Skip to main content

कडबोळी: दिवाळी स्पेशल

लेखक अनन्न्या यांनी गुरुवार, 27/10/2016 10:26 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व मिपाकरांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा!! पूर्वी अठराधान्यांची कडबोळी करत असत. अगदी अठरा नाही पण जी घरात उपलब्ध होती ती घेऊन केलेली खमंग कडबोळी! साहित्यः भाजणीसाठी: तांदूळ १ कि. ( मी गावठी वापरले), चणाडाळ अर्धा कि., उडीद पाव कि., एक वाटी पोहे, एक वाटी साबूदाणा, पाव वाटी तूरडाळ, पाव वाटी मसूरडाळ, पाव वाटी नाचणी, पाव वाटी मूग, पाव वाटी ज्वारी, अर्धी वाटी धने, पाव वाटी जीरे. कडबोळ्यांसाठी: एक कि. भाजणी, पाऊण लि. पाणी, तेल १५०मिली, ओवा पाव वाटी, तिखट, मीठ, हळद, तेल तळणीसाठी. कृती: तांदूळ धुवावेत आणि सावलीत वाळवावेत.

विश्वस्ता...

लेखक राजेंद्र देवी यांनी गुरुवार, 27/10/2016 08:17 या दिवशी प्रकाशित केले.
विश्वस्ता... जगावेगळा आहे मी फिरस्ता चोखाळतो मी अनोळखी रस्ता लावतो मलम मी परोपरी घाव घालणे हा तुझा शिरस्ता राहतो हजर प्रत्येक समारंभास बांधतो वेदनेचा नेहमी बस्ता केला गुन्हा, केली प्रीत तुजवरी आयुष्यात काढल्या अनेक खस्ता झालो चरणी लीन नियतीच्या आता तुझाच आहे भरवसा विश्वस्ता राजेंद्र देवी

एका वर्सात

लेखक संदीप डांगे यांनी गुरुवार, 27/10/2016 07:16 या दिवशी प्रकाशित केले.
एका वर्षाच्या बाद अकोल्यात येऊन रायलो परवाच्या दिवशी, अजून बी तसाच अशीन का माला गाव जसा व्हता मांगल्या वर्षी ? अजून बी पिकवित लोक सकाळी फिराले जात असतीन काय? दिवसभर मंग धूळ्ला खायाले तयार होत असतीन काय? च्या प्याले कप देतात, का अजूनही वापरतात बशी? अजून बी तसाच अशीन का माला गाव जसा व्हता मांगल्या वर्षी ? अजून बी दुपारच्या जेवनाले मंग वांग्यावर तर्री असते काय? गरमागरम वरणभातावर तुपाची धार खरी असते काय? इंजेक्शनवालं दुध देत नाहीत ना आपल्या म्हशी? अजून बी तसाच अशीन का माला गाव जसा व्हता मांगल्या वर्षी ? अजून बी सांजच्या पाराले लेकरं शुभंकरोती म्हणतात काय? गांदीरोळच्या त्या पानिपुरीलेच चौपाटी म
काव्यरस

रानडुक्कर/हरण इत्यादींची देशी शाकुती रेसिपी हवी आहे

लेखक साहना यांनी गुरुवार, 27/10/2016 06:32 या दिवशी प्रकाशित केले.
कुणाकडे रानडुक्कर, हरण, साळ, ससा इत्यादी जंगली जनावरांच्या शाकुती (किंवा इतर पाककृती) च्या रेसिपी आहेत का ? सशाचे मास चिकन, मटण च्या तुलनेत फार ड्राय असल्याने सशाचे मटण ची रेसिपी सपशेल फेल झाली. ह्यानिमित्ताने लक्षांत आले कि जंगली जनावरांच्या मासाच्या पाककृतीच्या रेसिपी अनेकदा थोड्या वेगळया असतात. कुणाला ठाऊक असेल/अनुभव असेल तर नक्की सांगावे. धन्यवाद!

मंगळ आणि शनी

लेखक आदित्य कोरडे यांनी गुरुवार, 27/10/2016 06:28 या दिवशी प्रकाशित केले.
५ मिनिट गटार गंगेजवळ उभे राहिले कि डोक्यावर डास वारली नृत्य करू लागतात तद्वतच माणूस जन्माला आला कि नवग्रह त्याच्या डोक्यावर फेर धरून नाचू लागतात . डोक्यावरचे डास दोन चार टाळया वाजवून पळवता येतात पण हे नव ग्रह एकदा का मानगुटीवर बसले कि मरेपर्यंत काही पिच्छा सोडावयाचे नाहीत .

