अँजेलिना जोलिची 'कुंडली' भाग: २
भाग: १
स्थळ : PINK LOTUS BREAST CENTER , LOS ANGELES
Dr. Kristi Funk च्या कन्सल्टिंग रूममध्ये अँजेलीना जोली तिचा BRCAचा ( BReast CAncer ) जेनेटिक्स रिपोर्ट काळजीपुर्वक वाचत होती, तपासणीमध्ये BRCA1 आणि BRCA2 जीन्समध्ये म्युटेशन आढळले होते. अशा पेशंटला सल्ला व त्यांच्या शंकांचे निरसन करण्याचा Dr. Kristi Funk ना दांडगा अनुभव होता, त्यामुळे हॉलीवूडची ख्यातनाम अभिनेत्री अँजेलीना जोली निश्चिंत होती. जोलीच्या चेहर्यावर कुठल्याही प्रकारचा तणाव दिसत नसल्यामुळे डॉक्टरांनाही तिच्याशी संवाद साधायला सोपे जाणार होते.
मिसळपाव