Skip to main content

निश्चलनीकरण व परदेशस्थ भारतीयांच्या समस्येबाबत याचिकेसाठी पाठिंब्याचे आवाहन

लेखक श्रीरंग_जोशी यांनी मंगळवार, 27/12/2016 09:58 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, माननीय पंतप्रधानांनी ८ नोव्हेंबर रोजी सरकारच्या निश्चलनीकरणाच्या निर्णयाची घोषणा केली. प्राथमिक प्रतिक्रियांनंतर परदेशात राहणाऱ्या भारतीयांमध्ये त्यांच्याजवळ असणाऱ्या ₹५०० व ₹१००० च्या जुन्या नोटांचे काय करावे याची काळजीयुक्त चर्चा सुरू झाली. सरकारने जाहिर केलेल्या माहितीनुसार परदेशात राहणाऱ्यांनी ३० डिसेंबर २०१६ किंवा ३१ मार्च २०१७ पर्यंत प्रत्यक्ष भारतात येऊनच स्वतःजवळच्या जुन्या नोटा बदलून घ्यायचा किंवा स्वतःच्या एनआरओ खात्यात जमा करण्याचा पर्याय उपलब्ध होता.

सोनचाफ्याची फुलं आणि तो स्पर्श (भाग १३ )

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी मंगळवार, 27/12/2016 08:23 या दिवशी प्रकाशित केले.
सुम्याच्या पश्चात येणार्‍या आठवणी गुरूनाथ आपले दिवस असेच घालवीत होता.सकाळी उठून सोनचाफ्याची फुलं प्रत्येकाच्या फोटो समोर ठेवायची.आता त्यात सुम्याच्या फोटोची भर पडली होती.पहिले काही दिवस तिच्या फोटोला फुलं वहाताना गुरूनाथ खूपच भावनावश व्हायचा.फुलं वहाण्याच्या निमीत्ताने रोज सकाळी त्याला सुम्याचा चेहरा दिसायचा आणि तो पाहून घळघळा रडायचा.कधी कधी तिच्या फोटोसमोर ठाण मारून बसायचा.

अंतरंग

लेखक अमिता राउत यांनी सोमवार, 26/12/2016 23:04 या दिवशी प्रकाशित केले.
मी न माझे राहिले शब्द कंठी दाटले, सुक्या पापण्यांचे पाते ओले भासले. काय सांगु मनाला या बुद्धीची अगतिकता. स्वच्छंदी अंतरंग रंगले नकळत हसु उमटले , जुन्या आठवणींचे मनी गीत गुंजले . अंतरंगाची वेडी माया स्वप्नांची पाठ सोडेना, बिलगुनी तू मज येता अंगी रोमांच उठले. बेधुंद मुक्त मनाने वेध घेत करी आसमंती विहार. आसवांना चुकवत करी धाव जीवलागाचा. ऊन सावलीचा खेळ आयुष्याचा, गोडासाठी साथ खार्याची …
काव्यरस

हा त्याचा 'लास्ट ख्रिसमस' ठरला

लेखक वेल्लाभट यांनी सोमवार, 26/12/2016 17:12 या दिवशी प्रकाशित केले.
ब्लॉग दुवा नव्वदीच्या दशकात जी व्यक्ती इंग्रजी गाणी ऐकत असेल तिला जॉर्ज मायकल हे नाव अपरिचित असणं शक्य नाही. काहीसा पॉप, डान्स किंवा डिस्कोचा बाज असलेली या गायकाची गाणी अतिशय प्रसिद्ध झाली. १९८७ ला आलेला त्याचा पहिला म्यूझिक अल्बम फेथ. याच्या २ अब्जाहून अधिक प्रती विकल्या गेल्या. तिथपासून अनेकवेळा आपल्या गाण्यांमुळे किंवा इतर वैयक्तिक गोष्टींमुळे चर्चेत राहिला. २५ जून १९६३ रोजी लंडनमधे जन्मलेला, ३० वर्षाची सांगितिक वाटचाल केलेला हा कलाकार काल म्हणजेच २५ डिसेंबर २०१६ रोजी काळाच्या पडद्याआड गेला.

धावते विचार :)

लेखक मन यांनी सोमवार, 26/12/2016 17:01 या दिवशी प्रकाशित केले.
---------काल गावाकडून पुण्याकडे एशियाड्मधून येत होतो. तेव्हाचं डोक्यातलं विचारचक्र ------ पंधरा नम्बरची सीट मिळालेये मस्त.अगदि मध्यभागी बसच्या.शिवनेरी वॉल्वो ऐवजी ह्यावेळी एशियाड घेउन किती स्मार्टपणा केलाय बॉस मी. संध्याकाळची वेळ. मस्त आल्हाद गारवाय हवेत. वाहती हवा. अगदि गरमी म्हणावी अशीही हवा नाही, आणि अगदि गारठून वैतागावे अशीही थंडी नै. मी स्वतःवरच खुश. आपण किती स्मार्ट आहोत त्याबद्दल. एरव्ही खूपदा शिवनेरीने जातो असह्य उकाडा वाटला तर. साडे तीनशे ऐवजी ऑल्मोस्ट सातशे रुपये पडतं भाडं इन द्याट केस. . . एशियाडच्या साडे तीनशे ऐवजी जवळपास दुप्पट... म्हंजे सातशे रुपये भाडं शिवनेरीचं.

