Skip to main content

ये तू मैदानात : शेतकरी गीत

लेखक गंगाधर मुटे यांनी सोमवार, 14/11/2016 12:04 या दिवशी प्रकाशित केले.
ये तू मैदानात : शेतकरी गीत

ये तू मैदानात, ये तू मैदानात
ये तू मैदानात, पाईका ये तू मैदानात
काळ्या आईचा एल्गार
बिगूल फुंकण्या हो तय्यार
उलवून फेकू गुलाम बेड्या
जगण्या स्वातंत्र्यात
जगण्या स्वातंत्र्यात, जगण्या स्वातंत्र्यात
जगण्या स्वातंत्र्यात, पाईका ये तू मैदानात ||धृ||

गोरे गेले, काळे आले
शस्त्राचे रंगांतर झाले
काळी आई खितपत पडली
विझल्या अंधारात
विझल्या अंधारात, विझल्या अंधारात
विझल्या अंधारात तेवण्या, ये तू मैदानात

एक पत्र "पप्पा"साठी

लेखक कऊ यांनी सोमवार, 14/11/2016 08:48 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय पप्पा, मुळात आधी एकाच घरात राहत असताना पत्र लिहिलचं का?हा प्रश्न तुम्हाला पडला असेल.6 नोव्हेंबरला माझा वाढदिवस झाला. पण तेव्हा तुम्हाला सांगितलच नाही की तुम्ही बनवलेली बिर्याणी मस्त झाली होती. दुसर्याच दिवशी अंकिताने message केला की "कऊ तुझे पप्पा किती भारी आहेत ग,अस वाटलचं नाही की त्यांना आम्ही पहिल्यांदाच भेटलो." माझ्या वाढदिवसाला तुम्ही खूप काही केलं.पण आज तुमचा वाढदिवस आहे आणि तुम्ही तो साजरा नाही करणार हे माहित आहे.त्यापेक्षा गणपतीच्या मंदिरात जाऊन देवाचे आशीर्वाद घ्यायला तुम्हाला आवडत पण पप्पा मला हे माहिती आहे की तुम्ही स्वतः साठी काही मागत नाही.

हिलरी क्लिन्टन जिंकली असती तर..... मी हे असं लिहीलं असतं!

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी सोमवार, 14/11/2016 07:37 या दिवशी प्रकाशित केले.
आनंदी आनंद गडे इकडे तिकडे अमेरिकेकडे अखेर अमेरिकेची दुर्गा-हिलरी(आज्जी), अमेरिकेची ४५ वी आणि पहिली स्त्री प्रेसिडेंट झाली. ही बातमी ऐकून बहुतांश जगाला आणि विशेषकरून अखील जगातल्या बहुतांश स्त्रीवर्गाला आनंद झाला असेल नाही का रे भाऊ? तुला खरंच असं वाटतं? पण ते जाऊदे.कोकणीत एक म्हण आसां. "झंय गाव आसां थंय म्हारवड असतलोच." हिलरी खरीच जीद्दीची स्त्री आहे असं तुला वाटतं कारे भाऊ? म्हणूनच मी तिला दूर्गा म्हणतो ना रे?

जसा आपला चितळे तसा टेनसीचा जॅक डॅनियल्स !

लेखक जॅक डनियल्स यांनी सोमवार, 14/11/2016 01:14 या दिवशी प्रकाशित केले.
तसे अल्कोहोल आणि माझे तसे जुने नाते आहे. पिण्याच्या निमिताने किंवा अभ्यासाच्या निमित्ताने हे केमिकल माझ्या आयुष्यात येतच गेले. थर्ड इअरला असताना distillary डिझाईनचे फक्त प्रश्न सोडवून मी plant technology चा पेपर सोडवला होता. जेडीला तर मी पुण्यात ओळखतच नव्हतो, आपले मित्र सुरवातीचे मित्र म्हणजे white mischief आणि ओल्ड मोन्क (हा मित्र अजून टिकून आहे.)!

