Skip to main content

(महाग्रु)

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी शनिवार, 02/09/2017 11:27 या दिवशी प्रकाशित केले.
(महाग्रु) पेरणा क्र १ आणि पेरणा क्र २ सूर्य मी अन काजवे ते, जाणूनी होतो जरी राहतो धूंदीत माझ्या, पाठ माझी खाजरी आत्ममग्न उष्टपक्षी, म्हणती मला पाठीवरी मीच घडवले, मीच केले, ग्रेट माझी शायरी भेट जर झालीच आपुली, सोडेन ना तूजला घरी माझिया माझेच कौतुक, ऐकूनी तू दमला जरी समूळ पिळून्-बोरकर अज्ञ पामरांच्या माहिती साठी - उष्टपक्षी = शहामृग्

बाप्पाचा नैवेद्यः केळ्याच्या पुर्‍या

लेखक सविता००१ यांनी शनिवार, 02/09/2017 09:18 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः चांगली पिकलेली ३ केळी, अर्धी वाटी साखर (आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता), यात मावेल एवढी कणीक, तळण्यासाठी तेल. कृती: केळी छान कुस्करून घेउन त्यात साखर घालावी. गॅसवर ठेवून सतत हलवत रहावे. २-३ मिनिटांत साखर विरघळली की गॅस बंद करून मिश्रण थंड होउ द्यावे. नंतर या मिश्रणात बसेल एवढीच कणीक घालून (मला दीड वाटी कणीक लागली) घट्ट पीठ भिजवून ठेवावे. साधारण अर्ध्या तासाने कणीक खूपच घट्ट वाटली तर दुधाचा शिपका मारून कणीक सारखी करून नेहमेसारख्या पुर्‍या लाटून तळून घ्याव्यात. या पुर्‍या अजिबात पाणी नसल्याने बर्‍याच टिकतात.

क्षणिक बदलांची गोळाबेरीज व संख्यामालिका : अंदाजातील अचूकतेकडे मारलेली हनुमानउडी (Integration and number series : Quantum leap towards exactness in approximations)

लेखक अनिकेत कवठेकर यांनी शुक्रवार, 01/09/2017 22:16 या दिवशी प्रकाशित केले.
पुन्हा तोच चंद्रविरहित प्रहर, पुन्हा तो रातकिड्यांच्या आवाजाने भरलेला आसमंत, पुन्हा नव्याने ऐकू येणारी शिकार झालेल्या वनचराची वेदनायुक्त विव्हळणी, पुन्हा शिकार केलेल्याने दिलेली उन्मादी डरकाळी, संधीसाधू तरसांनी दरम्यानच्या वेळात केलेली स्वार्थी टेहळणी अशा एक ना अनेक नित्याच्या झालेल्या घटनांची फेरउजळणी ते जंगल राजा विक्रमाला करून देत होते. परंतु प्रजाहितदक्ष राजाला या भयावह घटनाचित्राची दखल घ्यायला सवड होतीच कुठे? त्याचे मन नेहमीप्रमाणेच त्याच्या प्रजेच्या हिताची चिंता करण्यात मग्न झालेलं होतं.

#मिपाफिटनेस - सप्टेंबर २०१७ - ज्युदो

लेखक ज्याक ऑफ ऑल यांनी शुक्रवार, 01/09/2017 17:38 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, दर महिन्याप्रमाणे या महिन्यातही आपल्या समोर एक मिपाकर आपली व्यायामगाथा सांगणार आहेत. ह्या महिन्याचे मानकरी आहेत "जॅक ऑफ ऑल" जॅक ऑफ ऑल उर्फ "जॅक" पूर्वी ज्युदो खेळत होते, त्यामध्ये ब्लॅक बेल्टसारखी मैलाच्या दगडाची कमाईही केली आहे आणि अनेकदा चर्चांमध्ये काँटॅक्ट स्पोर्टमुळे स्वभाव कसा शांत होतो हे हिरीरीने पटवूनही देतात. आपल्याला ज्युदो / कराटे म्हणजे हाणामारीला उत्तेजन देणारे प्रकार वाटले तरी त्याची दुसरी बाजू शोधण्यासाठी या लेखाचा नक्की उपयोग होईल. टीम #मिपाफिटनेस - मोदक, प्रशांत, डॉ श्रीहास. **************************** एकदा सकाळी सकाळी फोन खणाणला .. मोदक कॉलिंग .

