कायदेशीर सल्ला/मदत मिळेल का?
गाभा:
माझ्या मावसभावाच्या बाबतीत खालील घटना घडल्या आहेत , कृपया जाणकार लोकांनी योग्य तो सल्ला द्यावा !
१) याने एका सेबी नोंदणीकृत कंपनीत DMAT अकाउंट उघडला होता.त्या कम्पनीने मोठ्या मोठया गोष्टी सांगून त्याला कमोडिटी ट्रेडिंग करण्यास सांगितले.काही काळानंतर त्याच्याकडून ५० हजार रुपये ऍडव्हान्स ब्रोकरेज म्हणून घेतले.आता त्याला अकाउंट बंद करायचा आहे कारण त्याचे बरेच पैसे त्यांच्या टिप्स
मुळे बुडले आहेत.पण आता ती कंपनी पैसे परत देण्यास नकार देत आहे कारण आमच्याकडे अशी काही पद्ध्धत नाही म्हणत आहे.तुम्ही जो प्लॅन घेतला होता तो नॉन रिफंडबल होता असे त्यांचे म्हणणे आहे पण आधी असे काहीच आणि कुठेच सां
काहीतरी नक्कीच आहे....२
या विषयावरील आधीच्या लेखाची लिंक खाली
काहीतरी नक्कीच आहे...
प्रसंग ५-
भावाचे लग्न झाले होते म्हणून मी अणि बायको, जवळच असलेल्या आमच्या दुसरया घरी रहायला गेलो होतो. ते घर दुमजली होते. वरच्या अणि खालच्या मजल्यावर भाडेकरू ब्याचलर मुले बरयाच वर्षांपासून राहत होती. आम्ही रहायला आल्यावर खालची मुले दुसरीकडे रहायला गेली. त्यांचा आजुबाजुच्या लोकांना कधीच त्रास न्हवता अणि त्या मुलांना देखिल कुणाचा त्रास कधी न्हवता. तिथे जवळच माझा शाळकरी मित्र मंग्या राहत होता. त्यामुळ त्याला सारा परिसर चांगलाच महित होता.
डंकर्क.... भाग ३
पण त्या क्षणी तरी विजयमाला हिटलरच्या आर्देन्सच्या जंगलातून परजत येत असलेल्या चिलखती दलाच्या गळ्यात पडली होती....
पुढे चालू...
अर्देन्सच्या जंगलात फ्रान्सच्या ९व्या आर्मीमागे या सेना स्वैर संचार करून त्यांना हैराण करत होत्या. फ्रान्सच्या सैन्यात गोंधळाचे व भीतीचे वातावरण पसरले होते. पराभूत मनोवृत्तीने जोर धरला होता.
अर्देन्सच्या जंगलात फ्रान्सच्या ९व्या आर्मीमागे या सेना स्वैर संचार करून त्यांना हैराण करत होत्या. फ्रान्सच्या सैन्यात गोंधळाचे व भीतीचे वातावरण पसरले होते. पराभूत मनोवृत्तीने जोर धरला होता.अनवट किल्ले २०: बहिर्जी नाईकांची स्मॄती जपणारा, भुपालगड, बाणुरगड(Bhupalgad, Banurgad )
शाहिस्तेखानाने चाकणच्या भुईकोटाचा ताबा पंचावन्न दिवसांच्या तिखट प्रतिकारानंतर मिळवला (१४ ऑगस्ट १६६०) आणि या कोटाचे हवालदार काहीसे हताश होउन राजगडाच्या पायर्या चढत होता, आता राजे काय शिक्षा सुनावताहेत या चिंतेने ग्रासलेला हा किल्लेदार राजांसमोर उभा राहिला आणि राजांनी त्यांना शिक्षा सुनावली, आदिलशाही सरहद्दीवरच्या भुपालगडाची किल्लेदारी. हे किल्लेदार होते फिरंगोजी नरसाळा.
