Skip to main content

डिमॉनेटायझेशन / Demonetisation (भाग ५)

लेखक Anand More यांनी सोमवार, 21/11/2016 12:15 या दिवशी प्रकाशित केले.
---------- भाग १ | भाग २भाग ३भाग ४ |भाग ५ ----------

काळा पैसा संपेल काय?

सरकारने हा निर्णय घेऊन स्वतःचा ताळेबंद साफ करायला सुरवात केली आहे. मागे नमूद केल्याप्रमाणे ही रक्त बदलाची प्रक्रिया आहे आणि ती देखील रुग्णाला भूल न देता केली गेलेली आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेला दणके बसणे स्वाभाविक आहे.

तत्वा, तुझी किंमत बघ!

लेखक वेल्लाभट यांनी सोमवार, 21/11/2016 08:12 या दिवशी प्रकाशित केले.
तत्वा, तुझी किंमत बघ शून्य झालीय आता जनता तुला टाकूनच धन्य झालीय आता चोरी, लबाडी यांच्या वाटा गजबजल्यात सार्‍या सत्याची तर वर्गवारी 'अन्य' झालीय आता आपली झोळी भरत जावं अगदी मनोभावे जावो बाकी खड्ड्यामधे आपण सुखी रहावे कर्माची ही नवी व्याख्या मान्य झालीय आता आदर बिदर लाड झाले, विचारणंही खूप आपलं अडल्यास बोंबाबोंब बाकी चिडीचूप वागण्याची ही तर्‍हाच 'सौजन्य' झालीय आता कोण तो लाकूडतोड्या सांग त्याचे काय झाले आज इतिहासातले आदर्शही ते चूक ठरले माणसांची ती प्रजाती 'वन्य' झालीय आता तत्वा, तुझी किंमत बघ शून्य झालीय आता जनता तुला टाकूनच धन्य झालीय आता - अपूर्व ओक
काव्यरस

सोनचाफ्याची फुलं आणि तो स्पर्श (भाग ७)

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी सोमवार, 21/11/2016 07:45 या दिवशी प्रकाशित केले.
सुम्याच्या उतारवयातल्या आठवणी. खासगी नोकरीला निवृत्तीचं वय नसतं.गुरूनाथ सारखे, वेळ जावा म्हणून किंवा कार्यक्षम रहाण्यासाठी काम करत असतात.शरीर थकत असतं हे अशावेळी जाणवत नाही.बाहेरचे अवयव उदा.डोळे, कान, हातपाय,जोपर्यंत कुठलीच कुरकुर न करता कामात येतात तोपर्यंत सगळे काही आलबेल आहे असं वाटत असतं.पण शरीरातल्या आतल्या अवयवांचं काय?

डिमॉनेटायझेशन / Demonetisation (भाग ४)

लेखक Anand More यांनी रविवार, 20/11/2016 13:31 या दिवशी प्रकाशित केले.
---------- भाग १ | भाग २भाग ३ । भाग ४ |भाग ५ ----------

डिमॉनेटायझेशन आणि रॉबिन हूड

डिमॉनेटायझेशनबाबत काही जणांना असे वाटते की जुने चलन रद्दबातल केल्यामुळे देशाचे नुकसान होते किंवा देश गरीब होतो. जे लोक आपल्याकडील जुने चलन कुठल्याही कारणामुळे सरकारकडे जमा करणार नाहीत त्यांना तो पैसा नवीन चलनाच्या रूपात परत मिळणार नाही. आणि आता जुने चलन रद्दबातल केले असल्यामुळे त्यांच्याकडील जुन्या नोटा कुचकामी ठरतील.

देवगिरीचे यादव

लेखक आशुतोष-म्हैसेकर यांनी रविवार, 20/11/2016 00:57 या दिवशी प्रकाशित केले.
देवगिरीचे यादव संभाजीनगर(औरंगाबाद) म्हणजे दख्खनप्रदेशाची ‘खिडकी’ आणि इतिहासातल्या गोष्टी सांगतात त्याप्रमाणे उत्तरेतल्या शक्तींना दक्षिणेकडे विशेषतः सातपुडा डोंगरांच्या पलीकडे सह्याद्रीला लागून असलेल्या ह्या सुपीक प्रदेशात उतरण्याच्या एक प्रमुख मार्ग म्हणजे आजचे संभाजीनगर आणि आसपासचा प्रदेश. त्यात सर्व प्रदेशावर नियंत्रण ठेऊ शकेल असा एकमेव,अभेद्य किल्ला देवगिरी.

