Skip to main content

हाफ चड्डी गँग (पार्ट -१)

लेखक बाजीप्रभू यांनी शुक्रवार, 08/09/2017 19:49 या दिवशी प्रकाशित केले.
पोर्तुगीज भाषेत एक म्हण आहे "ए ओकासीआओ फाज ओ लाडराओ" आपल्या मराठीत त्याचा अर्थ होतो कि, "चोर संधी निर्माण करतो आणि संधी सापडली तर सगळेच चोर होतात" याच भाषेत अजून एक म्हण आहे, ती अशी कि "क्यूएम कॉन्टा उम कॉण्टो, आऊमेन्टा उम पोण्टो" अर्थात, गोष्ट सांगणारा आपली भर घालतोच, आपल्या पदरचं, आपल्या बाजूनेच सांगतो.

पाटलाची मुलगी.. – भाग १

लेखक दिपक लोखंडे यांनी शुक्रवार, 08/09/2017 17:01 या दिवशी प्रकाशित केले.
संकेत : मयुरी... या राघवचं तोंड झाक जरा.. मयुरी : ए तु गप्प बस ना रे राघव... राघव : मी कशाला गप्प बसू?.. या थेरड्याला सांग ना त्याच तोंड झाकायला... संकेत : ए थेरडा कोणाला म्हणतोे रे.. राघव : तुला म्हणतोय तुला.. मयुरी : अरे तुम्ही दोघंही शांत होता का जरा.. संकेत.. सांग.. काय प्रॉब्लेम आहे तुझा.. राघव : हं.. आता याचा पण प्रॉब्लेम ऐकावा लागेल.. परमेश्वरा... मयुरी : राघव चुप्प.. तु बोल संकेत.. संकेत : मी काय म्हणतो राघव : काय म्हणतोस तु?? संकेत : हेच्या आयलां... मयुरी : संक्या शांत हो..

मोडीची_गोडी

लेखक vcdatrange यांनी शुक्रवार, 08/09/2017 16:54 या दिवशी प्रकाशित केले.
फारा वर्षाच्या अंतराने पुन्हा विद्यार्थी दशेत गेलो, ते ब्राह्मि अन् मोडी लिपी प्रशिक्षण वर्गाच्या निमित्ताने.

भेट पावसाची..

लेखक दिपक लोखंडे यांनी शुक्रवार, 08/09/2017 16:54 या दिवशी प्रकाशित केले.
भेट तुझी माझी पावसाची आठवण आहे बावऱ्या मनाची.. तु सजली आहेस लावून गजरा सह मोहक सुगंध देई मोगरा भुलून गेलो आहे सजनी प्रीत रंग पसरला गगणी ऐकुनी हे बोल तुझे वाटे मज वाजे बासुरी.. बघुनिया रूप तुझे घाव झाला हृदयावरी चंद्र ही निरखून पाही भेट तुझी माझी पावसाची.. – दिपक.
काव्यरस

मिळून मिसळून!

लेखक उपयोजक यांनी शुक्रवार, 08/09/2017 13:12 या दिवशी प्रकाशित केले.
अनेक मिपाकरांनी विचारणा केल्यामुळे या धाग्यावर माहिती देत आहे. मिळून मिसळून हा फक्त मिपाकरांचा WhatsApp समुह बनवला आहे.(आधी हा समुह टेलिग्रामवर होता.पण सर्वांच्या सोयीसाठी टेलिग्रामवरुन बंद करुन तो WhatsApp वर सुरु केला आहे. समुहाचे उद्देश: १] सर्व नव्या-जुन्या मिपाकरांना एकत्र येता यावं,चांगल्या चर्चा व्हाव्यात,विषय मिपावर चर्चा करण्यायोग्य असेल तर धागा काढला जावा,धाग्याच्या लेखनासंबंधी मार्गदर्शन मिळून तो वाचनीय व्हावा.नवीन लेखकांना लेखनासाठी मार्गदर्शन मिळावं हा समुहाचा उद्देश आहे. २] राजकारण हा विषय वगळता अन्य विषयांवर चर्चा होणे,माहिती मिळणे ह

फकीर

लेखक जयंत कुलकर्णी यांनी शुक्रवार, 08/09/2017 12:24 या दिवशी प्रकाशित केले.
Simple, Free Image and File Hosting at MediaFire फकीर जॅक्सन म्हणजे एक वाट चुकलेला फकीर होता. वाहवत जाणे हा त्याचा स्थायीभाव होता असं म्हटलं तरी चालेल. एकदा का एखाद्या गोष्टीच्या मागे लागला की परत मागे फिरणे त्याच्या स्वभावातच नव्हते. ‘‘जॅक्सन’’ याच नावाने त्याला सर्व ओळखत. आगा ना पिछा. बाजारात सुद्धा ‘जॅक्सन’ याच नावाने ओळखला जाई.

अनवट किल्ले १८: संभाजीराजांच्या जीवनपटाचा साक्षीदार, प्रचितगड( Prachitgad )

लेखक दुर्गविहारी यांनी शुक्रवार, 08/09/2017 11:25 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्रातील गड कोट म्हणले कि आपल्याला शिवराय आठवितात. एका किल्ल्यावर जन्मलेला, किल्ल्यांच्या आधाराने आयुष्यभर राजकारण केलेला आणि एका किल्ल्यावर चिरविश्रांती घेणार्‍या या योध्द्याची प्रत्येक मराठी व्यक्तिला कोणत्याही गड कोटावर आठवण यावी हे स्वाभाविकच आहे. पण एका किल्ल्याने संभाजी राजांचा आयुष्यातले आनंदाचे आणि दुखाचे असे दोन्ही क्षण अनुभवले आहेत. हा बुलंद किल्ला आहे, श्रुंगारपुरचा पहारेकरी "प्रचितगड". प्रचितगड, उचितगड, राग्वा अशी काही नावे याला आहेत. भौगोलिक्दृष्टया सांगली जिल्ह्यात हा किल्ला येत असला तरी रत्नागिरी जिल्ह्यातुन जाणे सोयीचे आहे.