Miller of The Dee या सुप्रसिद्ध इंग्लिश कवितेचे मी केलेले मराठी स्वैर रुपांतर.
कुण्या नदीच्या तीरावरती एक पिठाची गिरणी वसे
मालक त्या हो पिठगिरणीचा स्वछंदी आनंदी असे
जात्याच्या तो सुरात मिसळी स्वानंदाचे गीत कसे
ना हेवा मी करी कुणाचा, कुणी न माझा करीतसे
कुशल प्रजेचे बघण्या राजा येई एकदा नदीतीरी
श्रमपरिहारक सुरावटी त्या राजहृदयी मात्सर्य भरी
"चुकसी मित्रा" राजा वदला "हेवा वाटे तव मजला,
वैभव सारे भोगत असुनी कष्टी कसा मी? सांग मला"
चकित होउनी गिरणीवाला टोपी काढत घाम पुसे
"खाई भाकरी मम कष्टांची" वदूनी असे मिष्किल हसे
"कधी न मजला कर्ज कुणाचे, साथ नदीची या जन्मी,
ओघावर त्या गिरणी चाले ऐसे असता काय कमी"
उत्तर त्याचे ऐकुन राजा निजांतरी तो सुखावला
सद्गगद हृदये पुन: पुन: हे स्वत:शीच तो पुटपुटला
"ऐशा तुजसम प्रजाननांचे कौतुक वाटे मज मोठे,
पीठमंडित तव टोपी पुढती रत्नजडित मम मुकुट कुठे"
नीज सदनी मग येई राजा, मनात त्याच्या हेच असे
"ना हेवा तो करी कुणाचा कुणी न त्याचा करीतसे"
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
3004
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
प्रतिक्रिया
सुंदर
वाह!
हम्म!
In reply to वाह! by सहज
मूळ
सुंदर
चांगला
मस्त मस्त!
+१
चांगला
+१
In reply to चांगला by प्राजु
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
+२
In reply to +१ by नंदन
+१
In reply to +२ by सुबक ठेंगणी
उत्तम स्वैर अनुवाद
छान