Skip to main content

तिच मन कधी कळेल का

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी मंगळवार, 01/08/2017 07:57 या दिवशी प्रकाशित केले.
सुंदरी काय आहे तुझ्या मनांत? का अशी वागतेस तू कोड्यांत? कधी राग,कधी अनुराग, कधी प्रेम, कधी आग कधी हो, कधी नाही कधी घरी विचारते,कधी माहीत नाही, तू तर रोज सखे भेटतीस, सुंदरी काय आहे तुझ्या मनांत? का अशी वागतेस तू कोड्यांत? * कधी मधाळ हास्य,कधी भृकुटी भंग कधी भांड भांड भांडतेस, तर कधी गळ्यात पडून रडते कधी स्वत:च खर करतेस, तर कधी माझं चुकलं म्हणतेस, सुंदरी काय आहे तुझ्या मनांत? का अशी वागतेस तू कोड्यांत? हे कोड कधी उलगडेल का? तिच मन कधी कळेल का

केप टाउन ते क्रूगर व्हाया गार्डन रूट! ----अंतीम भाग.

लेखक पद्मावति यांनी मंगळवार, 01/08/2017 00:19 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ भाग २ भाग ३ भाग ४ भाग ५ भाग ६ न्यास्नाला स्वत:चे विमानतळ नाही. प्रवासाच्या पुढच्या टप्प्याचे विमान पकडायला आम्ही एका तासावर असलेल्या जॉर्ज विमानतळावर पोहोचलो. रेंटल कार परत केली आणि क्रुगर नॅशनल पार्कला जाणार्‍या विमानात जाऊन बसलो... क्रुगर नॅशनल पार्क.

सह्याद्री आणि गोपाळांची संस्कृती

लेखक हेमंत ववले यांनी सोमवार, 31/07/2017 19:26 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या सह्याद्रीच्या भटकंतीमध्ये अनेकविध अनुभव घेता आले. सह्याद्रीची प्राचीनता आणि जैवविविधता सांप्रत अधिक चर्चिली जाते. सोबतच सह्याद्रीतील शिवाजी राजांचे अभेद्य किल्ले, द-या, डोंगर, विविध प्राचीन आणि आधुनिक घाट सर्वांनाच भुरळ पाडत असतात. सह्याद्रीने चालुक्य, यादव, माऊली, तुकाराम महाराज, शिवाजी महाराज, या सर्वांनाच मोहीत केलेले दिसते. सह्याद्रीचे शौर्य अभेद्य किल्ल्यांच्या रुपात आजही विद्यमान आहे. प्रत्येक किल्ला त्याच्या अवतीभवतीचे गावे, गावागावातील माणसे, लढवय्ये, मावळे, हवालदार, भालदार, धारकरी, हारकरी, किल्यावरच्या बाजारपेठा.

महाराष्ट्रातले मजेशीर राजकारण

लेखक एकुलता एक डॉन यांनी सोमवार, 31/07/2017 17:16 या दिवशी प्रकाशित केले.
४ मुख्य पक्ष भाजप - ज्याला स्पष्ट बहुमत नाही शिवसेना - ज्याने पाठिंबा दिलाय पण विरोध तोच करतोय राष्ट्रवादी - ज्याने सरकार स्थापने वेळी पाठिंबा दिला ,पण जन क्षोभामुळे शिवसेनेचा पाठिंबा घ्यावा लागला काँग्रेस - सध्या राष्ट्रपती निवडणूक व छुपा पाठिंबा देत आहे सरकार पडणे अवघड आहे पण १) शिवसेना पुढे विकास पावेल का ? २) ह्यावेळी काँग्रेस ने पाठिंबा दिला तर लोक एवढे का खवळले नाही ? ३) कोणता पक्ष पुढच्या निवडणुकीत टिकेल?

बलात्काराच्या तक्रारी : खोट्या की खर्‍या

लेखक नर्मदेतला गोटा यांनी सोमवार, 31/07/2017 15:35 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेमसंबंधांमध्ये परस्पर संमतीनं दोघेही शरीरसंबंध ठेवतात. पण प्रेमसंबंध तुटल्यानंतर काही महिला कायद्याचा अस्त्र म्हणून वापर करत बदल्याच्या भावनेतून संबंधित व्यक्तीनं आपल्यावर बलात्कार केल्याचा आरोप करतात, असं स्पष्ट मत दिल्ली उच्च न्यायालयानं नोंदवलं आहे. यावेळी न्यायालयानं बलात्कार प्रकरणातून एका सरकारी अधिकाऱ्याची निर्दोष सुटका करण्याचा कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला आहे. पुढे असंही म्हटलंय एका महिलेनं आपल्या पतीविरोधात घरगुती हिंसाचाराची तक्रार दाखल केली होती. तसंच लग्नाआधी पतीनं आपल्यावर बलात्कार केल्याचा खटलाही दाखल केला होता.