Skip to main content

जपुन टाक पाउल

लेखक Vinayak sable यांनी शुक्रवार, 26/05/2017 15:20 या दिवशी प्रकाशित केले.
"जपून टाक पाउल ... इथे प्रत्येक वाट आपली नसते जपून ठेव विश्वास इथे प्रत्येक माणुस आपला नसतो जपून घे निर्णय इथे प्रत्येक पर्याय आपला नसतो जे भांडल्यावर आधी क्षमा मागतात, त्यांची चुक असते म्हणून नव्हे, तर त्यांना आपल्या माणसांची पर्वा असते म्हणून.. जे तुम्हाला मदत करायला पुढे सरसावतात ते तुमचे काही देणे लागतात म्हणून नव्हे, तर ते तुम्हाला आपलं मानतात म्हणुन......!
काव्यरस

मन से बाता अर्थात मनोगत...

लेखक उपेक्षित यांनी शुक्रवार, 26/05/2017 13:15 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या बराच उकाडा आहे सगळीकडे त्यामुळे सगळीकडे कुलर/एसी नाहीतर निदान फॅन ची तरी प्रचंड मागणी आहे. थोडा वेळ जरी वीज गेली तरी आपला जीव कासावीस होतो. परवा रात्री दिवसभर दमून मस्त झोप लागली होती पण नेमकी पहाटे २/२.३० ला वीज गेली आणि घामाच्या धारांनी जीव पार कासावीस झाला. कुठे पेपर ने वारे घे कुठे पाणीच मार चेहऱ्यावर असे उद्योग चालू होते. अचानक पेपरने वारे घेता घेता मन भूतकाळात गेले. तेव्हा मी साधारण ७/८ वीत असेल आम्ही पुण्यात कर्वेनगरला हिंगणे होम कॉलोनीत एका बैठ्या चाळीत राहायला होतो. काही कारणास्तव चाळीचे वीजेचे कनेक्शन तोडले होते आमच्या.

कोकणात कुठे फिरावे ? काय बघावे? कुठे रहावे ?

लेखक चित्रगुप्त यांनी शुक्रवार, 26/05/2017 12:22 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रहो, येत्या ऑगस्ट महिन्यात साधारणतः १२ ते १६ तारखेच्या दरम्यान कोकणात फिरायला जावे असा बेत आहे. आम्ही दोघे, मुलगा-सून आणि ६ वर्षांचा नातू असे पाच जण असू. गणपतीपुळे व आसपासचा परिसर पूर्वी बघितलेला आहे. गर्दीच्या जागा किंवा प्रसिद्ध देवस्थाने वगैरे नकोत. शांत, निसर्गरम्य समुद्रकिनारा, धबधबे, किल्ले, लहान खेडी, अप्रसिद्ध पण सुंदर मंदिरे/लेणी असे काही बघायला मिळाले तर बरे. या संदर्भात कुठे कुठे जात येईल, रहाण्याची/जेवण्याची सोय कुठे करावी, पुण्यापासूनच गाडी करून जावे किंवा कसे ? गाडीचा खर्च अदमासे किती येईल ? वेळ किती लागेल ? (पुण्यातून निघून परत पुण्यालाच यायचे आहे).

हळद

लेखक माधुरी विनायक यांनी शुक्रवार, 26/05/2017 12:09 या दिवशी प्रकाशित केले.
सगळ्यांच्या जखमा भरणारी हळद, तिला मात्र जखमी करून जाते... आजही ती कोणाच्या हळदीला जायचं अट्टाहासाने टाळते... जखमेवर हळद भरायची म्हटलं की तिचे डोळे येतात भरून... आजही.. हरितालिका पुजताना, वटपौर्णिमेला मागणं मागताना, कातर होते ती... अंगाला लागलेली हळद कोणाची.. कळेनासं होतं.. वेडावून जाते ती.. त्याने विनोद पाठवला जखम होण्याआधी फक्त लग्नातच हळद लागते तिचे डोळे भरून आले... हळदीच्या विनोदानेच जखमेवरची खपली काढली... हळदीनेच होणाऱ्या जखमेवर उपाय काय.....

पैलवान-१

लेखक चांदणे संदीप यांनी शुक्रवार, 26/05/2017 11:54 या दिवशी प्रकाशित केले.
"मोप.... मोप... मोप पटांगण व्हतं राव!" शंकऱ्या, विनोद आणि रामाचे ग्लास धरलेले हात तोंडाशी जाईना, पुढचं ऐकण्यासाठी चकणा चावायचा पण थांबवला त्या तिघांनी. "....तरीबी पब्लिक कुस्तीच्या रिंगणाजवळ एवढ दाटीवाटीनं बसल्यालं की एकाला ढकाल्ला असता तरी वळीन सगळी सांडली असती. कुस्तीच आशी आजाब लावल्याली! गावबी आजाबच म्हणायच! म्याबी लका पैलवान हाय, पण आपलीबी छाती झाली नस्ती त्या डोंगराच्या बगलत मान द्यायची. ह्ये मोठ्ठा तगडा राक्षिसावनी गडी आन दुसरं कोनतरी फाळकं होतं. पर अर्धा तास उलाटला तरी त्यो चिपाड काय पडना गड्या! त्या ढोल्यानं कुस्तीतले आसत्याल नसत्याल तेवढे डाव लावले पण ह्यो दुसरा काय दाद दिना!

अण्णारती- विरहखंड भाग १

लेखक माम्लेदारचा पन्खा यांनी शुक्रवार, 26/05/2017 11:19 या दिवशी प्रकाशित केले.
येई हो अण्णा रे माझे माऊली ये । कीबोर्डवरी बोट ठेऊनी वाट मी पाहे ।। धृ।। आलिया गेलिया कोणी धाडी निरोप । कराडमधी आहे माझा मायबाप ।। १।। काळा शर्ट अन विजार कैसा सुंदर दिसला । घोड्यावर बैसोन अण्णा शुक्रवारी गेला ।। २।। अण्णांचे चार शब्द आम्हा नित्य जाळ लावी । अण्णादास म्हणे आता कोण कळ लावी ।। ३।।

सांज मुकी

लेखक चांदणशेला यांनी शुक्रवार, 26/05/2017 09:55 या दिवशी प्रकाशित केले.
सांज मुकी आक्रंदताना ह्रदयाची उदास वाणी पाखरांची हरवून वाट सांजकीनारी ना साजणी ओढून आसवांत रात्र अंबरात केविलवाणे दिवे या चिरेबंदी अंधारात अवचित मिटून जावे सर्वस्व उधळून तरीही झेलीत शापांचे चांदणे आयुष्याचा दाटून काळोख धूसर पडसाद जुने असुरी अनाहत दिशा गहिवरला अंतरी गुंजारव हेलावतो अतूट बंध दिठीत तेवतो जन्म तुझ्यास्तव
काव्यरस

सांगा

लेखक अरूण गंगाधर कोर्डे यांनी गुरुवार, 25/05/2017 22:49 या दिवशी प्रकाशित केले.
बंधने झुगारणे माझ्याच हाती मानणे ना मानणे माझ्याच हाती कापलेले पंख किती उडणार सांगा प्रगतीची वाटचाल कशी करणार सांगा दूर चाललेले ध्येय कधी गाठणार सांगा वेग मोकळा कसा मी सोडणार सांगा छत्र पित्याचे हरवले कसे सांगणार सांगा रांगणाऱ्या बालकाला कशी समजावणार सांगा जीवनाला ऊत आला , भोवताली काळ माजला हरवलेले सर्वस्व तिला कसे मिळणार सांगा
काव्यरस

युएस कॅपिटॉल उत्तरार्ध

लेखक श्रीरंग_जोशी यांनी गुरुवार, 25/05/2017 11:15 या दिवशी प्रकाशित केले.
~ पूर्वार्ध ~ पहिल्या दिवशी कॅपिटॉल बाहेरून पाहिल्यावर दूसर्‍या दिवशी आम्ही कॅपिटॉल आतून पाहण्यास परतलो. सुरक्षा तपासणी पार पाडून आम्ही व्हिजिटर सेंटर मध्ये पोचलो.

फॉर्मॅलीटी

लेखक समो यांनी बुधवार, 24/05/2017 19:49 या दिवशी प्रकाशित केले.
बरेच दिवस झाले हा लेख लिहायचा असे चाललेलं आज योग आला. त्याला कारण ही तसेच आहे, गेल्या महिन्यात एका पाहुण्यांच्या घरी कामा निमित्त जाण्याचा योग आला, मी आपला साधारण संध्याकाळच्या वेळी गेलो, जसे सर्वांचे असते तसेच आमच्याही गप्पा टप्पा झाल्या त्याच बरोबर गॉसिपिंग मधून इतर पाहुण्यांचे क्षेम कुशल कळाले.