इंदिराजी

लेखक जॉनी यांनी शनिवार, 19/11/2016 23:12 या दिवशी प्रकाशित केले.
'गत हजार सालोंका युद्ध हमने जित लिया है.' माजी पंतप्रधान इंदिराजी यांचा आज जन्मदिवस. यानिमित्तानं त्यांच्या कारकीर्दीबद्दल थोडंसं... कित्येक वर्षं नेहरूंची मुलगी यापेक्षा वेगळं स्थान नव्हतंच इंदिराजींचं. गुंगी गुडीया वगैरे म्हणायचे त्यांना. आणि बरंच तथ्य पण होतं त्यात. केरळ सरकार खाली खेचणं सोडलं तर अत्यंत साधारण असाच कार्यकाळ राहिला होता त्यांचा. झंझावाती कारकिर्दीला सुरवात झाली 70-71 साली. जानेवारी 1971 मध्ये आपलं जम्मू ते श्रीनगर विमान हायजॅक करून लाहोर ला उतरवण्यात आलं आणि अतिरेक्यांनी काही मागण्या केल्या. इंदिराजींनी ठाम भूमिका घेऊन दहशतवादासमोर झुकण्यास ठाम नकार दिला.

कर्मयोगी श्री एकनाथजी रानडे- भाग २ कार्य

लेखक आर्या१२३ यांनी शनिवार, 19/11/2016 21:31 या दिवशी प्रकाशित केले.
एकनाथजी रानडे यांचे कार्य शिलास्मारकाची कथा एकनाथजींच्या आत्मचरित्रापासून वेगळी करणे अशक्य आहे. ज्यांनी प्रत्येक अडथळा संधीमध्ये परिवर्तित केला, प्रत्येक आव्हानाचे रूपांतर विजयात केले, अश्या असामान्य व्यक्तित्वाचे गुण सांगणे एका छोट्या लेखात शक्य नाही. तरीही हा छोटासा प्रयत्न: अशी कोणतीही समस्याच नव्हती त्यावरचा उपाय त्यांच्याजवळ नव्हता, त्यांचे स्वतःचे शब्दच द्यायचे तर ," प्रत्येक डावपेचाला प्रति-डावपेच, प्रत्येक शस्राला प्रतिशस्त्र असतेच ", या सत्याने समग्र दर्शन, निवारण होणारच अशा अडचणीतून एकनाथजींनी कसा मार्ग काढला यातून होते.

कर्मयोगी एकनाथजी रानडे भाग १

लेखक मंजूताई यांनी शनिवार, 19/11/2016 21:20 या दिवशी प्रकाशित केले.
सरदार वल्लभभाई पटेल म्हणतात, मला जर का लोकं लोह पुरुष म्हणत असतील तर एक पोलादी पुरुषही आहे आणि तो म्हणजे 'एकनाथजी' विवेकानंदांच्या विचारांचा अभ्यास करणाऱ्या व त्यांच्यापासून प्रेरणा घेणाऱ्या अनेक व्यक्ती आहेत पण त्यांच्या रक्तात, नसानसात विवेकानंद भिनलेले आहेत अश्या प्रामुख्याने व ठळक तीन व्यक्ती आहेत प्रथम क्रमांकावर भगिनी निवेदिता, सुभाषचंद्र बोस व तिसरी व्यक्ती माननीय एकनाथजी रानडे! एक जीवन एक ध्येय चा मंत्र देणाऱ्या माननीय एकनाथजींचा एकशे दोनवा जन्मदिवस! त्यांना भावपूर्ण आदरांजली!

परीकथा - भाग तेरा - फेसबूक स्टेटस २.७ - २.८ वर्षे

लेखक तुमचा अभिषेक यांनी शनिवार, 19/11/2016 17:14 या दिवशी प्रकाशित केले.
११ ऑक्टोबर २०१६ "पप्पा तू ईथे झोप, उठू नकोस", काल रात्री जेवल्यावर तिने मला सोफ्यावर आडवे केले. मग आतल्या खोलीतून मोबाईलचा चार्जर घेऊन आली. स्वत:च्या गळ्याभोवती लटकावला. माझी बनियान वर सरकवली. आणि त्या चार्जरच्या वायरचे टोक माझ्या उघड्या पोटावर टेकवून म्हणाली, "मी तुला तापवते" मी हडबडलो.. तापवते !! चार्जरने?? पण तिच्या गळ्यात लटकावलेल्या चार्जर कम स्टेथोस्कोपवरून काय ते समजलो.. मी तुला तपासते :) मग मला बाऊ झालाय हे डिक्लेअर करून रीतसर औषध दिले गेले. पण सोबत आईसक्रीम सुद्धा दिले.

डिमॉनेटायझेशन / Demonetisation (भाग ३)

लेखक Anand More यांनी शनिवार, 19/11/2016 12:09 या दिवशी प्रकाशित केले.
---------- भाग १ | भाग २ । भाग ३ । भाग ४ |भाग ५ ----------

नकली चलन आणि काळा पैसा

अनेकांना नकली चलन आणि काळा पैसा हे दोन्ही शब्द समानार्थी शब्द वाटतात. त्यामुळे त्यांचा गैरसमज होतो की नकली चलन पकडले की आपोआप काळा पैसा संपेल. परंतू ज्या देशात सर्व व्यवहार हिशोबात घेऊन करप्रणालीद्वारे सरकारला कळवले जात नाहीत त्या देशात नकली चलन आणि काळा पैसा हे समानार्थी शब्द नसतात. नकली चलन म्हणजे फसविण्याचा हेतूने वापरलेले अनधिकृत चलन.