✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

काही नोंदी अशातशाच... ५

श
श्रावण मोडक यांनी
Mon, 10/05/2009 - 13:31  ·  लेख
लेख

Book traversal links for काही नोंदी अशातशाच... ५

  • ‹ काही नोंदी अशातशाच... ४
  • Up
  • काही नोंदी अशातशाच... ६ ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
8133 वाचन

💬 प्रतिसाद (21)

प्रतिक्रिया

सुरेख वर्णन

सहज
Mon, 10/05/2009 - 13:51 नवीन
निवडणूक मॅनेजमेंटवर एक छान लेख. महाराष्ट्रात निवडून येणारे जवळजवळ सर्व उमेदवार, अतिशय सफल उद्योजक (शिक्षण संस्था, साखर कारखाने, शेती सर्व फायद्यात) आहेत का हो?
  • Log in or register to post comments

मस्त

गणपा
Mon, 10/05/2009 - 14:05 नवीन
मोडकशेठ एकदम समयोचीत लेख. ( स्वगत : लोकांना कस जमत बुवा इतक छान छान लिहायला. तु आपल्या ४ ओळींच्या रेशीप्याच टाक. :? )
  • Log in or register to post comments

संस्थांचे जाळे

सुनील
Mon, 10/05/2009 - 14:10 नवीन
हातातील संस्थेचा उपयोग केवळ पैशाच्या पुरवठ्यासाठीच होतो असे नाही. संस्थेमुळे रोजगार निर्मिती होते, रिकाम्या हातांना काम मिळते, माणसे-कुटुंबे जोडली जातात. पश्चिम महाराष्ट्रात आज काँग्रेस्-राकाँ घट्ट पाय रोवून उभी आहे ते त्यांनी विणलेल्या संस्थांच्या जाळ्यामुळेच. जनसुराज्यचे शेट्टी हातकणंगल्यातून उभे होते तेव्हा विरोधकांच्या प्रचाराचा रोखच यावर होता की, यांचे साखर कारखाने नाहीत, दूध सोसायट्या नाहीत, शिक्षण संस्था नाहीत, मग याला का निवडून देता? शेट्टी निवडून आले. पण तो एक अपवाद, नियम सिद्ध करण्यापुरता! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments

जनसुराज्य

सुहास
Tue, 10/06/2009 - 00:36 नवीन
जनसुराज्यचे शेट्टी हातकणंगल्यातून उभे होते तेव्हा शेट्टी जनसुराज्यचे नाहीत.. त्यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना आहे.. :) --सुहास एकच वादा, बंडखोर दादा..!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील

क्लास

नंदन
Mon, 10/05/2009 - 14:19 नवीन
तटस्थ तरीही या 'सिस्टीम'चं आतून घडवलेलं दर्शन!

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments

टिपिकल

निखिल देशपांडे
Mon, 10/05/2009 - 14:42 नवीन
टिपिकल मोडक स्टाईल लेख... वर नंदन म्हणतो तसे तटस्त तरीही सिस्टीमचे आतुन घडवलेले दर्शन... कसे काय ह्यांना परिघाहुन काम करायला कमते??? निखिल ================================ रात्री अडीच वाजता जाग आल्यावरसुद्धा तुम्ही खरडवही चेक करूनच झोपता?? तर तुम्हाला नक्कीच मिपाज्वर झाला आहे!!!!!
  • Log in or register to post comments

+१

३_१४ विक्षिप्त अदिती
Mon, 10/05/2009 - 16:54 नवीन
पुन्हा एकदा हलवून टाकणारा लेख ... आमची लोकशाही का भोगशाही? अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निखिल देशपांडे

+१

संदीप चित्रे
Tue, 10/06/2009 - 01:44 नवीन
आमची लोकशाही की भोगशाही? !! २० वर्षं मैत्री जमते... त्या आशयाचं वाक्य आवडलं आणि पटलंही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

हा दौरा होता तर..

प्रभो
Mon, 10/05/2009 - 16:13 नवीन
श्रावणसर, हा दौरा होता तर तुमचा.. लेख मस्तच हो....... :) असंच चालू द्या !!!! --प्रभो ---------------------------------------------------------------------------------- काय संगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
  • Log in or register to post comments

मस्त

विनायक प्रभू
Mon, 10/05/2009 - 16:18 नवीन
लेख
  • Log in or register to post comments

छान लेख.

स्वाती२
Mon, 10/05/2009 - 16:42 नवीन
छान लेख.
  • Log in or register to post comments

राजकीय नेतृत्वगुण...