मौन धारण करू या!

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी शुक्रवार, 01/09/2017 17:28 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे संत साक्षात परमेश्वर रामरहीम बाबांना साक्षात्काराने आधीच समजून चुकलं होतं की कोर्ट आपल्याला दोषी ठरवणार. आपल्या दैवी लिला कितीही परमार्थिक- अध्यात्मिक असल्या तरी तथाकथित मानवी कायद्यातील तरतुदींनुसार आपल्या लिलांकडे विकृत दृष्टीने पाहिलं जाईल आणि नको ती शिक्षा कोर्टाकडून आपल्याला ठोठावली जाईल, हे बाबा दिव्य दृष्टीने पाहू शकत होते. म्हणूनच अशा पामरांकडून होणारे हे पाप टाळण्यासाठी बाबांनी आधीच खबरदारीचा उपाय म्हणून आपल्या कोट्यावधी शिष्यांपैकी फक्‍त दीड लाख भक्‍तांना सिरसाहून पंचकुलाकडे पदयात्रा करत रवाना केलं.

‘गुलजार’ मनाचा वेध

लेखक पी महेश००७ यांनी शुक्रवार, 01/09/2017 16:55 या दिवशी प्रकाशित केले.
मला गुलजार यांच्या कविता, गझला ऐकल्या नाही तर तो दिवस ‘गुलजार’ वाटतच नाही. उगाचच त्यांच्या गझलेतला अर्थ शोधत असतो. गझलेतला अर्थ शोधू नका, नाही तर अडचण होईल, असं प्रसिद्ध शायर राहत इंदुरी म्हणतात. पण गुलजार यांच्या ‘मैं वहीं हूँ’मध्ये मी काही तरी शोधत होतो. त्यातलाच हा छोटासा प्रयत्न... पी. महेश पहाटेची अंधारलेली वाट. मधूनच कोंबडा आरवतो, तर दूर कुठे तरी गाय हंबरते. कुत्री मोठमोठ्याने भुंकत असतात. गुलाबी थंडीचे ते दिवस. धुके मात्र अजूनही दाटलेले असते. गावातलं हे झुंजुमुंजू वातावरण कधी तरी अनुभवलेलं असतं. हे मी अनुभवलंय अगदी ८०-९० च्या दशकात.

महालक्ष्मी

लेखक मंगेश पंचाक्षरी यांनी शुक्रवार, 01/09/2017 12:31 या दिवशी प्रकाशित केले.
 मंगेश पंचाक्षरी, नासिक. ( गुरुवार, 31 ऑगस्ट 2017 रोजी महाराष्ट्र टाइम्सच्या पान क्र 4 वर प्रसिद्ध झालेला माझा लेख)      एकेवर्षी मी एका महालक्ष्मी आरास स्पर्धेचा परीक्षक होतो. या निमित्ताने मला अनेक ठिकाणी जाण्याचा योग आला. महालक्ष्मी बसवणे हा महाराष्ट्रातील एक लोकप्रिय उत्सव आहे. त्यास जातीपातीचे बंधन नाही. तरीही ब्राह्मणांमध्ये देशस्थ लोक मूर्ती बसवतात तर चित्पावन खड्याच्या गौरी बसवतात. मूर्तींमध्ये उभ्या, बसलेल्या, हाताच्या, बीनहाताच्या, पायाच्या, बीनपायाच्या अशा अनेक मूर्ती असतात.

पावसाळी भटकंती: स्वराज्याची शपथ, रायरेश्वर( Rayreshwar, Raireshwar )

लेखक दुर्गविहारी यांनी शुक्रवार, 01/09/2017 11:21 या दिवशी प्रकाशित केले.
निसर्गाचे सर्वांग सुंदर अविष्कार दाखविणारा श्रावण महिना संपतो आणि गौरी, गणपतीबरोबरच भादव्याची चाहूल लागते. पाउस जवळजवळ सरत आलेला असतो, मात्र निसर्ग नवे रुप लेउन उधाणलेला असतो. हा काळ खास गवतफुले पहाण्याचा. सध्या अचानक प्रकाशझोतात आलेल्या कास पठारावर हि गर्दी असते. मात्र ज्यांना थोडी गैरसोय सहन करून निसर्गाचे मनमोहक रुप पहायचे आहे त्यांनी जरुर रायरेश्वरला भेट द्यावी.