ध्येय!

राघव's picture
राघव in जे न देखे रवी...
1 Aug 2009 - 12:10 pm

पावसाकडे बघतांना मनांत आलेले विचार मांडण्याचा हा प्रयत्न. :)

आषाढ-श्रावणाची ती गाज सांगते मज,
भूमीत वेदनेच्या पेरीत सुख निघावे!

अस्तित्व आज माझे उरले कुठे जराही..
मृद्गंध होऊनी मी सर्वां-उरी भिनावे!

कोमेजण्यात मजला कसलेच दु:ख नाही..(पण)
कुंजातल्या फुलासम बहरून नित्य यावे!

प्रत्येक दिस नसावा मृत्यूस याचणारा..
क्षणैक मेघनेसम दिपवून सर्व जावे!

कित्येक जन्म सरले काट्यांत रोधलेले..(पण आता)
आभाळ न्हायलेली धरती मला खुणावे!!

राघव

शांतरसकविता

प्रतिक्रिया

मनीषा's picture

1 Aug 2009 - 12:29 pm | मनीषा

प्रत्येक दिस नसावा मृत्यूस याचणारा..
क्षणैक मेघनेसम दिपवून सर्व जावे! ... सुंदर !

क्रान्ति's picture

1 Aug 2009 - 3:35 pm | क्रान्ति

अस्तित्व आज माझे उरले कुठे जराही..
मृद्गंध होऊनी मी सर्वां-उरी भिनावे!

कोमेजण्यात मजला कसलेच दु:ख नाही..(पण)
कुंजातल्या फुलासम बहरून नित्य यावे!

अप्रतिम!

क्रान्ति
सजदे में सर झुकाया तो मैंने सुनी सदा | कांटों में भी फूलो़ को खिलाता ही चला जा
अग्निसखा
रूह की शायरी

प्राजु's picture

4 Aug 2009 - 12:58 am | प्राजु

कित्येक जन्म सरले काट्यांत रोधलेले..(पण आता)
आभाळ न्हायलेली धरती मला खुणावे!!

खास! अप्रतिम शब्द आणि अप्रतिम कविता.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

बेसनलाडू's picture

4 Aug 2009 - 1:26 am | बेसनलाडू

कविता आवडली.
(वाचक)बेसनलाडू

घाटावरचे भट's picture

4 Aug 2009 - 4:59 am | घाटावरचे भट

असेच म्हणतो.

अनिल हटेला's picture

4 Aug 2009 - 12:46 pm | अनिल हटेला

सहमत......
:-)
बैलोबा चायनीजकर !!!
I drink only days ,which starts from 'T'...
Tuesday
Thursday
Today ;-)

श्रावण मोडक's picture

4 Aug 2009 - 12:38 pm | श्रावण मोडक

बऱ्याच दिवसांनी?

नंदन's picture

4 Aug 2009 - 12:49 pm | नंदन

कविता, अतिशय आवडली. 'मनातले सल रुजून आता, त्यांचा झाला मरवा रे' ही बोरकरांची अप्रतिम ओळ आठवली तिसरं कडवं वाचून.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

राघव's picture

4 Aug 2009 - 6:11 pm | राघव

सर्वांचे मनापासून आभार.

राघव
( आधीचे नाव - मुमुक्षु )