प्रसन्न केसकर
Mon, 10/05/2009 - 17:21 नवीन
म्हणजे काय असते रे भाऊ? भारतात निवडणुका हा कायम फार्सच असतो ना? तसेही ते सर्वमान्य तर आहेच. लोकांना त्यातल्या त्यात धक्कादायक वाटु शकेल ते पेड न्युज प्रकरण. पण आता तर ते पण जुने झालंय भाऊ. आता मीडीया पॅकेजचा जमाना आलाय रे. बर्‍याच पेपरातली इंच न इंच जागा विकलेलीच असते. थोडक्यात वाचक पैसे मोजुन जाहिराती विकत घेतो. म्हणुन तर सगळ्यांचे सगळे अंदाज चुकतात रे. पण एक मात्र खरं आहे या सगळ्यामुळं तळमळीच्या कार्यकर्त्यांवर अन्याय होतो. पण तसेही खरे तळमळीचे कार्यकर्ते कुठं आहेत राजकारणात. आहेत ते सगळे मळमळीचेच. मन विषण्ण करणारं वास्तव लिहिलंस भाऊ! हे पण बाहेर यायलाच हवं! --- Grant me the serenity to accept the things I cannot change, the courage to change the things I can, and the wisdom to know the difference. --Reinhold Niebuhr
  • Log in or register to post comments

+१

धमाल मुलगा
Mon, 10/05/2009 - 17:40 नवीन
काय बोलावं अन कसं बोलावं ह्याच विचारात होतो.. पुनेरींनी अगदी मोजक्या आणि योग्य त्या शब्दात मत मांडलं आणि "च्यायला! अगदी हेच तर म्हणायचं होतं मला" असं झालं! असो, निवडणुकांनंतर आमदार्/खासदार आपल्याकडं ओढण्याची जी लगीनगघाई चालु असते त्याला बरीचशी वृत्तपत्र घोडेबाजार असं नाव देतात ते किती सार्थ आहे नाही? तळमळीनं कामं करणारा मळ'मळी'च्या रेट्यापुढं शून्य होऊन जातो हेच खरं!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसन्न केसकर

+२

बिपिन कार्यकर्ते
Mon, 10/05/2009 - 17:47 नवीन
एका अनुभवी पत्रकाराने इतकं जळजळीत वास्तव समोर ठेवावं आणि दुसर्‍या अनुभवी पत्रकाराने ते तसेच आहे, किंबहुना त्याहूनही अधिक वाईट आहे हे लिहावं... विषण्ण विषण्ण विषण्ण!!! बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

+३

दशानन
Mon, 10/05/2009 - 17:49 नवीन
१००% सहमत. आहे. *** "हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले, बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । " राज दरबार.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

मीठ

प्रकाश घाटपांडे
Mon, 10/05/2009 - 20:33 नवीन
एक गांधीबाबा मतदानाच्या दिवशी मतदाराला मिळतो हातात फक्त अगोदर मीठाला हात लावायचा आन मंग गांधीबाबा घ्यायचा. आता रेट वाढला आसनं ५० टक्के लोक मतदान करत नाहीत हे लोक जर मतदान करायला लागले तर समीकरण बदलतील. काही उद्दाम उमेदवार हे बहुसंख्य सुजाण मतदार मतदान करीत नाही व ते संघटीत नाहीत एवढ्या भांडवलावर निवडुन येतात. उघड उघड पणे अस समीकरण मांडतात. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments

पुन्हा एकदा जखम उघडी केलीत!

चतुरंग
Mon, 10/05/2009 - 20:50 नवीन
बहुसंख्येने लोक स्वार्थी झालेत! फक्त पायापुरतेच बघतात, जराही आजूबाजूला नाही. सगळे नियम सतत झुगारुन देणे, तोडणे ह्याकडेच कल दिसतो. कोणत्याही व्यवस्थेपेक्षा, नियमांपेक्षा आपण कसे मोठे हे ठसवण्याकडे कल असतो. ह्यावेळच्या भारतभेटीतले उदाहरण - अहमदनगरला घरी गेलो असताना. घराखाली एक माणूस कायनेटिक होंडा पार्क करत होता. त्यादिवशी त्याबाजूला नो पार्किंगचा बोर्ड होता. मी म्हटले इकडे पार्क करु नका उचलून नेतील. त्याचे उद्दाम बोलणे "उचलून नेतील? अहो साहेब आजपर्यंत अख्ख्या नगरमधे कुठेही गाडीला हात नाय लावला आपल्या! रस्त्याच्या मधे जरी लावलीना नुसता नंबर बघितला की साहेब लोकं पण बघत नाहीत गाडीकडं!" त्याची मग्रुरी शिसारी देऊन गेली खरी पण डोळेही उघडून गेली. तपशील वेगळे असतील, जागा वेगळ्या असतील, पण असाच अनुभव पदोपदी येतो. राजकारण्यांना नावं ठेवण्याचे दिवस कधीच गेले. अशा समाजासाठी लोकहिताची कामं करायला ते कोणी संतमहात्मे नाहीत. लोक येताजाता आपल्या पोळीवर तूप ओढून घेतात आणि वर सरकारच्या नावाने शंख करतात तर दिवसाचे अठरा-अठरा तास डोक्याचं भुस्कट पाडून, आपल्या घरापासून लांब राहून, जिवाच्या भीतीसकट सर्व प्रकारच्या दबावांना तोंड देणार्‍या राजकारण्यांनी काय म्हणून लोकांची कामं करावीत? ते स्वार्थ बघणारच! घराणेशाही करणारच. इथून पुढच्या निवडणुका ह्या बिझनेस आहेत. व्यवस्थित आखणी केलेला, तंत्रज्ञानाची जोड असलेला बिझनेस. त्यात यशस्वी व्हायचं असेल तर फक्त तत्व, मूल्यं उपयोगी नाहीत, पैसा हवाच. ज्याच्याकडे पैसा, त्याची तत्व! (पटायला अवघड आहे पण सत्य आहे!) चतुरंग
  • Log in or register to post comments

