मदत हवी आहे - वेळणेश्वर
नमस्कार,
दसर्याच्या सुट्ट्यात वेळणेश्वरला जाण्याचा बेत आहे. राहाण्याची सोय महाराष्ट्र पर्यटन विकास महामण्डाळाच्या हॉटेलात केली आहे. एकूण चार दिवसाची सहल करणार आहोत. त्यातील दिवस १ व ४ हे प्रवासातच जातील तरी उर्वरीत २ दिवसात काय काय बघता येइल. एकूण २ कुटुन्ब आहोत व २ लहानगे (वय ५ व २.५) तरी कृपया मार्गदर्शन कारावे.
१. पुण्यावरून जाताना जास्त सोयीस्कर रस्ता कोणता? (ताम्हीणीतून दोनदा कोकणात उतरलो आहे पण या वर्षी ऑगस्ट महिन्यात ताम्हीणी सहलीत रस्त्याची झालीली दुर्दशा बघून शक्यतोवर तो टाळायची इछा आहे.)
२. सातारा मार्गे गेल्यास रस्त्यात जेवणासाठी काही चान्गली ठिकाणं?
३.
मिसळपाव
