दिवस रिहॅब चे !!!!!!
अँब्युलन्स मधून खाली कोण तरी उचलत आहे .आता आठवत नाही कोण होता तो .वर कोणीतरी न्हेलं ते हि आठवत नाही .डायरेक्ट जाग १५ तासांनंतर ,इंजेकशन दिलं असावं .बहुधा झोपेचं असावं आता हे हि आठवत नाही
आता पिक्चर प्रमाणे फ्लॅश बॅक सांगतो ..
सुरवात साधी सरळ छान घर मज्जा मज्जा अश्या टाइप . नीट शिक्षण कॉलेज पोस्ट डिग्री हा सगळा प्रवास (त्यात काय झालं हे परत कधीतरी )सगळंच चांगलं असला की घरचेही फार विचार करत नसावेत बहुधा .कारण कोणाला काय माहित कधी काय होता ते.कारण थोडं ड्रिंक परत कॉलेज मध्ये g.s होतो बाकी मजा मस्ती हे सगळं घरी माहित होतं त्यात काही विशेष पण नाही.
मिसळपाव