माझ्या मनाचे बोल..

लेखक सोहम कामत यांनी बुधवार, 26/10/2016 20:24 या दिवशी प्रकाशित केले.
सतावते मनास तुझी, हवीहवीशी वाटणारी साथ.. एकांतात या घ्यावासा वाटतो, हाती तुझाच हात.. तुझे अलगद मंदहास्य माझ्या, हृदयाला थेट चिरते.. तुझ्या आठवणींच्या संग्रहात माझे, मन नकळत विरते....

हेअर कलरींग - भाग - २

लेखक कविता१९७८ यांनी बुधवार, 26/10/2016 17:04 या दिवशी प्रकाशित केले.
चला आता सुरुवात करुया मेंदी ने . १) दुकानातुन हातावर लावण्यासाठी वापरात येणारी मेंदी पावडर आणावी. २) लोखंडाच्या कढईत आपल्या केसांच्या लांबी च्या प्रमाणात मेंदी घ्यावी. ३) पाण्यामधे चहा पावडर किंवा कॉफी उकळुन (मी कॉफी वापरते) त्यात मेंदी कमीतकमी दोन तास भिजवावी.

सानु इश्क लगा है प्यार दा...

लेखक वेल्लाभट यांनी बुधवार, 26/10/2016 15:23 या दिवशी प्रकाशित केले.
ब्लॉगदुवा बरेच दिवसांनी एका गाण्याविषयी लिहावंसं वाटलं. तसं हे गाणं मी बरंच आधी ऐकलेलं आहे. एकदा नव्हे, तर अनेकदा, आणि परत परत. झिंग चढते अशी अनेकदा अनेक गाण्यांची, त्यापैकीच हे एक. a आबिदा परवीन. एक विलक्षण आर्तता असणारा हा आवाज जेंव्हा मी पहिल्यांदा ऐकला तेंव्हाच त्यातलं वेगळेपण कळलं. जाणवलं वगैरे नाही, स्पष्ट होतं ते.

!!!...अर्थ-हीन चरित्र…!!!

लेखक अर्थहीन यांनी बुधवार, 26/10/2016 14:24 या दिवशी प्रकाशित केले.
!!!...अर्थ-हीन चरित्र…!!! बक्कळ कोरड्या नदीतला, आयुष्याचा हा शेवटचा थेंब… बाष्पी-भवनाने वाफ होण्याआधी… दहा मिनटात… एक अर्थहीन आत्म-चरित्र खरडावं म्हणतोय… खरंतर, जन्मलो त्या दिवशीच भयानक रडलो होतो. आई बाप हसत होते, मी जन्मलो म्हणून अन मी रडत होतो, या जन्मात जन्मायच्या ‘फक्त एक-क्षण-आधी’, गेल्या जन्मात मेलो म्हणून … एक आई, एक बाप, एक भाऊ, एक बहिण… --ती तेवढी नाही… (ते दुख आलंच…) काही मित्र, काही शिक्षक, काही पाहुणे, काही वेपराईज्ड नाती………… (तेही दुख आलंच…) अन काही माझीच अनेक मलाच रोज भेटणारी विखुरलेली रूपे…! असे सगळेच आवडायचे मला तेव्हा… (सुरुवातीला लहानपणी हे होतंच...) (नाईलाजाने) मग मो
काव्यरस

मूल दत्तक घेणे हा मूर्खपणा नक्कीच नाही!

लेखक केडी यांनी बुधवार, 26/10/2016 14:23 या दिवशी प्रकाशित केले.
आदित्य कोरडे ह्यांनी ह्या विषयावर हा धागा काढला. त्यांना दुर्दैवाने प्रक्रियेत आलेला अनुभव हा नक्कीच चांगला न्हवता. आम्ही २०१३ मध्ये मूल (मुलगी) दत्तक घेतली तेव्हा आम्हाला आलेला अनुभव मात्र निश्चितच चांगला होता (काही थोडे सरकारी विलंब वगळता), म्हणून हि लेखमाला लिहितोय. ह्याचा उद्देश, आम्ही काही जगा वेगळे केले, किंवा इतर कुठलाही नाही, तर आम्हाला मिळालेले मार्गदर्शन, सल्ले आणि आलेले अनुभव इतरांशी शेयर करून, त्यांना त्यातून प्रोत्साहन आणि योग्य दिशा मिळवी एवढाच हेतू आहे.