Skip to main content

कर्करोगाचा विळखा

लेखक हेमंतकुमार यांनी गुरुवार, 21/09/2017 13:15 या दिवशी प्रकाशित केले.
कर्करोगाचे प्रमाण जगभर झपाट्याने वाढत आहे. यासंबंधी ‘यु.के.’ मधील एक मजेदार अहवाल वाचनात आला. २०१५ मध्ये त्या देशात ७०,०००हून अधिक नवीन निदान झालेले कर्करोगी आढळले होते. हा आकडा नक्कीच धक्कादायक आहे.

खिडकी

लेखक जागु यांनी गुरुवार, 21/09/2017 10:37 या दिवशी प्रकाशित केले.
चार कोनांची, सुरक्षेसाठी बाहेरून लोखंडी ग्रिल लावलेली आणि पारदर्शकतेसाठी काचेची स्लायडींग असलेली, हवा आत बाहेर खेळवणारी अशी खिडकी आपल्या घराचा एका अर्थाने श्वासच असतो. अर्थात प्रत्येक घराच्या खिडक्या वेगवेगळ्या आकाराच्या, काचेच्या, लाकडाच्या, ग्रिलच्या असतात. हॉल बेडरूम च्या खिडक्यांवर आकर्षक पडद्यांची सजावट करून खिडकीला आकर्षक पोषाख दिला जातो त्याने खिडकीच्या सौंदर्य अधिक खुलून दिसते. हल्ली ग्रिलमध्ये झाडे लावूनही खिडकीला बगिच्याच रूप दिल जात. मग हळू हळू ही खिडकी बाहेरील निसर्गातील जीवांनाही आपल्या कवेत घेऊन त्यांना आसरा देते.

राजांचे मावळे - १

लेखक लाल गेंडा यांनी गुरुवार, 21/09/2017 09:31 या दिवशी प्रकाशित केले.
घोडखिंड : खाशाबा खाशाबाला वाटायला लागलं की छातीचा भाता आता फुटतो की काय, त्याला आठवतच नव्हतं की पळायला सुरुवात करून किती तास झाले होते ते. चन्द्र काही कामाचा नव्हता कारण पावसाने धिंगाणा चालवला होता. हातातले पलिते विझत होते ते परत पेटवायला लागत होते. भाला पकडून पकडून हाताची बोट सरळ व्हायची विसरली होती, ढालेने पाठ धरली होती नि तलवार कमरेला खुपत होती. हा सगळा विचार मनात चालू असतानाच बाजींनी थांबण्याचा संकेत दिला. राजांच्या पालखीचे भोई दमले होते.

माझी पहिली अहीराणी कविता

लेखक RDK यांनी गुरुवार, 21/09/2017 00:50 या दिवशी प्रकाशित केले.
बठा चालना गयात ज्या वट्टावर बठी बठी आमि भयाण गप्पा मारुतं ज्या लाइंग न खांब खाले एक दुसरांनी टेस्ट लेउत जो वट्टा झिजाई मन्या साऱ्या सुट्या खपी जाऐल शेतं पण तो वट्टा खाली दिखस आते कारण बठा चालना जाऐल शेतं फोनवर कितलक बोलुत आमि ?, बीजी राहतस आणी बिलं बी येस फेसबुक वर बी कितलक chat करुत , बोलणं कयस पण चेहरा याद येस ऑनलाईन राहतस चोवीस तास, पण गावमा ऑफलाईन दीखेल शेत पण तो वट्टा खाली दिखस आते कारण बठा चालना जाऐल शेतं सावन जाई बठेल शे दुसरा गावमा, तर मह्याना अभ्यास चालू शे ननूनी MPSC नि तयारी , ते कुलदीपले चांगला जॉब शे मी बी शे आपला काममा , पण डोया गाववर लागेल शेत पण तो वट्टा
काव्यरस

'किनारा'यण!