जाणता राजा

लेखक महासंग्राम यांनी सोमवार, 26/12/2016 12:55 या दिवशी प्रकाशित केले.
गाव : विदर्भातलं एक खेड वेळ : सकाळची , स्थळ : गावाची चावडी पात्र : रामराव आणि शामराव, वय : ५५-६० च्या आसपास. रामराव : "राम राम ओ शामभौ कुटी चालले इतक्या घाई मदी." शामराव : "राम राम, ते शेतात गेल्तो जरा सोयाबीन ले पानी द्याचं व्हतं, तुमाले मालूम नाई का रातीची इज देतात ना ते MSEB वाले." "न आता जरा उमरावातीले जाऊन येतो, ते मावा पडलाय सोआयबीन वर त्यासाठी कीटकनाशक घेऊन येतो जरा.

It's a Tie !!

लेखक स्पार्टाकस यांनी सोमवार, 26/12/2016 12:31 या दिवशी प्रकाशित केले.
१९६० सालचा डिसेंबर महिना... फ्रँक वॉरेलचा वेस्ट इंडी़जचा क्रिकेट संघ ऑस्ट्रेलियाच्या दौर्‍यावर आला होता. फ्रँक वॉरेल हा वेस्ट इंडीजचा पहिला कृष्णवर्णीय कॅप्टन! गोर्‍या ब्रिटीशांचा पगडा असलेल्या वेस्ट इंडी़जचे पूर्वीचे सर्व कॅप्टन्स गोरे होते. वॉरेलच्या संघात वेस्ट इंडीजचा शेवटचा गौरवर्णीय कॅप्टन आणि विकेटकीपर जेरी अलेक्झांडरचाही समावेश होता! अलेक्झांडर व्यतिरिक्त कॉनरेड हंट, सेमूर नर्स, रोहन कन्हाय, जो सॉलोमन आणि गारफिल्ड सोबर्स असे एकापेक्षा एक बॅट्समन वॉरेलच्या संघात होते.

आठवणी दाटतातः आठवणीतली गाणी

लेखक अफगाण जलेबी यांनी सोमवार, 26/12/2016 11:31 या दिवशी प्रकाशित केले.
.inwrap { background: url(https://lh3.googleusercontent.com/Lp_d4i7_2MsOm0urqKpCOtvWkKCpcWUtKx9R26oyRLUdsXVNFLWI9fchPBYuB1tDK0x-MqG1Ew=w320-h331-no); background-size: 100%; background-repeat: repeat; } माझ्या घरी गाण्याचे शौकीन जरी कोणी नसले तरी रेडिओच्या कृपेने दिवसाची सुरुवात आणि शेवट संगीतमय व्हायचा. आमच्या चाळीत तेव्हा जेमतेम एका बि-हाडात टीव्ही असेल. तोही आजच्यासारखा २४ तास नव्हता. शिवाय तो बघायचा म्हणजे त्याच्यासमोर बसावं लागे. त्यापेक्षा रेडिओ छान वाटायचा. समोर नसला तरी ऐकू येणाऱ्या गाण्यांमुळे त्याचं अस्तित्व जाणवायचं.

मन्याची नोटबंदी !

लेखक चिनार यांनी सोमवार, 26/12/2016 10:54 या दिवशी प्रकाशित केले.
८ नोव्हेंबरला पंतप्रधानांनी नोटबंदीची घोषणा केली. त्यावर बऱ्यावाईट प्रतिक्रिया येणं सुरु झालं.काळ्या पैशेवाल्यांचे चेहरे पांढरे पडले अन प्रामाणिक लोकांचे चेहरे खुलले. पण काळे नं पांढरे ह्यातल्या कश्याशीही संबंध नसलेला आमचा मन्या मात्र नोटबंदीच्या निर्णयानंतर परेशान झाला होता. आता अर्थातच हे आमच्या ध्यानात आलं नव्हतं. साहजिकच आहे म्हणा, नोटबंदी नंतरच्या गदारोळात मन्याची आठवण येणे शक्यंच नव्हते. पण त्यादिवशी बँकेच्या लायनीत उभा असताना, दूर झाडाखाली मन्या दिसला. मी त्याच्याजवळ गेलो. "काय मन्या? इकडे कोणीकडे?" "काही नाही रे", मन्या हताशपणे म्हणाला. "काय झालंय तुला?