशी प्रकाशित केले.
"अवो अजौन किती वेळ?" "अगं यीलच इतक्यात रोज याच येळेला येती की" "माझं हात दुखाया लागलं, बाळ्याला खाली ठेवा तो काय एकडाव झोपला की उठाचा न्हाई ; अन जरा हिला घ्या" "अगं ती बघ लाईट दिसाया लागली, आलीच बघ ती?" *** त्याने सतत कर्णकर्कश शीट्टी वाजवली तेव्हा बाजुच्या खुर्चीत डुलक्या देणारा सिनियर झटकन जागा झाला. "काय झालं? " "ते ते " इंजिनाच्या प्रकाशझोतात सिनियरने समोर पाहिलं. एक शिवी हासडत म्हणाला "भोसडीचे झेपत नाही तर एवढी पोरं कशाला काढतात कुणास ठाऊक?" खिडकीतुन हात बाहेर काढुन हलवत "बाजुला व्हा" सांगण्याचा त्याने प्रयत्न केला, पण ती ढिम्म हलली नाहीत.

web Hosting

लेखक अबोली२१५ यांनी शुक्रवार, 29/07/2016 11:51 या दिवशी प्रकाशित केले.
मला web hosting घ्यायच आहे . कुठलं घेऊ Linux कि window Domain घेतलं आहे Go daddy वरून