पत्थर

लेखक जव्हेरगंज यांनी सोमवार, 14/11/2016 00:40 या दिवशी प्रकाशित केले.
जवळ जवळ अडीच तास मी त्या बसस्टँडवर उभा होतो. कोणतीही बस आली की पळत जाऊन बोर्ड वाचणे हे माझे कामच होऊन बसले. अतिशय अवजड अशी सुटकेस मी एका बाकड्याच्या शेजारी ठेऊन दिली होती. तीही कोणीतरी उचलून चोरुन घेऊन जाईल म्हणून मी मोकळ्या पटांगणातून तिच्यावर नजर ठेऊन होतो. कोल्हापूरला जायच्या सतरा बस येऊन गेल्या. एकाही बसमध्ये नीट उभा राहायलाही जागा नव्हती. वरच्या दांडक्याला धरुन अडिचशे तीनशे किलोमीटरचा प्रवास एका पायावर उभा राहून करायच्या विचारानेच कडमडायला झाले होते. आता इथे दिवसरात्र बसून राहिले तरी हाती काय फारसे लागणार नव्हते. सरळ सुटकेस उचलली आणि हायवेवर आलो.

ग्रंथ परिचय - ग्रामगीता भाग 2

लेखक शशिकांत ओक यांनी सोमवार, 14/11/2016 00:38 या दिवशी प्रकाशित केले.
भाग 2 पुढे चालू...

ग्रामगीता

भाग 2 विविध पंचक योजनाकरून गीतेचे विषयानुरूप आठ विभाग पाडले आहेत, ते असे - पहिल्या सद्धर्म पंचकात देव, धर्म, आश्रम, संसार-परमार्थ आणि वर्णव्यवस्था यावर भाष्य आहे. दुसऱ्या लोक वशीकरण पंचकात संसर्ग-प्रभाव, आचार-प्राबल्य, प्रचार-महिमा, सेवा सामर्थ्य, आणि संघटना-शक्ती याचा विचार केला आहे. तिसऱ्या ग्रामनिर्माण पंचक

हम सब चोर हैं (आपण सर्व चोर)- एक जाणीव

लेखक विवेकपटाईत यांनी रविवार, 13/11/2016 16:52 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या देशात ९४ टक्के आर्थिक व्यवहार रोख होतो. देशात फक्त १ टक्के लोक आयकर भारतात. त्यात हि ९० टक्के आयकर देणारे संगठीत क्षेत्रातले कर्मचारी आणि मजबूरी में इमानदार सरकारी बाबू आहेत. काय करणार सरकार न विचारता पगारातून आयकर कापून घेते. बाकी अधिकांश थोक आणि फुटकर व्यापारी आपला धंधा रोख करतात. मला आठवते, २०१३ मध्ये मुलीचे लग्न ठरले, चांदणी चौक येथे एका मित्राच्या ओळखीच्या दुकानात कपडे विकत घ्यायला गेलो. ज्या दुकानात रोज २५-३० लाखांचा व्यवहार होत होता, त्या दुकानदाराने डेबिट कार्ड नाकारले. ATM मधून पैशे काढून नगदी द्यावी लागली. निश्चितच हा दुकानदार आयकर भरत नसणार.

सोनचाफ्याची फुलं आणि तो स्पर्श (भाग ५)

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी रविवार, 13/11/2016 01:45 या दिवशी प्रकाशित केले.
उतार वय होण्या अगोदर जे आयुष्य असतं ते ही मनाची द्विधा करीत असतं त्यावेळच्या आठवणी. सुम्याच्या मुलीची अमेरिकेतली कॉलेजची वर्ष आता संपत आली होती.सुम्याचा एक प्रश्न तिच्या मुलीने सोडवला होता.सुम्याच्या मुलीला अमेरिकेतच एक चांगला जोडीदार मिळाला होता.तो पुण्याचाच होता.

माझ्या प्रेमाचे मनोगत

लेखक सोहम कामत यांनी शनिवार, 12/11/2016 22:43 या दिवशी प्रकाशित केले.
कधी वाटे मजला जणु पोट भरून हसावे.. प्रेमाच्या या नात्यामध्ये अलगद हळूच फसावे.. कधी वाटे मजला जणु डोळे पाणवून रडावे.. काय जाहले विचार करूनी जीव आवळून चिडावे.. कधी वाटे मजला जणु तुझ्या प्रेमात रंगावे.. मिठीत घेऊन तुला कानी प्रेमळ गूज सांगावे.. कधी वाटे मला जणु तुलाच पहात बसावे.. नयनी माझ्या तुझे निर्मळ निरागस हसू ठसावे.. कधी वाटे मजला जणु तुझी साथ असावी.. चांदण्या रातीत चंद्राच्या प्रकाशी तुझीच प्रित दिसावी.. कधी वाटे मजला जणु तुला समजून घ्यावे.. तुलाच माझ्या हृदयी ध्यानी मनी स्थान द्यावे.. कधी वाटे मजला जणु तुझे दु:ख गिळावे.. माझे सुख तिरक्या वाटेने तुझ्यापाशी वळावे.. कधी वाटे