महाकवी कालिदास
महाकवी कालिदास कुणाला माहिती नाही? फक्त भारतीयच नव्हे तर सगळ्या जगाला ललाम भूत झालेला हा थोर कवी, नाटककार. पण त्याच्याबद्दल, म्हणजे त्याच्या वैयक्तिक, खाजगी आयुष्याबद्दल फारसे काही कळत नाही. एवढेच काय, त्याचा नक्की कालखंड कुठला हे देखील खात्रीलायकपणे सांगता येणे मुश्कील आहे. एक तर विनयामुळे असेल किंवा अन्य काही कारणे असतील; पण त्याने स्वत:बद्दल फारसे काही लिहून ठेवले नाही किंवा लिहिले असेल तरी ते अजून कुठे सापडले नाही.
प्रा. वि. वा. मिराशी , रावबहादूर चिंतामणराव वैद्य, प्रा. र. ना. आपटे इ. पंडितांच्या मते तो शकांचा पराभव करणारा सम्राट विक्रमादित्य ह्याच्या पदरी होता.
सोनदऱ्यातली दिवाळी
दिवाळीचं वातावरण सुरु झालं कि आजही आठवते ती आम्ही साजरी केलेली एक आगळी वेगळी दिवाळी. ही बऱ्याच वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. माझे आजोबा (आईचे वडील) शिक्षण उपसंचालक म्हणून रिटायर झाल्यानंतर एका आश्रमशाळेत जाऊन राहत होते. रिटायरमेंटनंतरच आयुष्य सामाजिक कामात वाहून द्यायचं त्यांनी ठरवलं होतं. डोमरी,कोठिंबा आणि यमगरवाडी या तीन गावातल्या आश्रमशाळांशी ते जोडले गेले. त्यांच्या कामात होईल तो वाटा ते उचलत होते. त्यांच्याकडून आम्ही नेहमी तिथले खूप किस्से ऐकायचो. ते आम्हाला म्हणायचे अरे ते आयुष्य येऊन बघा एकदा तरी.पोस्टरबाजी - ऐक दिखाऊपणाची गरज
तुम्ही शहराबाहेर, गावाबाहेर बाईकने, कारने, अथवा अन्य वाहनाने जात असतांना ,बाहेर रस्त्याच्या कडेला हास्यमुद्रेत असलेले ४,५ किंवा जास्त जणांचे टोळकं दिसतच. अर्थात हे टोळकं असत पोस्टरवर..कोणाचा वाढदिवस, किंवा कोणाची कुठेतरी लागलेली वर्णी ह्या साठी हे सर्वजण पोस्टरवर, शुभेच्छा देण्यासाठी किंवा अभिनंदन करण्यासाठी , विराजमान झालेले असतात. हे तुम्हांला तुमच्या शहरात, गावात पण मोक्याच्या ठिकाणी पण हास्यवदन करीत असतात.
बर ,नाही बघायचे ठरवले तरी ते अशाप्रकारे लावलेले असतात की त्यांचे मुखदर्शन ओझरते का होईना होतेच.
(कद्रूंना झोडा)
पेरणा
कद्रू एके तुझा बाप कद्रू दुणे बहिणी दोन
कद्रू त्रिक भाउ तुझा , हरामखोर चिंधी चोर
कद्रू चोक वेणीत सुतळी, कद्रू पाचा अनवाणी चाल,
कद्रू सक साडीवर ठिगळ, साता कद्रू हसू ओशाळ
मंडई मधे फेकलेली भाजी कद्रू आठा पिशवित टाकू
वडापावचा कागद सुध्दा नव्वे कद्रू रद्दीत विकू
जटाळलेले केस आणि कळकटलेले कृष्णवदन
अधन मधन दातांनाही कद्रू दाहे कर मंजन
सर्वाना होळीच्या अगाउ शुभेच्छा!
पालथागडू
काव्यरस
चंद्राचा पाढा
चंद्र एके तुझा चेहरा चंद्र दुणे अन डोळे दोन
चंद्र त्रिक डोळ्यांतिल काजळ, भिवयांची वर चंद्रकोर
चंद्र चोक वेणीत केवडा, चंद्र पाचा चपलाहार,
चंद्र सक ओठावरचा तिळ, साता चंद्र हसू मधाळ
निरीनिरीतुन लगबगणारी चंद्र आठा बोटे आठ
खांद्यावरती पदर विसावे नव्वे चंद्र चोळीगाठ
भांगेतिल कुंकू लावण्याने मुसमुसलेला चंद्रोदय
गालावरच्या खळीत लाली चंद्र दाहे ज्योतिर्मय
सर्वाना कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
मिसळपाव