उद्दामपणा

प्रकाश घाटपांडे
Mon, 10/05/2009 - 21:02 नवीन
अहो साहेब आजपर्यंत अख्ख्या नगरमधे कुठेही गाडीला हात नाय लावला आपल्या! रस्त्याच्या मधे जरी लावलीना नुसता नंबर बघितला की साहेब लोकं पण बघत नाहीत गाडीकडं!" त्याची मग्रुरी शिसारी देऊन गेली खरी पण डोळेही उघडून गेली. तपशील वेगळे असतील, जागा वेगळ्या असतील, पण असाच अनुभव पदोपदी येतो.
यावरुन स्वाभिमानी पार्किंग या मुक्तपीठातील लेखाची आठवण झाली. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

भयाण वास्तव!

क्रान्ति
Mon, 10/05/2009 - 21:20 नवीन
वर्षानुवर्षं हेच चालत आलंय! अस्वस्थ करणारा लेख! क्रान्ति दिव्यत्वाची जेथ प्रचीती | तेथे कर माझे जुळती अग्निसखा रूह की शायरी
  • Log in or register to post comments

सुरेख

अवलिया
Mon, 10/05/2009 - 22:49 नवीन
सुरेख लेखन. --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
  • Log in or register to post comments

डोक्याला त्रास देणारा

भोचक
गुरुवार, 10/08/2009 - 15:39 नवीन
परिस्थिती खूपच कठीण आहे. हे घडतंच. खरं तर संस्थात्मक निवडणूका जिंकण्यावर इतका पैसा खर्च का होतो याचे गमक पुढच्या क्रमाक्रमाने उंचावत जाणार्‍या निवडणुकांच्या स्तरात दडले आहे. नाशिक जिल्ह्यातील एका समजाच्या नावे असणार्‍या 'मजबूत' शिक्षण संस्थेची निवडणूक बड्या निवडणुकीला लाजवणारी असते. पण एकदा ही निवडणूक जिंकली की पुढच्या फारच सोप्या होत जातात हा त्यामागचा 'अर्थ'. म्हणूनच कॉंग्रेसवाले संस्थात्मक ताकद उभी करण्याकडे जास्त भर देतात. शिवसेना-भाजपच्या बाबतीत हेच म्हटलं जातं की १९९४ मध्ये त्यांच्याकडे सत्ता आली ती खरोखरीच कॉंग्रेसला लोक कंटाळले म्हणून. पण त्यानंतर त्यांनी महाराष्ट्रातली सहकार चळवळच खोदायला घेतली. त्यांच्या काळात बर्‍याच सहकारी संस्था बंद पडल्या, पाडल्या गेल्या. शिवाय युतीच्या नेत्यांनी स्वतःही सहकारी संस्था उभारल्या नाहीत, वाढवल्याही नाहीत. त्यामुळे सलग दोन निवडणुका त्यांना माती खायला लागली. लोकांनाही काम करणारा माणूस हवा असतो. पतसंस्था, सहकारी संस्थांच्या माध्यमातून 'ओळखीचा', मदतीला धावून येणारच उमेदवार अशा मोठ्या निवडणुकांनाही उभा असल्यास त्यांच्या दृष्टीने तो एक्सेसेबल असतो. कॉंग्रेसची मंडळी आजही सहकारावर इतका भर देतात यामागची कारणे हीच असावीत. बाकी लेख काय? उत्तमच. थोडक्यात 'डोक्याला त्रास देणारा.' (भोचक) तुम्ही पत्रकार आहात? कोणत्या पक्षाचे? हा आहे आमचा स्वभाव
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा