दीपशिखा-३. फ्राऊ अँगेला मेर्केल- दि कान्सलेरिन
ह्याआधी- दीपशिखा
दीपशिखा-१. अग्निपुत्री डॉ. टेसी थॉमस
दीपशिखा-२. गिरीकन्या अरुणिमा सिन्हा
जर्मनी! युरोपातलाच नव्हे तर जगातील एक प्रबल देश! अनेक पेडी इतिहास असलेल्या ह्या देशाच्या सर्वोच्च पदावर असलेल्या बुंडेसकान्सलेरिन अँगेला मेर्केल ह्यांच्याबद्दल एक कुतुहल कायमच मनात आहे.
जर्मनी! युरोपातलाच नव्हे तर जगातील एक प्रबल देश! अनेक पेडी इतिहास असलेल्या ह्या देशाच्या सर्वोच्च पदावर असलेल्या बुंडेसकान्सलेरिन अँगेला मेर्केल ह्यांच्याबद्दल एक कुतुहल कायमच मनात आहे.न्यू यॉर्क : १० : ब्रूकलीन हाईट्स प्रोमोनेड आणि मॅनहॅटन आकाशरेखा
===============================================================================
न्यू यॉर्क: ०१ : पूर्वतयारी आणि प्रस्थान... ०२ : शहराची तोंडओळख... ०३ : जर्सी सिटीचा फेरफटका...
०४ : वर्ल्ड ट्रेड सेंटर...
रडू
"आमच्या घरी ना , मला एक छोटा दादा मिळाला आहे. त्याला दोनच काम असतात. मुठ आवळून इकडेतिकडे पाहत बसण , आणि भोकाड पसरण.
आता उद्या माझा पेपर आहे आणि हा सकाळपासुन रडतोय. थांबा आजोबांनाच विचारतो तो का रडतो ते.."
"आजोबा..आजोबा.. अहो बघा ना तो कसा रडतोय सारखा. बोलून का टाकत नाही काय पाहिजे ते ?"
" अरे मानवी भाषेबद्दल पुर्ण अनभिज्ञ आहे तो. भुक लागली मग जिवाच्या आकंताने तो टाहो फोडतो. टाहो फोडला ,की आई जवळ करते हा अनुभव ते गाठीशी बांधून घेतो."
" आजोबा , मग डॅडा का कधी रडत नाही ? "
" आपण मोठो झालो की मानवी भाषाविश्वात आपला प्रवेश होतो. काना मात्र्ा वेलांटी उकार आपल्याभोवती फेर धरून नाचु लागतात.
औरंगाबाद सायकल कट्टा
पुण्यातला पहिला सायकल कट्टा संपन्न होतानाच या औरंगाबाद सायकल कट्ट्याची बीजे रोवली गेली होती. मोदकरावांचा पुण्यातल्या सायकल कट्ट्याचा हा लेख तुम्ही वाचला असेलच !अर्थातच या दोन्ही कट्ट्याचे प्रणेते मोदकरावाच आहेत हे येथे नमूद करणे अत्यंत महत्वाचे आहे.
तर, औरंगाबाद सायकल कट्टा २४ व २५ सप्टेम्बर ला करायचा असे ठरले. व त्याप्रमाणे कायप्पा ग्रुप स्थापन करण्यात आला. त्यात पुण्यातले औरंगाबाद सायकल कट्ट्याला येऊ इच्छिणारे आणि यजमान औरंगाबादकर ( संख्या ३) असे सामील झाले. २४ तारीख येत येत पुण्यातले ८ पैकी ३ गाळपाटले आणि ५ फायनल झाले.
पधारो म्हारे देस : मुंबई – उदयपूर – जयपूर – मुंबई .
आम्ही , म्हणजे अस्मादिक आणि आमचं खटलं , साधारण जुलै मध्ये राजस्थान स्वारी वर गेलो होतो. संपूर्ण ट्रीप नेहमी प्रमाणे मी स्वत:च प्लान केली होती. सबब अगदी पहिल्या दिवसापासून Adventure असणार ही कल्पना होतीच. पण ते मुंबई पासूनच सुरु होईल याची तिळमात्र ही कल्पना आम्हांला नव्हती. त्यात अस्मादिक पडलो मराठवाडी , त्यामुळे निजाम-गती (ही कूर्मगती पेक्षा पण हळू असते) ही आमच्या पाचवीलाच पुजलेली . त्यामुळे आमच्या सौ”नी सांगून सुद्धा ,”अगं विमान १२ चे आहे, आपण ११ पर्यंत पोचलो तरी चालेल !" असं म्हणून क्याब ८ ची बुक केली. की बाबा अगदी मुंबई मुंबई म्हणतात तशी गर्दी लागली तरी ३ तासात ३८ किमी पोचणे अवघड नाही !!
मी ..... कोण ?
मी ..... कोण ?
मी कोण तुम्ही कोण
जन्माच्या वेळीच ठरवतात
जात ,पात ,धर्म,देश
ओळख तेव्हाच सांगून टाकतात !
'मी' म्हणायच्या आधी
"तू कोण " हे शिकवून टाकतात !
आधी होते बर मी यजुर्वेदी
लग्नानंतर झाले म्हणे ऋग्वेदी,
कुटुंबामध्ये आमच्या
आहेत कोकणस्थही चार ,
बिल्डिंग मध्ये आहेत ब्राम्हणच फार !
कॉलनीमधले मला 'मराठी'
म्हणून ओळखतात
शहरात इतर ठिकाणी फिरताना
'कोणत्या भागातली' म्हणून विचारतात ?
शहराबाहेर गेले तर ही' पुण्याची '
असे म्हणाले लोक ,
परप्रांतात गेले तेव्हा
'महाराष्ट्रयीन' म्हणाले ते कैक .
ब्लॅक अँड व्हाईट
चेक इन झालं. सिक्युरिटी, इमिग्रेशन सगळं झालं. आता फक्त विमानाची वाट बघत बसायचं. यावेळी पाय निघत नाहीये इकडुन. बाबा आता अर्ध्या रस्त्यात असतील. असं वाटतंय त्यांना फोन करून पुन्हा बोलवावं, आणि तिकीट कॅन्सल करून पुन्हा घरी जावं. पण किती दिवस राहणार असं. आज ना उद्या तर पुन्हा स्वतःच्या घरी सॅनफ्रॅन्सिस्कोला जावंच लागेल.
किती दिवसांनी एवढी मजा आली, एवढी हसले खुलून मी. दीपेशला कितीदा म्हटलं चल सोबत, तर काही आला नाही. कामाचा आणि सुटीचा बहाणा केला. खरं कारण बोलुन नाही दाखवलं तरी दोघांना माहित आहे.
यावेळेस त्याच्या एका आतेबहिणीचं लग्न तर होतंच पण माझ्या बॅचचं रीयुनियनसुद्धा होतं पहिलं.
मक्केतील उठाव २
या आधीचा भाग
इस्लाम स्थापन झाल्यापासून किंबहुना त्याआधीही मक्का हे शहर हे महत्त्वाचे धार्मिक स्थळ आहे. प्रत्येक मुसलमानाला अशी धर्माज्ञा असते की आयुष्यात एकदा तरी हजची यात्रा करावी. त्यामुळे प्रत्येक धार्मिक मुस्लिम आयुष्यात एकदा तरी ही तीर्थयात्रा करतोच. सौदी अरेबियाकरता मक्का हे एक प्रतिष्ठेचे स्थान आहे. जगभरातील मुस्लिमांनी पवित्र मानलेल्या जागेची व्यवस्था बघण्याची त्यांच्यावर जबाबदारी आहे. त्याचे पावित्र्य टिकवणे हे त्यांचे ते कर्तव्य मानतात. अर्थात ह्या यात्रेमुळे सौदी सरकारला मोठा महसूलही मिळतो.
मिसळपाव