लेखक दिनेश५७ यांनी बुधवार, 20/09/2017 22:37 या दिवशी प्रकाशित केले.
एकदा एक बिनशिडाचं तारू भक्कम जहाजाचा आधार सोडून समुद्रात भरकटलं. मग तगण्याचा एकाकी प्रयत्न करू लागलं. त्यावर फक्त तिघे प्रवासी होते. प्रत्येकजण प्रचंड आशावादी, स्वाभिमानी! होडीचं वल्हं आपल्याच हाती आहे अशा समजुतीत वावरणारा! होडी भरकटत चालली तरी, हाच आपला मार्ग आहे आणि याच मार्गाने आपण कि'नारा' गाठणार यावर मात्र तिघांचही एकमत होतं. अशातच समुद्र खवळला. वादळ उठलं. होडी हेलकावे खाऊ लागली. आता आपण काही तरत नाही, या भयानं तिघंही हादरले. लांबवर एक भव्य जहाज खवळलेल्या समुद्रातही संथपणे पुढे सरकत होते. तिघांनी त्याकडे पाहून हातवारे सुरू केले. शिट्ट्या वाजवल्या. 'आम्हाला वाचवा' असा आक्रोशही सुरू केला.

उरले जगणे, मरणासाठी !

लेखक दिनेश५७ यांनी बुधवार, 20/09/2017 19:06 या दिवशी प्रकाशित केले.
परवा एसटीच्या मुंबई सेंट्रल ऑफिसात एका मित्राला भेटायला गेलो होतो. खूप गप्पा मारल्या, आणि निघालो. बाहेर पॅसेजमध्ये लवाटे भेटले. तोच उत्साह, तीच घाई, तोच, काहीतरी शोधणारा चेहरा आणि तीच भिरभिरती नजर... मला समोर पाहून दिलखुलास हसले. आणि पिशवीत हात घातला. एक कागदाचं भेंडोळं समोर धरलं. हा नवा पत्रव्यवहार... ते उत्साहानं म्हणाले, आणि मला, दोन वर्षांपूर्वी भेटलेले लवाटे आठवले. तेव्हा माझ्या ऑफिसात त्यांच्याशी गप्पा मारल्यानंतर खूप अस्वस्थता आली होती. मग एक लेखच तयार झाला, आणि त्यावर अक्षरशः प्रतिक्रियांचा पाऊस पडला. परवाच्या भेटीमुळे तो लेख पुन्हा आठवला उरले जगणे, मरणासाठी... ‘‘नमस्कार. मी लवाटे.

सँडविच!...

लेखक दिनेश५७ यांनी बुधवार, 20/09/2017 17:48 या दिवशी प्रकाशित केले.
सॅंडविचमधल्या टोमॅटोला काय वाटत असेल? कांदा बीट भेटले म्हणून स्वत:शीच हसेल की ब्रेडमधे दबलो म्हणून रडत कुढत बसेल? काकडीच्या कोंडाळ्यात लपून बसेल, की हिरव्यागार ढब्बूच्या मोहात फसेल? चिकटलेले बटर गुपचुप पुसेल, की चटणी झोंबली म्हणून एकटाच रुसेल? ... पण आपण कसं ओळखायचं? सॅंडविचमधला टोमॅटो आपल्याला कसा दिसेल??

माझे जिम चे प्रयोग ... जिम मधली गाणी

लेखक अमर विश्वास यांनी बुधवार, 20/09/2017 15:28 या दिवशी प्रकाशित केले.
आज सकाळी जिम मध्ये एक जबरदस्त गाणे ऐकले ... अर्थात जिम मध्ये कुठली गाणी व का लावतात हा एक वेगळा संशोधनाचा मुद्दा आहे ... बहुदा सकाळी लवकर अर्धवट झोपेत व्यायामासाठी येणाऱ्यांना जागे ठेवणे या एकाच शुद्ध हेतूने हा गाण्यांचा उपक्रम चालत असावा ... तर आज कुल डाऊन करत असताना ते मंजुळ सूर कानावर पडले (आदळले??? )... काय अर्थपूर्ण शब्द होते .. He is most wanted मुंडा ... आधी तर मला मुंडा च्या ऐवजी गुंडा असेच ऐकू आले ... अर्थात त्याने फारसा फरक पडला नसता .. तर हे असे अर्थपूर्ण शब्द त्यालाच साजेशी चाल .. आणि मागे वाजणारा (गडगडणारा?) वाद्यवृंद ... इतका चपखल कि शब्द पण नीट ऐकू येऊ नयेत ... (तसही मुंडा ..